सिडनी : युवा नेमबाज विवान कपूर याने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषकात शुक्रवारी कांस्य पदक जिंकले. अन्य नेमबाजांना मात्र पदकांचा वेध घेण्यात आपयश आले. याआधी इटलीत झालेल्या विश्वचषकात १८ व्या स्थानावर घसरलेल्या विवानने ट्रॅप प्रकारात ३० गुणांसह कांस्य जिंकले. याशिवाय विवान(११३), लक्ष्य श्योराण (११२)आणि अली अमन इलाही(१०३ )यांच्या संघाने एकूण ३२८ गुणांची कमाई करीत सांघिक कांस्य जिंकले. चीनला सुवर्ण आणि आॅस्ट्रेलियाला रौप्य मिळाले.वैयक्तिक प्रकारात विवानने पात्रता फेरीत ११३ गुणांसह पाचवे स्थान मिळविले होते. या प्रकाराचे सुवर्ण इटलीचा १८ वर्षांचा मार्टेओ याने जिंकले. भारताचा ख्रिस्तोफर रमेश हा ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये फायनलमध्ये सहाव्या स्थानावर राहिला. हर्षित बाजवा, सरताजसिंग आणि मिथिलेशबाबू हे क्रमश: नवव्या, १२ व्या आणि १३ व्या स्थानावर राहिले. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकली असून पाच सुवर्णांची कमाई करणाऱ्या चीनपाठोपाठ दुसरे स्थान राखले आहे. (वृत्तसंस्था)वैयक्तिकनंतर सांघिक गटात छापवैयक्तिक प्रकारामध्ये विवानने पात्रता फेरीत ११३ गुणांची कमाई करत पाचवे स्थान पटकावले. त्याचवेळी लक्ष्य आणि इलाही यांना अनुक्रमे आठव्या आणि १३व्या स्थानावर समाधान मानावे लागले. सहा खेळाडूंच्या आणि ४५ शॉट्सच्या अंतिम फेरीत १६ वर्षीय विवानने ४० पैकी ३० नेम अचूक मारले. यासह त्याचे पोडियम स्थान निश्चित झाले होते.वैयक्तिक पदक नक्की झाल्यानंतर विवानने लक्ष्य आणि इलाही यांच्यासह सांघिक कांस्यही निश्चित केले. विवान, लक्ष्य आणि इलाही यांनी मिळून एकूण ३२८ गुणांचा वेध घेत कांस्य जिंकले. तसेच आॅस्टेÑलिया (३३१) आणि चीन (३३५) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पटकावले.
युवा नेमबाज विवान कपूरने पटकावले कांस्य, अन्य भारतीय अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 2:18 AM