शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

दिल्लीच्या युवा खेळाडूंनी धैर्य दाखवावे

By admin | Published: April 28, 2017 2:04 AM

दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कामगिरीबाबत आशावादी व सकारात्मकता स्पष्ट करणाऱ्या राहुल द्रविडच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटले.

रवी शास्त्री लिहितात...दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कामगिरीबाबत आशावादी व सकारात्मकता स्पष्ट करणाऱ्या राहुल द्रविडच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटले. दिल्ली संघाला अलीकडे मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तरी राहुल द्रविड मात्र संघाच्या प्लेआॅफच्या संधीबाबत आशावादी दिसला. युवा खेळाडूंच्या कामगिरीबाबत द्रविड आशावादी आहे. संघाला मार्गदर्शन करताना द्रविड गंभीर होता. द्रविडच्या वक्तव्याचा आपल्यालाही गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ‘प्ले आॅफ’साठी पात्रता मिळविण्यासाठी संघाने सर्वतोपरी प्रयत्न करायला हवे, असे द्रविडला वाटते. आकडेवारीचा विचार करता त्यासाठी दिल्ली संघाला उर्वरित आठपैकी सहा सामने जिंकणे आवश्यक आहे. संघातील युवा खेळाडूंनी धैर्य दाखविले तर पर्वतावरही पाणी नेता येईल आणि सूर्य पश्चिमेकडून उगवू शकतो. दिल्ली संघाला फलंदाजीमध्ये अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. संघाचे गोलंदाज चांगली कामगिरी करीत असून, प्रतिस्पर्धी संघाला सातत्याने १६० धावसंख्येच्या जवळपास रोखण्यात यशस्वी ठरत आहेत. अशा स्थितीत फलंदाजांना प्रत्येक चेंडूवर जोखीम पत्करण्याची गरज नाही. त्यांना केवळ एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या जास्तीत जास्त विकेट १० षटकांनंतरच्या खेळासाठी राखून ठेवायला हव्यात. आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार केला, तर आयपीएलमध्ये दिल्लीच असा एकमेव संघ आहे की, त्यांना आपल्या पूर्णक्षमतेनुसार मैदानात उतरता आलेले नाही. भारतातील काही प्रतिभावान युवा खेळाडू या फ्रँचायझीचे सदस्य आहेत. इंजिन असलेल्या खेळाडूने लौकिकाला साजेशी कामगिरी केली आणि कुठे अडथळा निर्माण झाला नाही तर ही गाडी महामार्गावर धावण्यासाठी तयार झाली असल्याची प्रचिती येईल. दिल्ली संघाला यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ सध्या शानदार फॉर्मात आहे. दिल्लीचा संघ कोलकाता संघाला त्यांच्याच गृहमैदानावर पराभूत करण्यात यशस्वी ठरला, तर डेअरडेव्हिल्स संघाला स्वत:च्या क्षमतेची कल्पना येईल. येथे विजय मिळवला तर त्यांच्यासाठी पुढची वाटचाल योग्य दिशेने होईल, पण त्यासाठी त्यांचा स्वत:वर विश्वास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सुनील नरेन, कुलदीप यादव किंवा कुल्टन नाईल आपल्या रनअपसाठी तयार होतील, त्या वेळी कुठलेही दडपण न बाळगणे आवश्यक आहे. गुणतालिकेत सध्या जे दिसत आहे त्या तुलनेत दिल्ली संघ सरस असल्याची सर्वांनाच कल्पना आहे. दिल्ली संघाने अन्य संघांच्या तुलनेत काही लढती कमी खेळल्या आहेत आणि ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आता दिल्ली संघाने वादळाचे रूप धारण करण्याची गरज आहे. (टीसीएम)