सिडनी : अनुभवी फलंदाज युनिस खानने गुरुवारी येथे ११ देशांत कसोटी शतक ठोकण्याचा अनोखा विक्रम केला; परंतु त्याच्या जिगरबाज नाबाद खेळीनंतरही आॅस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पाकविरुद्ध आपले पारडे जड ठेवले.यूनिसने त्याचे ३४ वे कसोटी शतक पूर्ण करुन सुनील गावस्कर, ब्रायन लारा, माहेला जयवर्धनेसारख्या दिग्गज फलंदाजांची बरोबरी केली आणि जगातील ११ देशांत शतक बनवणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. तो १३६ धावांवर खेळत आहे.त्याची शानदार खेळी तसेच त्याने सलामीवीर अजहर अली (७१) याच्या साथीने तिसऱ्या गड्यासाठी केलेल्या १४६ धावांच्या भागीदारीनंतरही पावसाचा व्यत्यय आलेल्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तान ८ बाद २७१ धावा करुन फॉलोआॅनसाठी झुंजत आहे.तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने गमावणारा पाकिस्तान अजूनही आॅस्ट्रेलियाच्या २६७ धावांनी पिछाडीवर आहे. आॅस्ट्रेलियाने त्यांचा पहिला डाव ८ बाद ५३८ धावांवर घोषित केला होता.पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही; परंतु त्यानंतर सिडनी मदानावर यूनिसच्या जिद्दीची व विक्रमाचीच चर्चा रंगली. यूनिसने संयुक्त अरब अमिरातशिवाय सर्वच कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध शतके ठाकली. अशा प्रकारे त्याने ११ देशांत कसोटी शतक ठोकले. हा विक्रम ठरला. (वृत्तसंस्था)यूनिसशिवाय अन्य कोणताही फलंदाज टिकाव धरु शकला नाही. दुसऱ्या सत्रात खेळ सुरु झाल्यानंतर अजहर धावबाद होऊन तंबूत परतल्याने त्यांची स्थिती खराब झाली. यूनिस आणि अजहर यांनी काल पाकिस्तानला २ बाद ६ या धावसंख्येवरुन सावरले होते. यूनिसने फिरकी गोलंदाज नाथन लियोनच्या आखूड टप्प्यावर मिडविकेटला फटका मारला; परंतु त्याने धाव घेण्यास विलंब लावला. त्या गफलतीत अजहर धावबाद झाला. मॅथ्यू वेड आजारी पडल्यामुळे त्याच्या जागेवर हँड्सकॉम्बने यष्टिरक्षणाची जबाबदारी पत्करली. आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) ८ बाद ५३८ घोषित.पाकिस्तान : पहिला डाव : ९५ षटकात ८ बाद २७१. (युनिस खान खेळत आहे १३६, अजहर अली ७१, सर्फराज अहमद १८, मिस्बाह उल हक ८. नाथन लियोन /९८, हेजलवूड २/५३).
यूनिसचे विक्रमी शतक तरीही आॅस्ट्रेलिया मजबूत
By admin | Published: January 06, 2017 1:06 AM