ब्युनोस आयरिस : भारताच्या आकाश मलिकने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे. 15 वर्षीय आकाशला अंतिम फेरीत अमेरिकेच्या ट्रेंटन कोव्लेसकडून 0-6 असा पराभव पत्करावा लागला. या पदकासह भारताच्या खात्यात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 1 कांस्यपदक जमा झाले आहे.
पाचव्या मानांकित हरयाणाच्या आकाशला सुवर्णपदकाच्या सामन्यात सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयश आले. ''हवा असताना निशाणा कुठला साधायचा, याचा सराव मी केला होता. मात्र, येथे वाऱ्याचा वेग जास्तच होता. रौप्यपदक जिंकल्याचा आनंद आहे, परंतु सुवर्ण गमावल्याचे दुःखही आहे,'' असे आकाश म्हणाला.