शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

युथ आॅलिम्पिक : मिझोरमच्या भारोत्तोलकाने मिळवून दिले पहिले सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 5:47 AM

भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. पुरुषांच्या ६२ किलो वजनगटात तो अव्वल राहिला.

ब्यूनस आयर्स : भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. पुरुषांच्या ६२ किलो वजनगटात तो अव्वल राहिला. त्याचप्रमाणे १६ वर्षीय नेमबाज मनू भाकरने अपेक्षित कामगिरी करताना १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण वेध घेतला.आयझोलच्या १५ वर्षीय जेरेमीने २७४ किलो (१२४ व १५०) वजन पेलले. त्याने विश्व युथ चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक पटकावले होते. तुर्कीच्या तोपटास कानेरने २६३ किलो वजन उचलताना रौप्यपदक पटकावले. कोलंबियाचा विलार एस्टिवन जोस कांस्यपदकाचा मानकरी ठरला. या महिन्यात २६ तारखेला वयाची १६ वर्षे पूर्ण करणार असलेल्या जेरेमीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये (युथ) रौप्य आणि कांस्य (ज्युनिअर) पदक पटकावले होते.मिझोरम भारोत्तोलन संघटनेचे अध्यक्ष एन. थांगचुंगनुंगा म्हणाले,‘जेरेमीचे वडील लालनेइतलुंगा माजी बॉक्सर असून, त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सात सुवर्णपदके पटकाविली आहेत.’ जेरेमीचीही बॉक्सर होण्याची इच्छा होती, पण प्रशिक्षकांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने भारोत्तोलनामध्ये पदार्पण केले. त्याच्या वयाच्या आठव्या वर्षी २०११ मध्ये सैनिक क्रीडा संस्थेने त्याची निवड केली होती.या पदकामुळे भारताची युथ आॅलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी निश्चित झाली आहे. भारताने यापूर्वीच चार पदके पटकाविली आहेत. शाहू तुषार माने आणि मेहुली घोष यांनी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत रौप्य तर ज्युडोमध्ये टी तबाबी देवीने ४४ किलो गटात दुसरे स्थान पटकावत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. (वृत्तसंस्था)नेमबाजीत मनू भाकरचा सुवर्णवेधयुवा नेमबाज मनू भाकरने अपेक्षित कामगिरी करताना मंगळवारी युथ ओलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तिने २३६.५ गुणांचा वेध घेतला. यासह तिने आशियाई व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अपयश मागे टाकले. मनूच्या वर्चस्वापुढे इयाना इनिना व निनो खुत्सबरिद्ज या रशियन खेळाडूंनी रौप्य व कांस्य पदक जिंकले.२०१४ भारताने मध्ये नानजिंग युथ आॅलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक पटकावले होते तर २०१० सिंगापूर स्पर्धेत सहा रौप्य व दोन कांस्यपदके पटकाविली होती. भारोत्तोलनमध्ये महिला विभागात ४८ किलो वजन गटात स्नेहा सोरेन पाचव्या स्थानी राहिली.

टॅग्स :Youth Olympic Games 2018 युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2018