ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - अत्यंत चुरशीच्या झालेल्या प्रो कबड्डीचे तिसरे सत्र अंतिम टप्प्यात आले असून, आज यू मुंबा आणि पटना पटना पायरेटस प्रो-कबड्डीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगलेलले दोन्ही उपांत्य सामने रंगतदार ठरतील अशी प्रेषकांची अपेक्षा होती मात्र पहिला उपांत्य सामना एकतर्फीच झाला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात लढवय्या बंगाल वॉरियर्सयने गतविजेत्या यु
मुंबाला चांगलेच झुंझवले दोन्ही संघाने एकमेंकाना एक वेळा ऑल आऊट केले. सामन्याच्या पहिल्या सत्रात मुंबईकरांनी आघाडी मिळवली होती मात्र दुसऱ्या सत्रात बंगाल वॉरियर्सयने सामन्यात पुनरागमन केले आणि चांगली लढत दमदार लढत दिली. पण त्यांचे प्रयत्न मुंबईकरांनी असफल करत ४१-२९ अश्या फरकांनी जिंकत अंतिम फेरित धडक मारली.
पहिल्या उपांत्य सामन्यात पटना पायरेट्सने झुंजार पुणेरी पलटणला ४० - २१ अश्या १९ गुणांच्या फरकाने पराभव करत अंतिम दिमाखात अंतिम फेरित धडक मारली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेते आणि अव्वलस्थान मिळविलेले यू मुंबाने लढवय्या बंगाल वॉरियर्सचा अश्या फरकाने पराभव करत अंतिम फेरित प्रवेश मिळवला. यंदाच्या स्पर्धेतील अडखळत्या सुरुवातीनंतर मुंबईकरांनी आपला हिसका दाखवत सलग दहा विजयांची माळ गुंफून गुणतालिकेत थेट अव्वल स्थानी झेप घेतली आहे. रिशांक देवाडियानी प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात १०० रेड पाँटस घेत संघाला आपले संपुर्ण योगदान दिले आहे
दरम्यान, पहिल्या उपांत्य सामन्यातील लढतीत मध्यंतरापूर्वीच पाटणा पायरेटसने मोठी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर पुणेरी पलटनने खेळ उंचावला मात्र तोपर्यंत उशीर झाला. सामना संपला तेव्हा पाटणा पायरेटसकडे ४० तर, पुणेरी पलटनच्या खात्यावर २१ गुण होते. शेवटी पाटना पायरेटसने पुणेरी पलटनवर १९ गुणांच्या फरकाने मोठा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
यंदाच्या सत्रात संघामध्ये मोठे फेरबदल करून सर्वांनाच चकीत करताना पुणेरी पलटणने स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली होती. कर्णधार मनजित चिल्लरचे आक्रमक नेतृत्व संघाच्या यशामध्ये निर्णायक ठरले असून, अजय ठाकूर, दीपक हुडा, जसमेर सिंग गुलिया या अनुभवी खेळाडूंची कामगिरीही महत्वपूर्ण ठरली होती.