स्वदेश घाणोकर- मुंबई
चुकांमधूनच माणूस शिकतो याची प्रचिती मंगळवारी यू मुंबाचा खेळ पाहून आली. सोमवारी तेलगू टायटन्सविरुद्धच्या लढतीत हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानंतर यू मुंबाच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठली होती. मुंबई आघाडीवर असताना अखेरच्या क्षणी घाई करून बरोबरीवर समाधान मानण्यास तेलगूला भाग पडले होते. त्यातून धडा घेत मुंबाने तगडय़ा पाटणा पायरट्स संघाविरुद्ध आत्मविश्वासाने खेळ केला आणि अटीतटीच्या या लढतीत यजमानांनी 36-33 असा विजय साजरा केला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
खेळाडू मैदानावर येताच अनुप कुमार आणि रिशांक देवाडिगा यांच्या नावांचा जयघोष झाला. त्यांच्या प्रत्येक चढाईत अनुप, अनुप आणि रिशांक, रिशांक.. या आवाजाने स्टेडियम दणाणून सोडले होते. मुंबईचा कर्णधार अनुप याने पहिल्याच चढाईत बोनससह पाटणाच्या एका खेळाडूला बाद करून दोन गुण पटकावले. त्याला दुस:याच चढाईत पाटणाच्या रवी दलाल याच्याकडून उत्तर मिळाले. 7व्या मिनिटार्पयत 5-5 अशी बरोबरीत असलेली ही लढत मुंबईच्या रिशांकने एकाच चढाईत पाटणाच्या सोमवीर छिल्लर, कर्णधार राकेश कुमार आणि मनदीप कुमार यांना बाद करून 8-5 अशी आघाडी घेतली. 9व्या मिनिटाला मुंबईने पाटण्यावर लोन चढवून ही आघाडी 12-6 अशी भक्कम केली. दोन्ही संघांनी बोनस गुणावर भर देत गुणफलक हलता ठेवला. 19व्या मिनिटाला पाटणाने लोन चढवून हाफ टाइममध्ये 19-19 अशी बरोबरी मिळवली.
दुस:या हाफमध्ये मुंबईने टॉप गीअर टाकून पाटणाचे प्रय} हाणून पाडले. अनुप आणि रिशांक या जोडीने आक्रमक खेळ करून सामन्यात 24-2क् अशी एकहाती आघाडी घेतली. 26व्या मिनिटाला मुंबईने जिवा गोपाल याला बाद करून दुसरा लोन चढवला आणि ही आघाडी 29-21 अशी मजबूत केली. पाटणाने डावपेचात बदल करून सामना अटीतटीचा बनवला. तीन मिनिटे शिल्लक असताना सामना 35-33 असा मुंबईच्या बाजूने होता खरा, परंतु सर्वाच्या मनात भीती निर्माण करून गेला. पाटणाचा कर्णधार राकेश कुमारने चढाई केली आणि त्या मध्यरेषेवर विशाल माने याने रोखून स्वत:ला बाद करून घेतले आणि स्टेडियमवर विजयी जल्लोष झाला.
पाक खेळाडू आले तर येऊ दे..
यू मुंबा आणि पाटणा यांच्यातील लढतीत सर्वाचा चर्चेचा विषय ठरला तो पाकिस्तानी खेळाडू वासीम सज्जाद याची उपस्थिती. पटना संघाचा हा खेळाडू आज राखीव बाकावर बसला होता. जो तो त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. पाकचा खेळाडू मुंबईत आलाच कसा, असा सवाल काही टीकाकार करीत होते; परंतु पाक खेळाडू आले तर येऊ दे, काय बिघडतंय असा सूर कबड्डीप्रेमींमध्ये उमटत होता. स्पध्रेला राजकीय रंग लागू नये, म्हणून आयोजकांनीही वासीमला संघाची जर्सी न घालू देता साध्या टी शर्टवर बसविले होते. यावर प्रेक्षकांना विचारले असता, कबड्डीला व्यासपीठ मिळत असताना राजकीय रंग देऊन पाय खेचू नये, असे मत कम सज्जड दमच प्रेक्षकांनी भरला.