शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

पायरेट्सला नमवण्यासाठी यू मुंबा सज्ज

By admin | Published: August 20, 2015 11:30 PM

सलग दुसऱ्या सत्रात आम्ही बाद फेरीत धडक मारली असून कामगिरीत राखलेले सातत्य कायम ठेवू. उपांत्य सामन्यात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या पटणा

मुंबई : सलग दुसऱ्या सत्रात आम्ही बाद फेरीत धडक मारली असून कामगिरीत राखलेले सातत्य कायम ठेवू. उपांत्य सामन्यात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या पटणा पायरेट्सचे आव्हान असले तरी त्यांना बाद फेरीत खेळण्याचा अनुभव नसल्याने त्या जोरावर आम्ही बाजी मारु, असे सांगत बलाढ्य यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने प्रो-कबड्डीच्या उपांत्य फेरीसाठी रणशिंग फुंकले आहे.प्रो-कबड्डीची उपांत्य फेरी गाठलेले चारही संघाच्या कर्णधारांनी या निर्णायक सामन्यासाठी संघाच्या तयारीबाबत माहिती दिली. शुक्रवारी रंगणाऱ्या उपांत्य फेरीत पहिली लढत तेलुगू टायटन्स वि. बंगळुरु बुल्स अशी होईल. तर यानंतर यजमान यू मुंबा धोकादायक पटणा पायरेट्स सोबत दोन हात करतील. पटणाच्या खेळामध्ये वेग असून त्यांचा संघ समतोल आहे यात शंका नाही, मात्र उपांत्य सामना खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नसून आम्ही त्याचा फायदा घेत बाजी मारू, असे अनुपने सांगितले. संघाच्या व्यूहरचनेबाबत अनुप म्हणाला की, आमचा संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून नाही, हीच आमची खरी ताकद आहे. संघातील सगळे रेडर आणि डिफेंडर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. उपांत्य सामन्यात संघाची आक्रमकता सर्वांनाच दिसून येईल. (क्रीडा प्रतिनिधी)