शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
2
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
3
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
4
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
5
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
6
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
7
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
8
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
9
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
10
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
11
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
12
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
14
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
15
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
16
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
17
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
18
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
19
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
20
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव

युवराज-धोनीचे झंझावात, इंग्लंडपुढे 382 धावांचे आव्हान

By admin | Published: January 19, 2017 2:07 PM

भारताने 50 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 381 धावांचा डोंगर उभा केला आहे. इंग्लंड संघाला विजयासाठी 382 धावांचे आव्हान देण्यात आले

ऑनलाइन लोकमत

कटक दि. 19 -  आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर चौथ्या विकेटसाठी अनुभवी जोडी युवराज-धोनीने 38.2 षटकात केलेल्या 256 धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने 50 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 381 धावांचा डोंगर उभा केला आहे. इंग्लंड संघाला विजयासाठी 382 धावांचे आव्हान देण्यात आले. इंग्लडकडून ख्रिस वोक्सने धारधार गोलंदाजी करताना भारतीय संघाची आघाडीची फळी उध्वस्त केली. वोक्सने दहा षटकात तीन षटके निर्धाव टाकताना चार बळी घेतले. 
 
दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच वोक्सने लोकेश राहुल(5), कर्णधार विराट कोहली(8) आणि धवन(11) यांना स्वस्तात बाद करत भारताला अडचणीत आणले. 25 धावा फलकावर लागल्या असताना भारताचे तीन फलंदाज तंबूत गेले होते. मैदानावर असलेल्या अनुभवी युवराज-धोनी यांच्या जोडीवर संघाची मदार सर्वस्वी अवंलबून होती. युवराज-धोनी जोडीने सुरुवातीला सावध फलंदाजी करतनाच धावसंख्या हलती ठेवली. युवराजने 56 चेंडूत आपले अर्धशतक केले. त्यानंतर युवराज आधिक आक्रमक झाला. त्यानंतर त्याने इंग्लडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. यावेळी युवाराज सिंगने 14 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले. युवराजने 98 चेंडूचा सामना करताना एक षटकार आणि 15 चौकारासह शतक पुर्ण केले. युवराजने आपले वैयक्तित धावसंखेचा विक्रम देखिल मोडीत काढला. युवराजने 127 चेंडूचा सामना करताना तीन षटकार आणि 21 चौकारांसह 150 धावांची खेळी केली. यावेळी त्याने इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.  
 
धोनीने युवराजला सुरेख साथ देत संयमी फलंदाजी करत आपले शतक केले. युवराज बाद झाल्यानंतर धोनीने सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतं चौकार षटकारांची बरसात केली. धोनीने 122 चेंडूचा सामना करताना सहा षटकारासह 10 चौकार लगावत 134 धावांची खेळी केली. धोनीने शेवटच्या षटकात केदार जाधावसह(22) संघाची धावसंख्या वाढवली. केदारने आपल्या छोट्या खेळीत एक षटकार आणि तीन चौकार लगावले.  धोनी-जाधव यांनी 18 चेंडूत झटपट 42 धावांची भागीदारी करत संघाती धावसंख्या वाढवली. 
 

कटक सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. लियाम प्लंकेट याला इंग्लंडच्या संघात संधी देण्यात आली आहे. तर भारतीय संघात देखील उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमार याला संधी देण्यात आली आहे.