सिडनी : जागतिक क्रमवारीतील नंबर वन गोल्फपटू आॅस्ट्रेलियाचा जेसन डे याने झिका व्हायरसच्या भीतीपोटी रिओ आॅलिम्पिकमधून माघार घेतली आहे.मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तात २८ वर्षांचा जेसन डे म्हणतो, ह्यमी आपल्या कुटुंबीयांना कुठल्याही संकटात टाकू इच्छित नाही. झिका व्हायरसचा वाढता दुष्प्रभाव पाहून मी आॅगस्ट महिन्यात रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागीहोऊ शकणार नाही.गतवर्षी पहिल्यांदा पीजीए चॅम्पियनशिप जिंकणारा जेसन पुढे म्हणाला, मी आयुष्यात कुठलाही निर्णय कुटुंबाला पुढे ठेवूनच घेत असतो. रिओत माझे सहभागी होणे कुटुंबीयांसाठी संकट ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मतआहे. जेसनने कारकीर्दीत आतापर्यंत १० विजेतेपद पटकाविले आहेत. गतवर्षी त्याला देशाचा सर्वोच्च ह्यद डॉन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.(वृत्तसंस्था)