शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

झिम्बाब्वे-हाँगकाँग; अफगाण-स्कॉटलंड यांच्यात सलामी

By admin | Published: March 07, 2016 11:29 PM

आयसीसी टी-२० विश्वचषकाचा शुभारंभ आज मंगळवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये खेळविण्यात येणाऱ्या दोन पात्रता सामन्यांनी होत आहे. झिम्बाब्वे- हाँगकाँग आणि अफगाणिस्तान-स्कॉटलंड यांच्यात

नागपूर : आयसीसी टी-२० विश्वचषकाचा शुभारंभ आज मंगळवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये खेळविण्यात येणाऱ्या दोन पात्रता सामन्यांनी होत आहे. झिम्बाब्वे- हाँगकाँग आणि अफगाणिस्तान-स्कॉटलंड यांच्यात दुपारी ३, तसेच सायंकाळी ७.३० पासून ‘ब’ गटात सामने खेळले जातील.पात्रता फेरीत आठ संघ झुंज देत असून, यातील अव्वल दोन संघ सुपर टेन संघांसोबत मुख्य फेरीत खेळणार आहेत. झिम्बाब्वेचा सध्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे हाँगकाँग अपसेट करण्याच्या इराद्याने खेळेल. २०१४ च्या पात्रता फेरीत या संघाने बांगलादेशचा पराभव केला होता. पण, मुख्य फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. आशिया कप पात्रता फेरीतही हा संघ पराभूत झाला होता. अफगाण संघ सलग चौथ्यांदा विश्वचषकासाठी तयार होत आहे. २०१४ मध्ये त्यांना पात्रता फेरीचा अडथळा दूर करणे अवघड गेले होते. अलीकडे आशिया चषकाची मुख्य फेरीदेखील गाठता आली नव्हती. झिम्बाब्वे आणि ओमानवरील मालिका विजयाने त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. २०१५ मध्ये आयसीसी पात्रता स्पर्धेत हॉलंडसोबत संयुक्त विजेता राहिलेल्या स्कॉटलंडची टी-२० विश्वचषकात सहभागी होण्याची ही तिसरी वेळ आहे. (क्रीडा प्रतिनिधी) > झिम्बाब्वे : हॅमिल्टन मस्कद्जा कर्णधार, सीन विलियम्स, तेंदई चतारा, वेलिंग्टन मस्कद्जा, तिनाशे पेनयंगारा, पीटर मूर, एल्टन चिगम्बुरा, सिकंदर बट्ट, रिचमंड,मुटुम्बामी, चामू चिभाभा, तेंदई चिसोरो, तवांदा मुपारिवा, माल्कम वॉलर, वुसुमुझी सिबांडा, डोनाल्ड तिरिपानो.हाँगकाँग : तन्वीर अफझल कर्णधार, मार्क चापमन, हसीब अमजद, नदीम अहमद, जेम्स अटकिन्सन, तन्वीर अहमद, रेयॉन कॅम्बेल, वकास बरकत, बाबर हयात, ख्रिस्टोफर कार्टर, इजाज खान, निजाकत खान, अंशुमन रथ, वकास खान, किंचित शाह.> अफगाणिस्तान : असगर स्तानिकजई कर्णधार, मोहम्मद शहजाद, नूर अली जरदान, उस्मान गनी, मोहम्मद नबी, करीम सादिक, शफिकउल्लाह, राशिद खान, आमीर हमजा, दावलत जरदान, शापूर जरदान, गुलबादिन नेब, समीउल्ला शेनवारी, नजिबुल्लाह जरदान, हामीद हसन.स्कॉटलंड : प्रेस्टन मोमसेन कर्णधार, काईल कोएत्झर, अलासदेअर इव्हान्स, कॅलम मॅक्लॉईड, कोन डी लांगे, गॅविन माईन, जॉर्ज डेव्ही, मार्क वॅट, मॅट मॅकन, मॅथ्यू क्रॉस, मायकेल लियास्क, रिची बॅरिंग्टन, रॉब टेलर, सफियान शरीफ.