सीन विलियम्सचा झंझावात : यूएईवर चार गडी राखून मातनेल्सन : अनुभवी फलंदाज सीन विलियम्स याच्या शानदार ७६ धावांच्या बळावर झिम्बाब्वेने विश्वचषक स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरात(यूएई) संघावर गुरुवारी चार गडी राखून मात केली. झिम्बाब्वेचा हा पहिला विजय आहे. दोन कमकुवत संघांतील ही लढत यूएईच्या झुंजार खेळीमुळे अखेरपर्यंत रंगतदार ठरली. यूएईने फलंदाजीचे आमंत्रण मिळताच ७ बाद २८५ धावा उभारल्या. वन डेतील ही त्यांची सर्वोच्च खेळी होती. झिम्बाब्वेने ३३ व्या षटकापर्यंत अर्धा संघ गमविल्यानंतरही ६ बाद २८६ धावा असे लक्ष्य गाठले. विश्वचषकात त्यांनी गाठलेले हे सर्वोच्च लक्ष्य होते. विलियम्सने कारकिर्दीत १८ वे अर्धशतक पूर्ण केले. क्रेग इर्विन याने ३२ चेंडूंवर ४२ धावा केल्या. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी करीत सामना खेचून आणला. याशिवाय ब्रेंडन टेलर ४७, सिकंदर रझा ४६ आणि रेगिस चकाबवा याने ३५ धावांचे योगदान दिले. त्याआधी यूएईकडून कृष्णचंद्रणन ३४, खुर्रम खान ४५ आणि स्वप्नील पाटील ३२ यांनी धावसंख्येला आकार दिल्यानंतर पाकमध्ये जन्मलेल्या अन्वरने ५० चेंडूंवर ६७ धावा ठोकून कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली. झिम्बाब्वेकडून चताराने तीन बळी घेतले. झिम्बाब्वेचा अर्धा संघ बाद झाल्याने १५ षटकांत त्यांना विजयासाठी १०९ धावांची गरज होती. १९९६ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक खेळणाऱ्या यूएईला सामना जिंकण्याची संधी चालून आली; पण विलियम्स-इर्विन यांनी त्यांच्या आशेवर पाणी फेरले. यूएई : अमजद अली झे. इर्विन गो. चतारा ७, बेरेंगर झे. टेलर गो. माइर २२, कृष्णचंद्रन झे. चिंगुबुरा गो. माइर ३४, खुर्रम खान झे. विलियम्स गो. चतारा ४५, स्वप्निल पाटील झे. चकाबवा गो. विलियम्स ३२, शेमन अन्वर झे. इर्विन गो. विलियम्स ६७, आर. मुस्तफा झे. टेलर गो. चतारा ४, अमजद जावेद नाबाद २५, मोहम्मद नविद नाबाद २३, अवांतर : २६, एकूण : ५० षटकांत ७ बाद २८५ धावा. गोलंदाजी : पेनयांगरा ९-०-६६-०, चतारा १०-१-४२-३, माइर ८-०-३९-२, कामूनजोगी १०-०-५३-०, चिगुंबुरा १-०-१२-०, विलियम्स ८-०-४३-२, रझा ३-०-११-०, मस्कद्जा १-०-९-०.झिम्बाब्वे : सिकंदर रझा झे. चंद्रन गो. तौकिर ४६, रेगिन चकाबवा हिट विकेट गो. तौकिर ३५, हॅमिल्टन मस्कद्जा पायचित गो. जावेद १, ब्रेंटन टेलर पायचित गो. तौकिर ४७, सीन विलियम्स नाबाद ७६, सोलोमन माइर झे. पाटील गो. नवीद ९, क्रेग इर्विन झे. आणि गो. चंद्रन ४२, एल्टन चिंगुबुरा नाबाद १४, अवांतर १६, एकूण : ४८ षटकांत ६ बाद २८६ धावा. गोलंदाजी : मोहम्मद नवीद १०-०-६०-१, अमजद जावेद ९-०-४९-१, नासिर अजिज १०-०-५३-१, मोहम्मद तौकिर ९-०-५१-२, कृष्णचंद्रन ९-०-५९-१, रोहन मुस्तफा १-०-८-०.मोहम्मद ठरला सर्वात वयस्कर खेळाडूया विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत युनायटेड अरब अमिराती (यूएई) संघाचा कर्णधार मोहम्मद तौकीर हा या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. मोहम्मदचे वय ४३ वर्षे व ३२ दिवस आहे. यापूर्वी नेदरलँडचा स्टीव लुबेर्स ४२ वर्षे ३४७ दिवस वय असताना खेळला होता.