शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक मालिका विजय

By admin | Published: July 10, 2017 5:40 PM

एकदिवसीय क्रमवारीत तळाच्या संघांमध्ये असलेल्या झिम्बाब्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आज श्रीलंकेविरुद्ध झालेल्या

ऑनलाइन लोकमत
हंबानटोटा, दि. १० -  एकदिवसीय क्रमवारीत तळाच्या संघांमध्ये असलेल्या झिम्बाब्वेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आज श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने तीन गडी राखून सनसनाटी विजय मिळवला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या २०४ धावांच्या आव्हानाचा झिम्बाब्बेने ३९ व्या षटकात फडशा पाडला. या विजयाबरोबरच झिम्बाब्वेच्या संघाने एकदिवसीय मालिकेवर ३-२ अशा फरकाने कब्जा केला. झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुद्धचा हा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. त्यातही या मालिकेपूर्वी झिम्बाब्वेने श्रीलंकेला श्रीलंकेत एकदाही नमवले नव्हते हे विषेश.   
श्रीलंकेने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हॅमिल्टन मसाकाद्झा (७३) आणि सोलोमोन  मिरे (४३) यांनी झिम्बाब्वेला झंझावाती सुरुवात करून दिली. त्यानंतर २४ व्या षटकात झिम्बाब्वेचा संघ १ बाद १३७ अशा सुस्थितीत होता. मात्र श्रीलंकन गोलंदाजांनी पलटवार केल्याने झिम्बाब्वेची अवस्था ७ बाद १७५ अशी झाली. तरी सिकंदर रझा आणि ग्रीम क्रेमर यांनी चिवटपणे खेळ करत झिम्बाब्वेला विजय मिळवून दिला.   अधिक वाचा
( "लंकादहन"साठी विराटसेनेची घोषणा )( Happy Birthday Little Master, तर सुनील गावसकरांना करावी लागली असती मासेमारी )(सुनील गावसकर यांच्यासोेबत मृणालने घेतले डिनर) 
दरम्यान या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण  करण्याच्या निर्णय  झिम्बाब्वेने घेतला. त्यांच्या गोलंदाजांनीही भेदक मारा करत हा निर्णय सार्थ ठरवला. सिकंदर रझा आणि ग्रीम  क्रेमर यांच्या अचूक गोलंदाजीसमोर श्रीलंकन फलंदाजांना फार मोकळीक मिळाली नाही. अखेर धनुष्का गुणतिलका (५२) आणि अशेला गुणरत्ने (नाबाद ५९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने ५० षटकात ८ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली होती. 
श्रीलंका आणि झिम्बाब्वेमधील ही मालिका कमालीची अटीतटीची झाली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने तीनशेहून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत विजय मिळवला होता. त्यानंतर पुढचे दोन्ही सामने जिंकत श्रीलंकेने मालिकेत आघाडी घेतली होती. तर पावसाचा व्यत्यय आलेल्या चौथ्या लढतीत झिम्बाब्वेने डकवर्थ/लुईस-स्टर्न नियमानुसार विजय मिळवला होता. त्यामुळे आज झालेल्या निर्णायक लढतीकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या.