शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दर ३ सेकंदाला आत्महत्येचा १ प्रयत्न

By admin | Published: April 06, 2017 8:46 PM

बोला, मनमोकळं करा, इट्स ओके टू बी नॉट टू बी ओके हे सांगा स्वत:ला आणि मदत मागा कारण जगणं जास्त सुंदर आहे!

बोला, मनमोकळं करा, इट्स ओके टू बी नॉट टू बी ओके हे सांगा स्वत:ला आणि मदत मागा कारण जगणं जास्त सुंदर आहे!नाशिक, प्रतिनिधीआजच्या सोशली कनेक्ट असण्याच्या जगात ‘बोलायलाच’ कुणी मिळू नये, आयुष्य संपवण्याच्या शेवटच्या क्षणांतही सोबत कुणी नाही ही भावना किती भयंकर आहे. आणि दुर्देव असं की जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते आहे. आणि भारतातही हे चित्र बरं नाही, भारतात तर दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते आहे. आणि १५ ते ३५ या वयोगटातील तरुणांची संख्या त्यात अधिक आहे.आसरा या संस्थेनं आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतात दरवर्षी १ लाख लोक आत्महत्या करतात. आणि मुंबईत तर दिवसाला ३ जणं आत्महत्या करुन आपला जीव गमवत आहेत. आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तर प्रचंड मोठी आहे. त्यात सहा लाख लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो, त्यातले काही आपलं आयुष्य नव्यानं उभं करण्याचा प्रयत्न करत असतात.ही नुसती आकडेवारी वाचली तरी अंगावर भयंकर काटा येतो. एकदम मरुनच जावंसं वाटतं, तरुण जीवांना, ते ही ऐन तारुण्यात? उमेदीच्या दिवसात?आणि त्याहून भयंकर दुर्देव हे की, आत्महत्याच करावी असं टोकावर पोहचलेलं असताना त्या टोकावरही काहीक्षण बोलावं असं कुणीच नसतं अवतीभोवती?मानसशास्त्रज्ञ वारंवार सांगतात की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधला, त्याला बोलतं ठेवलं, त्याचं मन मोकळं होवू दिलं तर अनेकजण त्या टोकावरुन परत फिरतात. जगातले कुठलेच प्रश्न आपण मेल्यानं सुटत नाही, पण जगलो तर आपण एक आनंदी आयुष्य स्वत:साठी जगू शकतो.मात्र तसं होत नाही. अनेकदा आत्महत्या करीन म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष होतं, असं काही करणार नाही तो किंवा ती नुस्त्या वल्गना करतात असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे टोकाचं नैराश्य. ते नैराश्य कसं हाताळायचं यासंदर्भात कुणी बोलत नाही. कुणावर मन मोकळं केलं जात नाही. आपल्या अवतीभोवतीची व्यक्ती गमावल्यावर अनेकजण म्हणतात की, त्याच्या मनात इतकं डाचत होतं, तो इतका निराश होता हे आम्हाला कळलंच नाही.ते कळत नाही, कारण आपण विश्वासानं एकमेकांशी बोलत नाही.ते बोला..बोलून मोकळे व्हा.इट्स ओके, टू नॉट बी ओके..मदत मागा..अनेक संस्था सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन चालवतात, नुस्तं गुगल केलं तरी अनेक हेल्पलाईनचे दुरध्वनी मिळू शकतात.त्यावर संपर्क करा, त्या हेल्पलाईन २४ तास उपलब्ध असतात.त्यातलीच एक आसरा हेल्पलाईन. 
 
अधिक माहिती www.aasra.info
इथं मिळू शकेल.हेल्पलाईन क्रमांक ०२२-२७५४६६६९