खुश है जमाना,
आज पहली तारीख है!
और वो भी नए साल की पहली तारीख!
जमाना खूश तर असणारच,
आणि त्याचबरोबर मनात असतेही
नवीन उत्कंठा की,हे वर्ष कसं जाईल?
काय काय, नवं नवं घडेल या वर्षात?
काय असतील नव्या संधी, नव्या वाटा
आणि कुठं कुठं आपल्याला नव्या जमान्याशी
कदमताल जुळवून घ्यावा लागेल?
हे शोधायला तुम्हाला जरा सोपं जावं
म्हणून वर्षाच्या पहिल्या दिवशी,
या पहिल्या विशेषांकात आहेत,
काही हिट, हॉट आणि स्मार्ट गोष्टी!!
..आणि हो!!!
आॅक्सीजनच्या आठ पानांंमध्ये
मावणार नाहीत
इतक्या शुभेच्छा!!
-आॅक्सिजन टीम
मनसोक्त फिरायचं,
पण पर्यटक म्हणून नाही तर
‘प्रवासी’ म्हणून..
खिशात नसतीलही फार पैसे,
पण पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ना?
मिळेल ते रस्त्यावरच्या हॉटेलात खायचं
आणि पायी चालायला लागायचं!
-कशासाठी??
अनुभव कमावण्यासाठी!!
२०१६चा हा
आहे नवा ट्रॅव्हल कम थ्रील जादा फंडा!
टेक्नॉलॉजीनं जग बदललेलं आहेच,
पण यंदाच्या वर्षी टेक्नॉलॉजी जगण्याचा अनुभव बदलेल!
इतके दिवस फार तर हे तंत्र मोबाईल म्हणून हातात होतं,
आता ते अंगाखाद्यावर मिरवेल!
व्हर्च्युअल आभास कमी करुन
आभासी वास्तव ‘रीअल’ करुन टाकेल!
आणि हे सारं घरबसल्या!
२०१६चा ही आहे नवी टेक्नोफ्रेण्डली
वेअरेबल -व्हर्च्युअल-रीअल आयडिया!
माझी फॅशन कोणी काय म्हणून ठरवावी?
ती मी ठरवेन, माझ्यापुरती!
टाईट कपडे, हाय हिल्स,
निआॅन कलर्सना सुट्टी!
२०१६च्या फॅशनचं एक कलमी सूत्र एकच,
माय कम्फर्ट इज माय फॅशन!
इंडिया डिजिटल होतोय,
मग इंडियातली कामही डिजिटल होतील,
ती कुणी करायची?
म्हणून तर नोकऱ्यांच्या दुनियेतही यंदा,
२०१६ मध्ये असेल डिजिटल जॉबचीच चलती!
स्मार्ट वर्क, स्मार्ट फील
आणि स्मार्ट लूक
ही असेल जॉब वर्ल्डची नवीन डिमांड!
वजनाच्या काट्याला आपण डरत नाही,
मोजून मापून खात नाही,
पण याचा अर्थ आपण केअरलेस नाही,
जान है तो जहॉँन है..
म्हणून यंदा बऱ्याच तरुण मंडळींनी ठरवून टाकलंय,
झिरो फिगर, माचो बॉडी, सिक्स पॅकला सुट्टी
२०१६मध्ये आपण फीट रहायचंय!
आणि त्यासाठी मिळालं तर जीम,
नाही मिळालं तर सूर्यनमस्कार,
दंडबैठका, सायकली आहेत..