शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सगळंच ठरवून, प्लॅनिंग केलेलं असेल तर काय मजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 7:00 AM

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- प्रणव सखदेव

मानेवर रुळणारे केस, अंगात घातलेलं आणि स्ट्रीट लाइटच्या प्रकाशात चमकणारं जॅकेट, त्याची मळकटलेली जीन्स पँट, पायातले जुनाट दिसणारे बूट.. त्यानं एकदा मागे वळून पाहिलं आणि मी दचकलोच! तो मीच होतो, हो मीच! विशीतला मी!  किती वेगळाच दिसत होतो मी! म्हणजे समजा आत्ता जगासाठी मी फुलपाखरासारखा असेन, तर तो फुलपाखरू होण्याआधी असलेल्या सुरवंटासारखा होता. राकट, बेफिकीर, बेधडक. काहीसा अपरिपक्व, नाइव्ह.. इतका वेळ तो कोण आहे, याकडे माझं लक्षच गेलं नव्हतं. तो अगदी समोर उभा असूनदेखील. मी माझ्यातच गुरफटून गेलो होतो. माझी नोकरी, माझं आयुष्य, फ्रस्ट्रेशन्स, त्यातली दुर्‍खं, कंटाळा, लेखन, त्यातलं पॉलिटिक्स असल्याच गोष्टींवर त्याच्याशी बोलत बसलो होतो. माझी सगळी मळमळ, माझा सगळा राग बाहेर काढत होतो. आणि मग मी थोडा शांत झाल्यावर तो इतकंच म्हणाला, जस्ट फॉलो युअर ड्रीम्स! आणि मी गप्प झालो. एकदम गप्प! त्याने बेफिकिरीने, पण गांभीर्याने उच्चारलेलं ते वाक्य माझ्या कानात घुमत राहिलं.मला प्रश्न पडला, काय आहेत माझी स्वप्नं? आपण आपलं सगळं फ्रस्ट्रेशन काढलं खरं, सगळ्या जगाला शिव्या दिल्या खर्‍या; पण आपल्याला काय करायचंय याचा विचार कुठे केला आपण? तसं तर एकच एक विचार घेऊन, एकच एक दिशा ठरवून मार्गक्र मण करणारे आपण कधीच नव्हतो, अगदी विशीतल्या ध्येयवेडय़ा वयातही नव्हतो! पण आत्ता आपण ‘काय नाहीये, सगळं कसं वाईट आहे’ हेच बोलत बसलोय. ‘काय करू शकतो’ किंवा ‘काय करायचंय’ हे बोलतच नाहीयोत; नव्हे त्याचा विचारदेखील करत नाहीयोत. एवढे सिनिकल कसे झालो आपण? एक ठरलेली दिशा नसली तरी, एक वाट तर निवडावी लागेलच ना आपल्याला. आणि त्या वाटेवरही फाटे, चोररस्ते लागतीलच की! म्हणजे भरकटणं आलंच, भटकणं आलंच! अज्ञातात बुडी मारणं आलंच. सगळंच ठरवून, छान प्लॅनिंग केलेलं असेल तर काय मजा! विशीतल्या आपण आत्ताच्या आपल्याला चंद्रशेखर सानेकर यांचा काय मस्त शेर ऐकवला होता –  हेच भरकटणे उद्या होईलही माझी दिशाफक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे.. या भरकटण्यातून कदाचित वेगळी वाटही सापडेल आपल्याला. कदाचित अलीबाबाची गुहाही सापडेल. कदाचित पडू-झडू. असंही वाट चुकणं किंवा भरकटणं हे सबजेक्टिव्ह असतं नेहमी! मुद्दा असतो तो पुढे जाण्याचा, प्रवास करत राहण्याचा!तो दूर दूर निघून जात होता आणि मला त्याला काही केल्या भेटायचं होतं. मी धावत धावत जात त्याला गाठलं. त्याला विचारलं र्‍ तू इथे कसा? का?तो र्‍ पण मी कुठे गेलोच नव्हतो, इथेच तर होतो.  मी र्‍ पण मला कसा कधीच दिसला नाहीस ते?तो र्‍ कारण तू तुझ्याच व्यापात बिझी होतास. मी तुला कितीतरी दिवसांपासून बोलवत होतो, पण तू लक्षच देत नव्हतास. मी तुझी वाट पाहत होतो इथे, बाटलीतल्या राक्षसासारखी. खूप हसलो तुला मी! पण मला माहीत होतं की, एक ना एक दिवस तुला मला ओ द्यावीच लागेल. चल, आता आपला खेळ सुरू झालाय..मी र्‍ खेळ? कुठला?  तो र्‍ पकडा-पकडीचा. तू माझ्यामागे धावत यायचं, मला पकडायचं.मी र्‍ कुठवर?तो र्‍ तिथवर. त्या वाळवंटार्पयत.. दूरवर चमकणार्‍या वाळूच्या टेकडय़ांकडे बोट दाखवत त्याने सांगितलं. आपण तिथे पोहोचलो की, तू मला पकडू शकशील. मधल्या प्रवासात आपल्याला नवी गावं, नवी माणसं, नवे प्राणी-पक्षी भेटतीलच. त्यांच्यासोबत चार दिवस घालवायचे नि पुन्हा पुढे निघायचं. एकदा का त्या वाळवंटात पोहोचलो की मी मुक्त! तिथे गेलो मी ढग होऊन जाईन आणि मनसोक्त बरसून घेईन!माझा चेहरा उजळला; पण मग एक प्रश्न मनातून घरंगळत ओठांवर आलाच र्‍ त्यानंतर काय?त्यानंतर?  कुणास ठाऊक! तो उत्तरला आणि हसायला लागला.  मीही हसलो, विशीत असताना हसायचो अगदी तसंच.. मनमोकळं!

( सुप्रसिद्ध लेखक)