एव्हरेस्ट सर करणा:या रफिकच्या जिद्दीचा सराव
जिद्द असेल तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. स्वत: अपयशही काही करू शकत नाही. औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफिक या पस्तीशीतील तरुणाने याच जिद्दीच्या बळावर एव्हरेस्ट सर केला ही बातमी तर तुम्ही वाचलीच.
पण त्याच्या जिद्दीची ही गोष्ट, अत्यंत प्रेरणादायी आहे.
औरंगाबाद शहराजवळील नायगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रफिकचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. माध्यमिक शिक्षण औरंगाबादेतील हसरूल येथील न्यू हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात घेत असताना 2क्क्6 मध्ये तो औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कॉन्स्टेबलपदावर भरती झाला. तो सध्या खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
शालेय जीवनापासून जिद्दी असलेला रफिक आठवीला गेला त्यावेळी त्याची सडपातळ प्रकृती पाहून शिक्षकाने महाराष्ट्र कॅडेट कोअर(एमसीसी)मध्ये प्रवेश नाकारला होता. त्यामुळे घरी येऊन तो खूप रडला. ही बाब वडील ताहेर शेख यांना समजली तेव्हा त्यांनी शिक्षकांची भेट घेऊन रफिकला एमसीसीमध्ये जॉईन करण्याची विनंती केली. रफिकची प्रकृती सडपातळ असली तरी तो धावण्यात नंबर एक असल्याचे त्यांनी शिक्षकास सांगितले. त्यानंतर शिक्षकाने त्याची पळण्याची परीक्षा घेतली. त्याचं धावणं पाहून त्यास त्यांनी एनसीसीत प्रवेश दिला. त्यानंतर या जिद्दी रफिकने आयुष्यात कधीच हार मानली नाही.
रफीकने याआधी हिमालयातील आठ उंच शिखरे सर केले आहेत. यानंतर त्याने एव्हरेस्ट (उंची 8848 मीटर)चा ध्यास घेतला. रफिक दोन वर्षापूर्वी एव्हरेस्टवर चढाई करू लागला त्यावेळी अचानक हवामान बदललं आणि हिमस्खलन झालं. बर्फाच्या कडा कोसळल्या. धावत जाऊन एका दगडाला पकडल्यानं तो वाचला. सोबतच्या अनेकांना मात्र प्राण गमावावे लागले. त्यामुळे ही मोहीम अध्र्यावरच सोडून माघारी परतावे लागलं. गतवर्षी तो पुन्हा एव्हरेस्टवर निघाला तेव्हा नेपाळमध्ये महाप्रलयंकारी भूकंप झाल्यानं त्यास एव्हरेस्टची मोहीम अर्धवट सोडून परतावं लागलं. पण तिस:या प्रयत्नासाठी पुन्हा तयारीला लागला.
एव्हरेस्टचे स्वप्न साकार करण्यासाठी रफिक रोज पहाटे 4.3क् वाजता उठायचा. पोलीस खात्यातील डय़ूटी करून तो नियमित सराव करायचा. औरंगाबादेतील फाजलपुरा येथील घर ते दौलताबादर्पयत सायकलिंग करायचा. त्यानंतर तो 25 किलो वजनाची पिशवी (सॅक) पाठीवर ठेवून देवगिरी किल्ला चढत आणि उतरत असे. चार वर्षापासून त्याचा हा सराव सुरू होता. यात एक दिवसही त्याने खंड पडू दिला नाही. एव्हरेस्ट मोहिमेसाठी तो 4 एप्रिल रोजी मुंबईला रवाना झाला होता. एक महिना 15 दिवस. एवढय़ा मोठय़ा प्रवासानंतर 19 मे रोजी रफीकने ही मोहीम फत्ते केली.
तुम्हाला हे ठाऊक आहे काय?
सुरेंद्र चव्हाण होता पहिला महाराष्ट्रीय एव्हरेस्ट वीर
महाराष्ट्रातर्फे 1998 साली पुणो येथील सुरेंद्र चव्हाण याने एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला होता. त्याने चीनच्या मार्गाने हे सर्वोच्च शिखर सर केले होते. त्यानंतर नेपाळ भागाकडून एव्हरेस्ट सर करणारा महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्ट वीर म्हणून 2012 साली श्रीहरी तापकीर यांनी मान मिळवला होता. याच वर्षी आनंद बनसोडे, सागर पालकर यांनी, तर 2013 मध्ये किशोर धानकुडे यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा बहुमान मिळवला होता.
कृष्णा पाटील पहिली महिला गिर्यारोहक
महाराष्ट्राच्या कृष्णा पाटील हिने 2009 मध्ये सर्वात कमी वयात एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला होता. कमी वयात एव्हरेस्ट सर करणारी पुणो येथील कृष्णा पाटील ही पहिली भारतीय ठरली. त्यानंतर 2011 मध्ये सांगलीच्या प्रियंका मोहितेनेही एव्हरेस्ट सर केले होते.
-गजानन दिवाण