शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

आजच्या तरुण मुलामुलींचं आयुष्यच पोखरणारे 6 धोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 4:24 PM

पालकांचा पैसा हातात आहे, आणि त्यांच्या मुलांकडून अपेक्षाही नाहीत. ते म्हणतात, कर काय करायचं ते ! त्याचा परिणाम म्हणून आजच्या तरुण मुलांसमोर व्यक्तिमत्त्वाला पोखरणारे हे 6 प्रश्न उभे आहेत..

ठळक मुद्देखड्डय़ात जाणं धोकेदायक आहे, असं आजकाल अनेक तरुणांना वाटतच नाही, त्यात त्यांना थ्रिल दिसतं. करून पहावंसं वाटतं.

-डॉ. श्रुती पानसे

दरकाही वर्षानी तरुणाईचं मन बदलत असतं. तरुणाईसमोरचे प्रश्न बदलत असतात. प्रत्येक नव्या पिढीची वैशिष्टय़े वेगवेगळी असतात. या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्यांचीच शोधायची असतात. मात्र तरीही सध्याच्या तरुणाईसमोर नेमकी आव्हानं काय आहेत, खरं तर कुठले प्रश्न त्यांना घेरतात, याचा हा शोध आहे.मी नक्की काय आहे आणि मला काय करायचं आहे हा प्रश्न तरुण मुलांना पूर्वीही पडायचा. मात्र त्या गोंधळात काही वर्षापूर्वीर्पयत पालकांच्या मुला-मुलींकडून खूपच स्पष्ट अपेक्षा असायच्या. माझ्या मुलानं किंवा मुलीनं अमुक एका क्षेत्नात शिक्षण घेतलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे, अशा स्वरूपाच्या अपेक्षा असायच्या. आजचा शहरी सुज्ञ पालक एक पाऊल पुढे गेला आहे. हा पालक मुलांना ज्या क्षेत्नात जायचं आहे त्या क्षेत्नात जाऊ देतो. अर्थात अजूनही कित्येक पालक ‘अमुकच करायला हवं’ या भूमिकेत दिसतात. मात्र काही पालक तरी निदान समजुतीनं घेतात. काही ठिकाणी पालक आणि मुलं यात संघर्ष झाला तर काहीवेळा ते अ‍ॅप्टिटय़ूड चाचण्या करून घेतात. मात्न मूल काय म्हणतं आहे ते ऐकावं, त्याला ज्या क्षेत्नात शिक्षण घ्यावंसं वाटतं आहे, ते घेऊ द्यावं, करू द्यावं असं म्हणणारेही थोडे आहेत, आणि नाही म्हणणारेही. म्हणजे गोंधळ मुळात याच टप्प्यावर आहे.अपेक्षांचं ओझं. अनेकदा असंही घडतं की पालक मुलांवर अपेक्षांचं ओझं लादत नाहीत. स्वातंत्र्य देतात; पण मुलांनी मात्न स्वतर्‍कडून खूप अपेक्षा केलेल्या असतात. त्यामुळेच मी नक्की कसा आहे/मला काय आवडतं? मी एखादी गोष्ट नक्की कुठर्पयत ताणू शकतो? कुठर्पयत सहन करू शकतो, मी आयुष्यात काय करायचं आहे,  इतरांसमोर कशी आहे इमेज? सार्‍या कुटुंबीयांच्या आणि मित्न-मैत्रिणींच्या गोतावळ्यात राहून प्रयत्न चालू असतो तो स्वतर्‍ला शोधण्याचा. अर्थात, हे काही फार जाणीवपूर्वक चालू असतं असं नाही; पण मनात अंतर्मनात, सुप्तमनात कुठेतरी ‘मी’ला शोधणं, ओळखणं हे असतंच. आपल्याही आसपास अनेक माणसं असतात. कदाचित त्यांच्यामुळे दिशा सापडून जाते. आईबाबा, आजी-आजोबा यांच्यापैकीच कोणाचं करिअर आवडून जातं आणि तेच करिअर करायचं असं काहीजण ठरवतात. शिक्षक-प्राध्यापक, वक्ते यांच्या बोलण्यातून काही गवसतं. त्याचा पाठपुरावा केला तर कदाचित तीच करिअरची दिशा असू शकते. वर्तमानपत्नातली एखादी बातमी, टीव्हीवरची एखादी मुलाखत हीदेखील करिअरची वाट दाखवू शकते. इतरांच्या आत्मचरित्न-चरित्न यातून ‘आपल्यालाही हेच आयुष्यभर करायला नक्की आवडेल’, असं वाटू शकतं. या प्रयत्नांतून कदाचित आपण स्वतर्‍ला सापडू शकू.मात्र होतंय असं की अनेक मुला-मुलींमध्ये मी नक्की काय आहे आणि मला काय करायचं आहे, हा गोंधळ वाढला आहे. पालकांच्या नसल्या तरी त्यांच्याच त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आक्र मकताबरीचशी मुलं-मुली स्वतर्‍ला अत्यंत ‘वरच्या पातळीवरची’ समजतात. ‘मला सर्व काही समजतं’ या नादात असतात. असा कॉन्फिडन्स असणं ही कदाचित चांगली गोष्ट असेल, एक सकारात्मक गुण; पण यामुळे मुलं ओव्हर कॉन्फिडन्ट होतात. त्यातून सर्वानी माझं ऐकावं हा स्वभाव तयार होतो. त्याची परिणती आक्र मकतेत होते. अशी मुलं युवावस्थेत अत्यंत उद्धट होतात. रागीट होतात.आईबाबांशी उद्धटपणाने बोलणारी खूप मुलं असतात. कारण ते सर्वात सोपं असतं. आपण कसेही बोललो तरी आईबाबा नाराज होतात. त्यांना राग येतो; पण ते फक्त रागावतात, यापलीकडे काय करणार आहेत? असं ज्यांना वाटतं ती मुलं उर्मट, उद्धट वागतात. आईबाबांशी खूप वाईट वागणारी खूप मुलं-मुली आहेत. काही मुलं-मुली सतत खोटं बोलतात. काही सतत पैशांची मागणी करतात. व्यसनंदेखील करतात.शरीराच्या अंतर्गत चाललेल्या रसायनांच्या प्रभावामुळे या गोष्टी घडत असल्या तरी आक्र मकतेने केवळ शत्नू तयार होतात. टीमवर्क तयार होत नाही हे लक्षात घेऊन मुलांनीच बदल करायला हवेत.आरोग्याचं भान नाहीभरपूर मैदानी खेळ, दमवणारी शारीरिक हालचाल कमी झाली आहे. शहरी भागात शाळेत, कॉलेजमध्ये चालत जाण्याचं प्रमाण कमी आहे. एकूणच सर्व प्रकारची हालचाल कमी झाली आहे. मोठय़ा माणसांप्रमाणे मुलांचीही जीवनशैली बैठी झाली आहे. टीव्ही, कॉम्प्युटर्सवर बसणं, मोबाइलमध्ये डोकं खुपसून राहणं हेच मुख्य काम असं ठरून गेलं आहे. यातच फास्टफूडची भर पडल्यामुळे ‘काउच पोटॅटो’ घरोघरी दिसतात, तर दुसरीकडे असंही दिसतं की मुलांमध्ये सिक्स पॅक्स, तर मुलींमध्ये शाळेपासूनच झिरो फिगरचा हव्यास वाढतोय. बारीक दिसण्याच्या नादात सत्त्वयुक्त खाणं पोटात जात नाही.पोह्यांपेक्षा पिझा, पराठय़ांऐवजी मॅगी आली की जे होणार, तेच व्हायला लागलं आहे.  मुलं एकतर अतिजाड होताहेत, नाहीतर अतिशय कुपोषित व्हायला लागली आहेत. आपण काय खायचं, आपण व्यायाम करायचा की नाही, खेळायला जायचं की नाही, हा सगळा सवयीचा भाग आहे. या सवयी लावण्याचं काम मेंदू करत असतो. एखादी कृती किंवा एखादा विचार महत्त्वाचा वाटला, तो लक्षात ठेवण्याची गरज मेंदूला वाटली तरच तो लक्षात ठेवतो. व्यायाम केला नाही तरी चालेल, मैदानावर खेळायला गेलं नाही तरी चालेल, तासन्तास टीव्ही बघितला तरी चालेल, नुसते वेफर्स खाल्ले तरी चालतील अशी आपणच मेंदूला हळूहळू सवय लावत असतो. मुलांना लहानपणापासून खाण्याच्या विशिष्ट सवयी लागलेल्या असतात. चीज, बटर, ब्रेड, बिस्किटं, नूडल्स, बर्गर्स, तयार ज्यूस, पिझा असे पदार्थ लहानपणापासून खाऊन त्याचीच सवय लागते. कारण ‘हेच खायचं असतं’ हे मेंदूने स्वीकारलेलं आहे. खड्डय़ात जायचंय म्हणून.बालवय आणि प्रौढ वय याच्या मधलं हे वय काही वेगळ्याच कल्पनांच्या राज्यात वावरत असतं. आपण लईभारी आहोत, अशा भावनांनी मेंदू काबीज केलेला असतो.स्वतर्‍ला डॅशिंग, बोल्ड, हॉटबिट, दबंग समजण्याच्या नादात आपण आपल्या आणि इतरांच्या जिवाशी खेळतोय याचंही भान राहात नाही. साहस असावं, थ्रिलही असावं; पण त्यात वेडेपणा नसावा, हे यांना कुणी सांगावं? त्यात काय होतंय, असाच दृष्टिकोन ही मुलं ठेवतात. समोर खड्डा दिसतोय; पण त्या खड्डय़ात जाऊन बघायचंय काय होतंय ते ! असं याच वयात मुलं म्हणतात. कॉलेजमध्ये, मित्नांमुळे हे धोके जास्त हवेहवेसे वाटतात. धोका आहे असं सांगताय का, मग करून बघायलाच हवं. अशी वृत्ती निर्माण होते. ही वृत्ती पालकांनी समजून घ्यावी. पालक नेहमी उपदेशकांच्या भूमिकेत असतात. त्यापेक्षा एकदा एकमेकांसमोर बसून अतिशय शांतपणे हे मुद्दे त्यांच्या कानावर घालायला हरकत नाही ! कदाचित धाडस करण्याआधी त्यांचं मन कुठेतरी विचार करेल.त्यातून एक वाईट गोष्ट म्हणजे पूर्वी कधीही नव्हती इतकी प्रलोभनं, इतके मोह आणि पाय घसरण्याच्या संधी आजच्या मुलांसमोर आहेत. हे मोह कधी चुकीच्या व्यक्तींच्या स्वरूपात, कधी व्यसनांच्या स्वरूपात, तर कधी वाईट संगतीच्या रूपात त्यांच्या अवतीभवती वावरत असतात. याच्या जाळ्यात ती कधी अडकतात, हे त्यांचे त्यांनादेखील कळत नाही. मुलांची सामाजिक जडणघडण ही बरीचशी त्यांच्या मित्नगटावर अवलंबून असते असं म्हटलं तरी चालेल. रोज गंमत म्हणून भेटणारी कट्टय़ावरची मुलं गंमत म्हणून एखाद्या गणपती मंडळाचे ‘कार्यकर्ते’ होतात. फ्लेक्सवर चमकतात.  सुरुवातीला या कामातून निखळ मजा येत असते. तसं हे काम सांस्कृतिक स्वरूपाचं म्हणून ओळखलं जातं. पुढे हे काम तितकंच मर्यादित राहील असं नाही. या मित्नगटाला इतरही काही कामं करावी लागतात. न पटणार्‍या गोष्टी कराव्या लागतात; आईबाबांचा या कामांना विरोध असणार आहे, हे माहीत असूनही हे ‘करावं’ लागतं. यातून कधी वाईट स्वरूपाच्या ओळखी होतात. त्या टिकवाव्या लागतात. टिकवल्या जातात. या वयात प्रत्येक गोष्ट स्वतर्‍ करून बघायची इच्छा असते. इतर कोणाची फिकीर नसते. ही बेफिकिरीच त्यांच्या वागण्यात- बोलण्यात-चालण्यात- विचार करण्यात लहान-मोठे निर्णय घेण्यात दिसून येते. कॉलेजेसमध्ये राजकीय लागेबांधे असणारी मुलं वेगळी कळतात. कारण ती गुंडगिरीने वागतात. राजकीय करिअर करायचं असेल तर गुंडगिरीने वागलं पाहिजे हे या कॉलेजियन्सकडे बघून नीटच कळतं. त्यांचे जे मित्न म्हणवतात, तेही अध्र्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात. हे लोक इतरांना बराच त्नास देतात. यांच्यामुळे कॉलेजचं वातावरण दूषित होतं.दाखव करून.मुलांमध्ये एखाद्या मुलीशी मैत्नी करण्यावरून भांडणं, मुलीला पटवण्याच्या पैजा, सिगारेट ओढून दाखव, दारू पिऊन दाखव अशी आव्हानं मित्नंच देतात. सिगारेट ओढली असेल तर ते घरी जाऊन सांगतो, अशा धमक्या दिल्या जातात. एखाद्या खास मैत्रिणीबद्दल घरी फोन जातात. मुलीच्या घरीही तिच्या खास मित्नाची माहिती दिली जाते. हे प्रकार खूपच नगण्य; पण मित्नच मुलांचं डोकं खातात. अकारण ताण निर्माण होतात. मुलांची नाहक चिडचिड होते, त्यांना नैराश्यदेखील येऊ शकतं. एखाद्या विशिष्ट मुलाला किंवा मुलीला टारगेट करून छळतात तेव्हा तर नैराश्याची पातळी वाढतेच. मैत्नीमुळेच समस्या येऊ शकते. अशावेळी त्याच्या खांद्यावर हात ठेवणं, त्याला त्याच्या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रसंगाचा सारखा सारखा उच्चार न करणं या गोष्टी पालकांनी करायला हव्यात. असा ताण येऊ शकतो हे मान्य करायला हवं. खेळणार्‍या पैशांमुळे घरच्या मोठय़ा माणसांना अचानक एखाद्या व्यवसायात खूप मोठा लाभ झाला, गावाकडची जमीन विकली अशा कारणांनी खोर्‍याने पैसा घरात येण्याचं प्रमाण काही ठिकाणी खूप वाढलेलं आहे. या अचानक झालेल्या धनलाभामुळे मुलांचा शिक्षणातला रस कमी होणं, केवळ शिकावंसंच नव्हे तर काहीही करावंसं वाटत नाही असं अनेक मुलांच्या बाबतीत सध्या घडू लागलेलं आहे. अशी तरणीताठी मुलं दिवसभर फक्त मोबाइलमध्ये गुंतवून घेतात. काहीही करत नाहीत. दिवसरात्र मित्नांच्या संगतीत असतात. ही खूप मोठय़ा धोक्याची घंटी आहे. अशा घरातला पैसा जसा आला तसा जातोही. किंवा पैसा घरात असला तरी प्रत्येक मुलाने स्वतर्‍च करिअर स्वतर्‍ मेहनतीने उभं करायचं आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आपल्या आयुष्याला आकार देणारे आपणच असतो. अर्थात विशेष म्हणजे ज्या घरांमध्ये असा पैसा आला आहे त्या घरातल्या मुली शिक्षण थांबवून घरी बसल्या आहेत असं दिसत नाही. त्या जिद्दीने स्वतर्‍ला घडवताना दिसतात. तरुण मुलामुलींमध्ये हा फरक सध्या दिसतो आहेच. 

( लेखिका मेंदु आणि शिक्षण या विषयातील संशोधका आहेत.)