शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

अकरावीत शिकणाऱ्या मुलाने बनवला आरती करणारा रोबोट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 7:08 PM

अकरावीत शिकणारा विनित. त्याला रोबोटिक्सचं वेड. त्यानं विचार केला, आरतीच्या ताटाला अनेकांचे हात लागण्यापेक्षा कोरोनाकाळात आरतीच जर रोबोटने केली तर.

ठळक मुद्देआरती करणारा रोबोट आणि त्या रोबोटचा उत्साही दोस्त.

- विनीत देशमुख

लॉकडाऊनच्या काळात एकदा आरती करत होतो तेव्हा मला एक कल्पना सुचली. रोबोटिक्स आरतीची.गणपती उत्सव जवळ येत होता, कोरोना संसर्गाचं प्रमाणही कमी होत नव्हतं. सार्वजनिक गणपती मंडळात आरतीच्या ताटाला अनेकांचे हात लागतील. आरतीच्या ताटात दिवा असल्यानं  ते सॅनिटाइज करून वापरणं हे धोक्याचंच. हा धोका टाळण्यासाठी काय करता येईल असे अनेक प्रश्न डोक्यात होते.त्याचं मी शोधलेलं उत्तर म्हणजे ही रोबोटिक्स आरती.

रोबोटिक्स हा माझा छंद. पॅशन. सर्व काही. मी यंदा अकरावीला गेलो. कॉलेजला प्रवेश घेतोय. पण मला रोबोटिक्समध्येच करिअर करायचं हे मी तिसरी चौथीला असल्यापासून ठरवलं आहे. तेव्हापासूनच मला हा रोबोटिक्सचा छंद होता.त्याआधीचा छंद म्हणजे रिमोटच्या खेळण्या ज्या मला माङो आईबाबा आणून द्यायचे त्या खेळण्यापेक्षा तोडायच्या. त्या तोडून आतमध्ये काय आहे ते बघायचं. एवढय़ा महागडय़ा खेळण्या खेळायचं सोडून मी का तोडतो? म्हणून मला माङो आईबाबा कधीच रागावले नाही. उलट ही माझी सवय बघून त्यांना माझा कल लक्षात आला आणि त्यांनी त्याला दिशा देण्याचं काम केलं. मला रोबोटिक्सचे क्लास लावून दिले. मी मला जे आवडत होतं ते शिकत होतो. हळूहळू ते टेक्निकही माङया लक्षात आलं. मी अॅमेझॉनवर पार्ट्स मिळता आहेत का? हे शोधू लागलो. आणि ते मिळतात हे कळल्यावर ते मागवून मग माङो मीच प्रयोग करू लागलो. मी पार्टस बनवत नाही. ते विकत घेतो. असेम्बलिंग, प्रोग्रामिंग मी स्वत: करतो. प्रोग्रामिंगसाठी ं3ेीॅं8 हा प्रोग्रामिंग बोर्ड मी वापरतो. हा मला माङया क्लासमधूनच मिळाला आहे. गेल्या चार वर्षापासून मी क्लासही सोडून दिला आहे. नवीन  काही रोबोट आला तर तो बघायचा, यू टय़ूबवरचे रोबोटिक्ससंदर्भातले व्हिडिओ बघायचे, आपल्याला हे जमतंय का ते करून बघायचं? किंवा जे आपण पाहातो आहे त्यात काही नवीन काही करता येईल का? याचा प्रयोग करून पाहायचा असे माङो उद्योग चालू होते. खरं तर अशा प्रयोगातूनच मी रोबोटिक्स जास्त शिकत आहे.मी अभ्यासाचा वेळ दवडून हे काय रोबोटच्या मागे लागलो आहे असं आयटी कंपनीत काम करणा:या माङया आईबाबांना कधीच वाटलं नाही. उलट ‘करून पाहा’ हीच त्यांची शिकवण आहे. आणि नुसतं लिहायचं, रट्टा मारायचा हा माझाही स्वभाव नाही. प्रॅक्टिकल करण्यात मला आनंद तो आनंद मला या रोबोटिक्समधून मिळतो. एरवी परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून आईबाबा कधी बोलले नाही आणि मीही कधी टेन्शन घेतलं नाही. हळूहळू माझा रोबोटिक्सचा छंद आणि अभ्यास यात बॅलन्स करायलासुरुवात केली आणि ते जमूही लागलं. फक्त नववी -दहावीला असताना मी रोबोटिक्सवरचं लक्ष थोडं कमी करून ते अभ्यासाकडे अधिक दिलं. पण दहावी आहे म्हणून आईबाबांनी रोबोटिक्स मला बंद करायला लावलं नाही अन् अभ्यासाचं टेन्शन घेऊन मी बंद केलं नाही.माङया या छंदाला लॉयोला हायस्कूल या माङया शाळेतूनही मला खूप प्रोत्सहन मिळालं. आमची शाळा विज्ञान प्रदर्शन भरवते. आठवी, नववी, दहावी ही सलग तीन र्वष मीही विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला आणि माङो रोबोटिक्सचे प्रकल्प प्रदर्शनात सादर केले. नववीला असताना मी इतिहासावरच्या एका विषयावर रोबोट तयार केला. मीनाक्षी मंदिर. फिरतं मीनाक्षी मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला लाइट फॉलोइंग रोबोटस बनवले. त्या प्रकल्पासाठी मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. दहावीला असताना कॅटरॅक्ट सजर्री रोबोट तयार केला होता. अॅक्वा रोबोट, बबल मशीन, अलार्म मशीन (अलार्म झाल्यावर तोंडावर पाणी फवारून जागं करणारं), कटिंग रोबोट, स्पायरोग्राफ रोबोट, सॉकर प्लेइंग रोबोट असे कितीतरी रोबोट मी तयार केले आहेत.आता माङया या रोबोटिक्सच्या छंदानं आकार घेतला आहे. त्याला प्रोत्साहन म्हणून माङया आईबाबांनी आमच्या तीन मजली घरातल्या पहिल्या मजल्यावर रोबोटिक्स विन नावाची माझी छोटीशी लॅब थाटायला जागा करून दिली. लॅबमध्ये बसून आपल्या छंदावर काम करण्याचा आनंद मी घेतो आहे. पण रोबोट हेच माझं ध्येय असलं तरी शिल्पकला, चित्रकला, बागकाम, स्वयंपाक हेही माङो छंद आहेत आणि या छंदासाठीही मी पुरेसा वेळ देतो. गेल्या तीन-चार वर्षापासून आम्ही गणपतीची मूर्ती बाजारातून आणत नाही. मी स्वत:च्या हातानं गणपती तयार करतो. बाबा मला कुंभारवाडय़ातून दरवर्षी पाच किलो माती आणून देतात आणि माझं काम सुरू होतं. गणपती बनवणं, इको-फ्रेण्डली सजावट करणं ही माङया आवडीची कामं. यंदा रोबोटिक्स आरतीही तयार केली. खरं तर बेल रोबोट (घंटी वाजवणारा) तो मी आधीच तयार केला होता.पण यंदा कोरोनाच्या संसर्गाचा विचार करता मी हा रोबोटिक्स आरतीचा रोबोट तयार केला. हा माझा पहिला रोबोट जो व्हायरल झाला आहे. याचं प्रोगामिंग अगदी सिम्पल आहे. पण आरतीचं ताट, घंटी, टाळ, ताशा हे सर्व एकाच रोबोटमध्ये असल्यानं तो इतरांसारखाच मलाही खूप विशेष वाटतो. रोबोटिक्सला धरूनच मी माङया पुढच्या करिअरचा विचार करतो. पण भविष्यात मला जे रोबोट तयार करायचे आहे ते दिव्यांग आणि वृध्द माणसं यांच्यासाठी. त्यांना मदत करणारे रोबोट मला तयार करायचे आहे. माङो रोबोट्स समाज उपयोगाचे असावेत, असं मला मनापासून वाटतं.

(मुलाखत आणि शब्दांकन -माधुरी पेठकर)