15 वर्षाच्या तरुण होत असलेल्या उमलत्या जगात एक सुंदर सहल. गप्पांची मैफल आणि शेअरिंगची जादू.
2015. येणार येणार म्हणता म्हणता आलंही. नवंकोरं वर्ष. नव्या को-या वहीसारखं. या वर्षाच्या पानावर आपण काय लिहिणार, कुठले रंग भरणार, प्रत्येक पानापानात सुंदर भविष्याची
सोनपावलं सजत जाणार.
याची मनोमन उत्सुकता असते. अधीरता असते, उमेदही असते. जे काल चुकलं ते उद्या सुधारण्याची. नवं काहीतरी घडवण्याची. नवी स्वप्न सजवण्याची. हे असं नवंकोरंपण एरव्हीही
कुठल्याही वयात खुणावतंच. मग कल्पना करा, ज्यांच्यासमोर नवंकोरं आयुष्यच
हात जोडून उभंय. ज्यांच्या उमेदीचा आणि अपरंपार ऊर्जेचा उत्साहाला आणि आशेलाही
हेवा वाटावा अशा ‘तरुण’पणाच्या अगदी उंबरठय़ावर उभ्या असणा-या मुलामुलींच्या जगात जाऊन
मस्त गप्पांची एक मैफल जमवली तर कसं वाटेल?
भन्नाटच ना! म्हणून तर या वर्षी तुम्हाला पहिल्यांदाच भेटायला येताना भारलेल्या उत्साहाची एक आल्हाददायक झुळूक घेऊन येतोय. तिचं नाव आहे. 15व्या वर्षी.
आपल्या अवतीभोवतीच्याच 15 वर्षाच्या म्हणजेच टीनएजर मुलामुलींच्या जगात त्यांच्याच वयाचं होऊन जात केलेली ही एक भन्नाट भटकंती आहे. त्यांच्या वर्गात, त्यांच्या बाकांवर बसून, कट्टय़ावर जात, चहा पीत मारलेल्या गप्पा आहेत. गल्लीच्या कॉर्नरवर एकदम कोप:यात
लपूनछपून केलेली खुसपूस आहे. आणि कुणालाही आपलं पंधरावं वरीस आठवायला लावणारी
जादूही आहे.ती जादू अनुभवायची. त्याच उत्साहाची लस स्वत:ला टोचून घेत, भेटायचंय ख-याखु-या ‘तरुण’ होत असलेल्या जगण्याला.?
तर उलटा पान.भेटेल. 15 वर्षाची एक जबरदस्त सेलिब्रेशन पार्टी. स्वागत 2015चं.
एन्जॉय.
हॅपी न्यू इयर.