- प्रसाद ताम्हनकर
जगभरातील अनेक लहान-मोठे देश हे आपल्या देशातील आणि देशाच्या सीमेवरील सुरक्षेसाठी मोठय़ा प्रमाणावर तंत्नज्ञानाचा वापर करत आहेत. विविध प्रकारच्या रोबोट्सना आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देऊन त्यांचा वापर विविध प्रकारच्या संरक्षण कार्यासाठी करून घेतला जात आहे. तंत्नज्ञान क्षेत्नात प्रगती करणारा आणि जगातील अनेक मोठय़ा तंत्नज्ञान कंपन्यांना तंत्नज्ञ पुरवणारा भारत सैन्यासाठी अथवा देशांतर्गत सुरक्षेच्या कामांसाठी रोबोट तंत्नज्ञानाचा वापर कधी सुरू करणार, अशी चर्चा तर सोशल मीडियावरही पाहायला मिळते. मात्र संरक्षणासारखी मूलभूत गोष्टसुद्धा तंत्रज्ञान कसं बदलत आहे, त्याची ही फक्त एक झलक.1. देशाच्या अंतर्गत अथवा सीमांवरती टेहळणीसाठी ड्रोन रोबोट्स वापरले जात आहेत, जे आग, भूकंप अशा आपत्तीतदेखील मदत करण्यास सक्षम आहेत. 2. अलीकडे फ्रान्समध्ये नात्नो डॅमला लागलेल्या आगीच्या वेळी तिथल्या अग्निशमन दलाच्या मदतीला आलेले रोबोट्स आणि त्यांचं जबरदस्त मदतकार्य सगळ्या जगानं पाहिलं.3. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या निगराणीसाठी लवकरच रोबोट्स भारतीय सैन्यात दाखल होण्याची शक्यता आहे. सीमांची निगराणी करणे, तिथे तैनात असलेल्या सैनिकांच्या जिवांचं रक्षण करणं हे या रोबोट्सचं प्रमुख कार्य असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज अशा या रोबोट्सवरती सध्या भारतीय शास्रज्ञ काम करत आहेत. बेंगलुरू स्थित उील्ल31ं’ फी2ीं1ूँ छुं1ं318 ा ीिील्ल2ी ढरव इँं1ं3 ए’ीू31ल्ल्रू2 छ्र्रे3ी ि(इएछ) मधील 80 लोकांची टीम सध्या या रोबोटच्या तंत्नज्ञानावरती काम करते आहे. या टीमची संख्या वाढवून लवकर 100 केली जाण्याची शक्यता आहे. हा पेट्रोलिंग रोबोट सेन्सर्सनी सुसज्ज असणार असून, तो कंट्रोल सेंटरशी जोडलेला असणार आहे. या सेंटरशी संवाद साधणं, माहिती देवाण-घेवाण करणं हे कामदेखील हा रोबोट सहजतेनं पार पाडू शकणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशांतर्गत एखादा अतिरेकी हल्ला झाला, तर तिथंदेखील या रोबोटची मदत घेता येणार आहे. 4. सध्या या रोबोट्स निर्मितीची छोटी ऑर्डर दिल्यास, तिचा खर्च अंदाजे 70 ते 80 लाख रु पयांच्या घरात जाणार आहे. मात्न सैन्याने मोठय़ा प्रमाणावरती हे रोबोट्स वापरायचे ठरवून मोठी ऑर्डर दिल्यास, ही किंमत खूप मोठय़ा प्रमाणात खाली येण्याची शक्यता असल्याचं शास्रज्ञांचं म्हणणं आहे. सध्या शास्रज्ञांनी प्राथमिक स्तरावरती अशा प्रकारचा एक रोबोट तयार करण्यात यश मिळवलं असून, त्याच्या पुढील प्रगत पिढीच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत या रोबोटचा प्रोटोटाइप तयार करून, त्याच्या चाचण्यादेखील सुरू करण्याचं उद्दिष्ट शास्रज्ञांनी समोर ठेवलं आहे. या रोबोट्सच्या प्रत्यक्ष सीमेवरील चाचण्या या फेब्रुवारी 2020 मध्ये अपेक्षित आहेत.. 5. या रोबोट्सच्या निर्मितीबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित इतरही अनेक तंत्नज्ञान आणि शस्र सैन्यदलासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असल्याचं कंपनीतर्फे नमूद करण्यात आलं आहे.
*******************
गूगलमध्ये यूजरची माहिती साठवली जाते का? मला त्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल?
माहितीच्या साठय़ाचं अर्थात डेटाबेसचं प्रचंड वाढलेलं महत्त्व बघता, खरं तर इंटरनेटवर खासगी माहितीची सुरक्षा हा गहन प्रश्न बनत चालला आहे. गूगलसारखी दिग्गज कंपनीदेखील यूजर्सची माहिती अनेक स्वरूपात साठवत असते. तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइट्स, गूगल मॅप्सवरती सर्च केलेली ठिकाणं, तुमचे विविध वेळी नोंदवण्यात आलेले लोकेशन, तुम्ही कोणकोणत्या अॅप्सवरती आणि किती वेळासाठी लॉग-इन केलेत अशी अनेक प्रकारची माहिती गूगलमध्ये संग्रहित होत असते. या माहितीचं नियंत्नण करण्यासाठी गूगलने यूजर्सला अगोदर सुविधा दिलेली आहे. त्यातलीच ही एक सुविधा.ऑटो डिलीटआता गूगलने यूजर्सला ‘ऑटो डिलीट’चा अनोखा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यासाठी यूजरला आपल्या गूगल अकाउंटमध्ये लॉग-इन करावं लागणार आहे. त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आणि तेथील ‘वेब अॅड अॅप अॅक्टिव्हिटी’ या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये असलेल्या ‘ऑटो डिलीट’ हा डेटा डिलीट करण्याचा पर्याय निवडून या सुविधेचा वापर सुरू करता येणार आहे. सध्या गूगलने यूजरला तीन महिने ते 18 महिन्यांच्या अवधीचा पर्याय दिलेला आहे. तीन महिन्यांचा पर्याय आपण निवडला तर बरोबर तीन महिन्यांनंतर आपली गूगलवर असणारी वेब व इतर अॅपच्या अॅक्टिव्हिटीची सर्व संग्रहित माहिती आपोआप डिलीट होणार आहे. सध्या हे फीचर फक्त लोकेशन हिस्ट्रीपुरतंच मर्यादित असलं तरी, काही काळातच वेब आणि अॅप्सच्या माहिती संग्रहालादेखील डिलीट करण्यास ते सक्षम असेल.
(लेखक तंत्रज्ञानविषयक लेखक/मुक्त पत्रकार आहेत.)