शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

अकिला

By admin | Published: August 11, 2016 6:26 PM

इंटरनेटपासून दूर असलेल्यांना थेट आकाशातून उडता उडता ‘कनेक्टिव्हिटी’ देणारा मार्क झुकेरबर्गचा नवा ड्रोन

 - मयूर देवकर

२७ आॅगस्ट १९७६ :याच दिवशी आज आपण ज्याला इंटरनेट म्हणतो त्याचा जन्म झाला होता.इंटरनेटचा पहिला यशस्वी प्रयोग कुण्या लॅब वा सिक्रे ट ठिकाणी नाही तरत्याच्या स्वभावाप्रमाणेच मोकळ्या, सार्वजनिक ठिकाणी झाला.सिलिकॉन व्हॅलीमधील ‘रोसेटीज् बीअर गार्डन’ असं त्या ठिकाणाचं नाव.टेक्नोजगाच्या पंढरीतील तंत्रज्ञ, संशोधक, इंजिनिअर्स, आँत्रप्रनर्स, नर्डस्चा तो कट्टा!सैन्यदलासाठी जलद संदेशवहनाचे साधन म्हणून उदयास आलेल्या इंटरनेटनेगेल्या चार दशकांत जगाच्या प्रत्येक गोष्टींमध्ये शिरकाव केला आहे. २जी, ३जी वरून ४जी पर्यंत आपण जाऊन पोहचलो आहोत.परंतु अजुनही चारशे कोटी लोक असे आहेत, जे या इंटरनेट नावाच्या झंझावातापासून दूर आहेत.. म्हणजेच एका अर्थाने ‘कनेक्टेड’ जगापासून तुटलेले आहेत.जगातील अनेकांची भाग्यरेखा बनलेली ‘कनेक्टिव्हिटी’ अजूनही ज्यांच्या नशिबी नाही अशांना जगाशी ‘जोडण्या’साठी आणि अर्थातच आपलं मार्केट वाढवण्यासाठी मार्क झुकेरबर्गने आता कंबर कसली आहे.त्याचा ड्रीम प्रोजेक्ट ‘असलेल्या ‘अकिला’ ड्रोनने नुकतीच पहिली यशस्वी गगन भरारी घेतली आणि तंत्रज्ञान युगात नव्या क्रांतीची सुरूवात झाली. केवळ पोस्ट, कमेंट, लाईक एवढयापुरतेच आता फेसबुक राहिलेले नाही, तर ‘अकिला’सह एरोस्पेस कंपनी होण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू झाली आहे.शंभर कोटींपेक्षा जास्त युजर्स असणाऱ्या फेसबुकच्या ‘अकिला’ या लेटेस्ट जादूबद्दल आणखी जाणून घ्यायचंय?सुमारे दहा वर्षांपूर्वी मार्क झुकेरबर्गने एका हॉस्टेल रुममधून फेसबुकची सुरूवात केली. गर्लफ्रेंडशी झालेल्या ब्रेकअपचा राग काढण्यासाठी तयार केलेला हा प्रोग्राम पुढे अब्जावधी लोकांना जोडेल असा विचार त्याने कधी स्वप्नातही केला नसेल. ‘आॅर्कु ट’सारखी केवळ एक सोशल मीडिया साईट न राहता फेसबुकने आपला आवाका विस्तारत ठेवला. नवनवीन प्रयोग करून पाहिले. त्यांपैकी काही चालले तर काहींना अपयश आले. पण झुकेरबर्गने कधी हार मानली नाही. इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगातील सातशे कोटी लोकांना एकत्र जोडण्याचे (आणि अर्थातच आपले मार्केट वाढवण्याचे) झुकेरबर्गचे स्वप्न आहे. ‘इंटरनेट डॉट आॅर्ग’, ‘फ्री बेसिक्स’च्या मागोमाग आता त्याने लढवली आहेएक उडती शक्कल!२८ जून रोजी झुकेरबर्गच्या ‘अकिला’ने पहिले यशस्वी उड्डाण केले. जून महिन्याची २८ तारीख होती. रात्रीचे दोन वाजले होते. मार्क झुकेरबर्ग कधी एवढ्या लवकर उठत नाही पण त्यादिवशी त्याला झोप लागणं शक्यच नव्हतं. तो विमानात बसला आणि उजाडण्याच्या काही मिनिटांपूर्वी युमा (अ‍ॅरिझोना) येथील सैनिकी विमानतळावर पोहचला. सुमारे दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांतून तयार करण्यात आलेल्या ‘अकिला’ या मानवरहित विमानाची पहिली उड्डाण चाचणी पाहण्यासाठी झुकेरबर्ग वैयक्तिक हजर राहणार असल्यामुळे त्याचे इतर सहकारी थोडेसे नर्व्हस होते. दोन डझन लोकांच्या टीमने मिळून द. कॅलिफोर्निया ते इंग्लडपर्यंत विविध ठिकाणी काम करून या ड्रोनची निर्मिती केली. इंटरनेटपासून वंचित लोकांना माहिती-तंत्रज्ञानाच्या महासागरात सामावून घेण्याच्या महत्त्वकांक्षी योजेनेचा हा पहिला टप्पा.तंत्रज्ञ, अभियंते आणि क्रू सदस्यांनी शेवटची पाहणी करून सकाळी सहाच्या सुमारास ‘अकिला’ला डॉलीच्या साहाय्याने धावपट्टीवर आणले. बोर्इंग ७३७ विमानाच्या पंखांपेक्षा मोठे पंख (१४१ फूट) असणाऱ्या अकिलाचे वजन मात्र एका ग्रँड पियानोएवढेच आहे. ट्रकच्या मदतीने ओढून टेकआॅफसाठी लागणारा पुरेसा वेग प्राप्त झाल्यावर पायरोटेक्निक केबल कटर्सद्वारे (स्वीब्स) डॉलीशी बांधण्यात आलेले स्ट्रॅप्स कापले जातात आणि अकिला आकाशात झेपावते. तेथे उपस्थित सर्वच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो. काहींचे डोळे पाणावतात. एकमेकांना टाळ्या देत, मिठी मारत हा ऐतिहासिक क्षण ते साजरा करतात. यावेळी मार्क झुकेरबर्गच्या चेहऱ्यावरील हास्य सर्व काही सांगून जाते. सुरुवातील केवळ अर्धा तास उड्डाण करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, २१५० फूट उंचीवर अकिला स्थिरावल्यानंतर ते सुमारे ९६ मिनिटे हवेत राहिले. या चाचणीमध्ये हवेचा मारा, मोटर्सची कार्यक्षमता, स्वयंचलित प्रणाली, बॅटरीज्, रेडिओ अशा सर्वच गोष्टी तपासण्यात आल्या. अपेक्षेपेक्षा खूप चांगला परफॉर्मन्स पाहून मार्क अन् टीमचा उत्साहदेखील दुणावला.या यशस्वी उड्डाणापूर्वी अनेकवेळा प्रोटोटाईप्सच्या साहाय्याने अकिलाची चाचणी घेण्यात आली होती. प्रत्यक्षात उड्डाण करण्याची मात्र ही पहिलीच वेळ होती. तसे पाहिले तर ही फार मुलभूत स्वरुपाची चाचणी होती. कारण यावेळी सौर पॅनेल नव्हते (मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या परंतु अतिउच्च क्षमतेच्या लिथियम बॅटरीजद्वारे ते उडविण्यात आले) इंटरनेट अँटेना, हाय-अ‍ॅल्टिट्यूड बॅटरीज् आणि इतर उपकरणेदेखील नव्हती. या सर्व उपकरणांसह अकिला सुमारे तीन महिन्यांकरिता सौरऊर्जेवर हवेत राहण्याची कंपनीची अपेक्षा आहे. इंटरनेटसाठी अकिलाच का?इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे इतरही अनेक मार्ग असू शकतात. त्यासाठी विशेष ड्रोन विकसित करण्याची गरजच काय अशी शंका मनात येऊ शकते. परंतु झुकेरबर्गने फार अभ्यास, संशोधन आणि विचार करून हा निर्णय घेतला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सॅटेलाईटद्वारे विशाल भूभागावर इंटरनेट सुविधा पुरवली जाणे शक्य आहे; पण ते केवळ कमी लोकसंख्या असलेल्या भागात प्रभावी ठरते. लोकसंख्या जेवढी जास्त तेवढी बँडविड्थ जास्त वाटली जाणार. आता राहिला मोबाईल टॉवर्सचा पर्याय तर तो दाट शहरी लोकसंख्येसाठी उपयुक्त आहे; परंतु संपूर्ण पृथ्वीवर इंटरनेटचे जाळे पसरविण्यासाठी असे टॉवर्स उभा करण्याचा पर्याय फार खर्चिक आणि अव्यवहार्य आहे.दोन वर्षांपूर्वी झुकेरबर्गने इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचे विश्लेषण करणारा पेपर लिहिला होता. त्यामध्ये त्याने असा निष्कर्ष काढला की, मध्यम आकाराची शहरे आणि सदूर ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी हाय-अ‍ॅल्टिट्यूड ड्रोनचा पर्याय सर्वात प्रभावी आहे. सॅटेलाईटपेक्षा कमी उंचीवर उडत असल्यामुळे त्यांचे सिग्नल अधिक स्ट्राँग आणि दाट लोकसंख्येसाठी सक्षम असतील.अकिलामध्ये वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेझर कम्युनिकेशन सिस्टिमद्वारे दहापट अधिक वेगाने (१.३ जीबी/सेंकद) इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात येईल. तसेच ड्रोन ६० हजार फूट (१८ किमी) ते ९० हजार फुट (२७ किमी) एवढ्या उंचीवर उडणार असल्यामुळे हवाई वाहतूकीला त्यांचा व्यत्यय आणि ड्रोनला हवामानाचा व्यत्यय नसणार. या सर्व गोष्टींचा विचार करता झुकेरबर्गने संपूर्ण ताकदीनिशी ‘प्रोजेक्ट अकिला’ हाती घेण्याचे ठरवले.त्यासाठी त्याने स्वत: नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’, एमआयटीच्या ‘मीडिया लॅब’ यासारख्या ठिकाणांहून तज्ज्ञांची निवड केली. त्याबरोबरच फेसबुकने २० मिलियन डॉलर्स खर्च करून‘असेंटा’ नावाची एव्हिएशन कन्सलटन्सी कंपनीदेखील विकत घेतली. याच कंपनीने अँडी कॉक्स या मेकॅ निकल इंजिनिअरच्या नेतृत्त्वाखाली सौरऊर्जेवर चालणारे विमान सलग दोन आठवडे उडवण्याचा विक्रम घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे कॉक्स ‘अकिला प्रोजेक्ट’चा सेनापती बनला. विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि अभियंत्यांनी सुमारे १४ महिन्यांतच अकिला ड्रोन यशस्वीरित्या हवेत उडवले.कसे आहे अकिलाचे तंत्रज्ञान?आकाशात घिरट्या मारणारे अकिला ड्रोन नवीन लेझर-बीम तंत्रज्ञानाद्वारे ९६ किमी त्रिज्येतील लोकांना जलद इंटरनेट सुविधा पुरवणार आहेत. अकिलाने प्रक्षेपित केलेल्या सिग्नल्सला जमिनीवर असणारे टॉवर्स आणि अँटेना वाय-फाय किंवा ४-जी नेटवर्कमध्ये रुपांतरित करतील, अशी सर्व साधारण संकल्पना आहे. पुढे चालून थेट मोबाईलवरच इंटरटेन सिग्नल पाठवण्याचीदेखील त्यांची योजना आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर हवेतील मोबाईल टॉवर्सच म्हणा ना. इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाचा अभिनव अविष्कार असे त्यांचे वर्णन करता येईल. ड्रोन बनवणे तशी खूप खर्चिक बाब आहे. परंतु कमीतकमी खर्चात दीर्घकाळ हवेत राहू शकणारे ड्रोन्स विकसित करण्यासाठी मानवी प्रतिभेचा कस लावावा लागला. अनेक परीक्षणे, अंदाज-आराखडे, अनुमानांनंतर अकिला अस्तित्त्वात आले. (चौकट पाहा)जग जोडण्याची महत्त्वकांक्षाझुकेरबर्गने वेळोवळी ही महत्त्वाकांक्षा बोलून दाखविली आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने ‘इंटरनेट डॉट आॅर्ग’च्या माध्यमातून यादृष्टीने सुरुवात केली होती. त्याद्वारे इंटरनेटपासून वंचित लोकांना आॅनलाईन सुविधा प्रदान करण्यात आल्या. त्याबरोबरच डेटा खर्च कमी करण्यासाठी ओपन सोर्स ब्लूप्रिंटस् तयार केल्या, वाय-फाय नेटवर्कपेक्षा दहापट जास्त वेगवान इंटरनेट सुविधा देण्यासाठी सध्या ‘टेराग्राफ’ तंत्रज्ञानावर काम केले जात आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या मुद्यावरून ‘फ्री बेसिक्स’ची घोडदौड जरी सध्या रखडली असली तरी लवकरच याबाबत तोडगा काढण्यात येईल असे झुकेरबर्ग सांगतो. आणि आता अकिलाच्या माध्यमातून फेसबुकच्या वाटचालीमध्ये नवे पर्व सुरू झाले. जगातील प्रत्येकाला इंटरनेटद्वारे जोडण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून कंपनी काम करत आहे. पण का? असे जर त्याला विचारले तर तो म्हणतो, इंटरनेटमुळे लोकांसमोर अमर्याद संधी उपलब्ध होतात. अनेक संशोधनातून असे दिसून आलेले आहे की, इंटरनेटशी जोडले गेलेल्या प्रत्येक दहा व्यक्तींपैकी एक जण दारिद्र्यातून बाहेर पडतो तर एक नवीन रोजगार निर्माण होतो. म्हणजे आज या घडीला जे चारशे कोटी लोक इंटरनेटपासून वंचित आहेत, त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर इंटरनेटचे जाळे सर्वदूर पसरविण्यावाचून पर्याय नाही. जगात अशी कितीतरी गावे आहेत, की जेथे गुणवत्तापूर्ण शाळा नाहीत. तेथे इंटनेटच्यामाध्यमातून आपण जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारे इंटरनेट आपल्या मदतीला धावून येऊ शकते.अकिला समोरील आव्हानेअकिला समोर सगळ्यात मोठे आव्हान आहे ते सरकारी नियमांचे अनेक अडथळे पार करण्याचे. पूर्णपणे विकसित झाल्यावर अशा प्रकारच्या ड्रोन्सचा कितपत आणि कोणी उपयोग करायचा यावर प्रश्न केले जाऊ शकतात. त्यासाठी फेसबुक आणि गुगल यावर तोडगा काढण्यासाठी एकत्र आले आहेत. जगभरातील हवाई नियामक मंडळ/समित्यांशी विचारविनिमय आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी लागणारे आवश्यक स्पेक्ट्रम व हवाई चाचण्या करण्याची परवानगी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. झुकेरबर्ग म्हणतो, ‘भारतामध्ये आम्हाला ‘फ्री बेसिक्स’च्या वेळी जो अनुभव आला त्यातून आम्ही धडा घेत नव्या प्रकारे सरकारशी बोलणी करणार आहोत. इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यामुळे फायदा लोकांचाच होणार आहे. संपूर्ण इंटरनेट आम्ही आमच्या हाती केंद्रीत करू इच्छितो असा जो प्रचार केला जात आहे तो साफ चूक आहे. खरे तर आम्ही ‘अकिला’चे तंत्रज्ञान वापरण्याचा परवाना सरकार आणि दूरसंचार कंपन्यांना देणार आहोत.’आता हा विचार जरी वरकरणी समाजहिताचा वाटत असला तरी अकिलाचा सर्वाधिक फायदा फेसबुकलाच होणार आहे. जेवढे जास्त लोक इंटरनेटशी जोडले जातील तेवढा आॅनलाईन जाहिरातींचा नफा वाढेल. झुकेरबर्ग सध्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानावरदेखील जोर देत आहे. भविष्यात या प्रगत तंत्रज्ञानाचा पुरेपुर फायदा घेण्यासाठी वेगवान इंटरनेट खूप गरजेचे आहे. म्हणजे अकिलामुळे फेसबुकला दूरागमी लाभ होत राहणार यात काही शंका नाही.याबरोबरच अनेक तांत्रिक आव्हानांनासुद्धा कंपनीला सामोरे जावे लागणार आहे. अकिलाच्या पहिल्या यशस्वी उड्डाण चाचणीमध्ये जरी सर्व अपेक्षेपेक्षा जास्त चांगले झाले असले तरी लँडिंगच्यावेळी समस्या उद्भवली होती. तसेच भविष्यात हजारो ड्रोन्सचा ताफा निर्माण करणे तशी सोपी गोष्ट नाही. सौरऊर्जेवर सलग तीन महिने ड्रोन चालवण्याची कल्पना कागदावर जरी चांगली वाटत असली तरी ती प्रत्यक्षात आणणे महाकठिण बाब आहे.--------------अकिलाही जादू चालते कशी?१. वजन :‘अकिला’ला दीर्घकाळ हवेत राहण्यासाठी त्याचे वजन शक्य तितके कमी ठेवण्याची गरज होती. त्याकरिता संपूर्ण विमानाची बॉडी कार्बन फायबर क म्पोजिटपासून तयार करण्यात आली, ज्यामुळे त्याचे वजन ४५० किग्रॅपेक्षा कमी भरते. याहूनही कमी वजन करण्याचा अभियंते प्रयत्न करत आहेत.२. शक्ती :संपूर्णत: सौरऊर्जेवर चालणाऱ्या या विमानात प्रोपेलर्स, कम्युनिकेशन्स पेलोड, वीज, हीटर आणि इतर कार्यप्रणाली रात्रीच्या वेळी सुरळीत चालू ठेवण्यासाठी दिवसभर सूर्यप्रकाशापासून पुरेशी ऊर्जा साठवून ठेवण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे यासाठी केवळ तीन हेअरड्रायर्ससाठी लागणाऱ्या ऊर्जेएवढीच ऊर्जा लागते. कमीतकमी ऊर्जेचा वापर करण्यावर कंपनीचा भर आहे.३. नियंत्रण :हे जरी स्वयंचलित विमान असले तरी जमिनीवर असणारे डझनभर इंजिनिअर्स, पायलटस्, तंत्रज्ञांच्या हाती त्याचे नियंत्रण राहणार. एका स्पेशल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते ड्रोनची दिशा, वेग, उंची, मार्ग व त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे काम करतील. टेकआॅफ आणि लँडिंग मात्र सॉफ्टवेअरद्वारे आॅटोमॅटिकच केली जाईल.४. वेग :‘अकिला’ला संथ गतीने उडताना पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. विमान म्हटले की त्याचा वेग सुसाट असला पाहिजे अशी आपली सर्वसाधारण अपेक्षा असते. परंतु ऊर्जेचा वापर कमीतकमी करण्यासाठी ‘अकिला’चा वेग हेतुपूर्वक अतिशय कमी ठेवण्यात आला आहे. सर्वोच्च उंचीवर जिथे तुरळक हवा असेल तेथे सर्वाधिक १२८ किमी/तासाचा वेग ते गाठू शकते.५. आराखडा :गरजेनुसार ‘अकिला’ला समुद्रसपाटीपासून असलेली उंची (अ‍ॅल्टिट्यूड) बदलावी लागेल. त्यामुळे उच्च व थंड अ‍ॅल्टिट्यूड तसेच कमी व उष्ण अ‍ॅल्टिट्यूडवर जिथे हवा दहापट अधिक घन असते, अशा दोन्ही परस्परविरोधी परिस्थितीत उडण्यास ते सक्षम असेल.‘प्रोजेक्ट लून’ ड्रोनद्वारे इंटरनेट पुरवण्याच्या कल्पनेवर काम करणारी फेसबुक ही काही एकमेव कंपनी नाही. गुगलनेसुद्धा ‘प्रोजेक्ट लून’ अंतर्गत हाय-अ‍ॅल्टिट्यूड हेलियम बलूनच्यामाध्यमातून दुर्गम भागांत इंटरनेट सुविधा देण्यावर काम करत आहे..अकिलाचे फायदे :1. आपात्कालिन परिस्थिती उद्भवलेल्या भागात अकिला ड्रोनद्वारे हायस्पीड इंटरनेट सुविधा त्वरित पुरवली जाऊ शकते.2. भारतातील ग्रामीण भागासारख्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी बेभरवशाच्या ठिकाणी तर अकिला वरदान ठरणार आहे.3. पहिल्या टप्प्यात सुमारे १२० कोटी लोकांना इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार.4. सध्या आहे त्यापेक्षा दहापट जास्त वेगाने इंटरनेट मिळणार.5. कनेक्टिव्हिटी वाढल्याने आॅनलाईन सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.6. रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.