शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

आमीर

By admin | Published: March 14, 2017 4:26 PM

पापा कहते है ते खतरनाक बापूपर्यंतचा महत्वाकांक्षी परफेक्शनिस्ट प्रवास

‘पापा कहते है बडा नाम करेगा’ असं गात आपल्या भेटीला आलेला एक चॉकलेट बॉय. तेव्हा तो किती क्यूट वाटला होता. जंगलात हरवलो आणि एकत्र रहायला मिळतंय म्हणून आनंदानं गाणारी, गजब का है दिन देखो जरा म्हणत नाचणारी राजची मैत्रीण. पण तो मात्र तेव्हाही प्रॅक्टिकल. तिला सांगणारा, ‘ क्या कहूं मेरा जो हाल है, रात दिन तुम्हारा खयाल है, फिर भी जाने जां, मै कहां और तूम कहां..’

-हे त्याचं असं फोकस्ड असणं त्या सिनेमापासूनच सुरु झालं असेल का? की असेलच त्याच्यात ते जंगलात हरवलेल्या वाटांतून आपला रस्ता अचूक शोधून काढणं... पण तसं असतं तर त्याला आपली वाट चटकन सापडली असती. यशाचं सूत्रही पहिल्या फटक्यात हातात आलं असतं. पण तसं झालं नाही पहिला सिनेमा सुपरडूपर हिट ठरला पण त्याचक्षणी अपयशानं त्याची पाठ धरलीच. पुढचे त्याचे अनेक चित्रपट, त्यात त्या फॉर्म्युल्याचे चित्रपट बेदम मार खावून आपटले. वन फिल्म वंडर तो ठरेल की काय अशी शक्यता होतीच.

असंख्य चूका केल्या त्यानं सिनेमे निवडताना पण त्यातून तो हेच शिकला की चूका होवूच शकतात. पण त्या वेळीच सुधारायला हव्यात.. त्यानं त्या सुधारल्या.. दिल ते दंगल हा त्याचा प्रवास फक्त त्याच्या सिनेमाच्या नावांतून फक्त डोळ्यासमोर आणा.अंदाज अपना अपनाअपनावाला टाईमपास टपोरी, ते रंगीलातला टपोरी मून्ना! ज्याला काही स्वप्नबिप्न नाहीत, अपून पब्लिक है पब्लिक म्हणून मस्त जगणारा. जो जिता वहीं सिंकदरमधला बदमाश पण रेस जिंकणारा संजयलाल, तापट राजा हिंदुस्थानी, लगानमधला महत्वाकांक्षेनं झपाटलेला अत्यंत मानी आणि धाडसी भूवन, थ्री इडियट्समधला रॅँचो, आणि दिल चाहता है, रंग दे बसंती, सरफरोश, तारें जमीं पर, ते दंगल..किती नावं, किती रुपं..पण प्रत्येकात तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दाखवतो, परफेक्शन.जे करायचं ते झोकून देवून करायचं.मागे हटायचं नाही. लोक काही का काम करेनात, कसं का करेनात,त्यानं जे सिनेमे केले ते त्याच्या स्टाईलनं केले. वर्षाला एक सिनेमा हा जुगारच होता,पण त्यानं तो खेळला आणि त्या धोक्यातून त्यानं जे स्वत:ला घडवलं ती त्याची आजची ओळख आहे.कुणाशी स्पर्धाबिर्धा करण्याच्या भानगडीतच तो पडत नाही, पडला नाही. ना पुरस्कारांची त्यानं फिकीर केली. त्यानं लक्ष दिलं ते फक्त त्याच्या कामावर..त्याच्या कामातलं हे परफेक्शन आपल्यात आलं तर?न येण्यासारखं काही नाही, पण आपण तेवढं आपल्या कामावर फोकस करू शकलो तर..-चिन्मय लेले