शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

अ‍ॅनिमल फार्म

By admin | Published: November 03, 2016 6:00 PM

निर्माणने सुचवलेल्या यादीतील काही पुस्तकं या तरुण मुलांनी वाचावीत असा आग्रह असतो. त्यातलंच एक पुस्तक, अ‍ॅनिमल फार्म, ते वाचून विचारांना जी दिशा मिळाली, त्याविषयीचं हे मनोगत...

- अनुपमा कोकाटे 
 
महाराष्ट्रातील अस्वस्थ युवांनी स्वत:चा व स्वत:च्या भवितव्याचा शोध घ्यावा यासाठी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी सुरू केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे निर्माण. काल्पनिक व थेरॉटिकल विषयांपासून फारकत घेऊन स्वत:विषयी व आजूबाजूच्या खऱ्याखुऱ्या समाजाविषयीच्या शिक्षणावर या उपक्रमात भर भर दिला जातो. खेड्यांत जाऊन स्वत: अनुभव घेऊन निर्माणी शिकतात. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या अनुभवातून शिकतात. बऱ्याचदा जिथे आपण स्वत: आणि तज्ज्ञही पोचू शकणार नाहीत तिथे पुस्तके पोचतात. वैचारिक स्पष्टतेसाठी चांगली पुस्तके वाचण्यावर निर्माणमध्ये नेहमी भर दिला जातो. निर्माणने सुचवलेल्या यादीतील काही पुस्तकं या तरुण मुलांनी वाचावीत असा आग्रह असतो. त्यातलंच एक पुस्तक, अ‍ॅनिमल फार्म, ते वाचून विचारांना जी दिशा मिळाली, त्याविषयीचं हे मनोगत...
 
 
जॉर्ज ऑरवेल यांनी लिहिलेली, प्राण्यांच्या दुनियेत घडणारी एक छोटीशी परंतु खूप मोठे वास्तव समजावून देणारी कथा!
कॉलेजातल्या क्रमिक अभ्यासात अनेकांनी वाचली, अभ्यासली असेल ही गोष्ट.
या कथेतील प्राणी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरु द्ध बंड पुकारून आपल्या मालकाला कायमचं पळवून लावतात आणि अ‍ॅनिमल फार्म नावाचं स्वत:चं स्वतंत्र राज्य स्थापन करतात. या नव्या राज्याचं नेतृत्व स्नोबॉल आणि नेपोलियन नावाच्या प्रभावशाली डुकरांच्या हाती येते. परंतु त्यांचे कायमच मतभेद होत असत. अशाच एका मतभेदात जेव्हा स्नोबॉलला इतर प्राण्यांचा अधिक पाठिंबा मिळतो तेव्हा चिडलेला नेपोलियन त्याच्यावर हिंस्त्र कुत्र्यांकरवी हल्ला चढवतो. या हल्ल्यानंतर स्नोबॉल तेथून कायमचा पोबारा करतो आणि नेपोलियनच्या हाती अ‍ॅनिमल फार्मचं नेतृत्व येतं.
हा नेपोलियन हळूहळू लोकशाहीचं रूपांतर हुकूमशाहीत कसं करतो, हे त्या अ‍ॅनिमल फार्ममधील अज्ञानी प्राण्यांच्या लक्षातही येत नाही. ‘स्क्विलर’ नावाचा नेपोलियनचा पी. ए. गोड बोलून, नेपोलियनच कसा योग्य आहे हे पटवून देऊन प्राण्यांची दिशाभूल करत राहतो. जर एखाद्या प्राण्याच्या हे लक्षात येऊन त्यानं विरोध करण्याचा प्रयत्न केलाच तर हिंस्त्र कुत्री त्याचा फडशा पाडत. बेन्जामिन नावाच्या गाढवाला मात्र सारं काही कळत असूनही तो कायम तटस्थ भूमिका घेत असतो.
याच अ‍ॅनिमल फार्ममध्ये बॉक्सर नावाचा एक अतिशय कष्टाळू घोडा आहे. आयुष्यभर तो ‘फार्म’च्या विकासासाठी नेपोलियनच्या आदेशाप्रमाणे घाम गाळत राहतो आणि जेव्हा त्याची काम करण्याची क्षमता संपते तेव्हा नेपोलियनकरवीच त्याचा अंत होतो. बॉक्सरच्या अगदी विरुद्ध स्वभावाची कामचुकार, स्वार्थी मोली नावाची घोडी काही काळानंतर प्राण्यांमधून पुन्हा माणसांकडे जाते.
पूर्वीच्या काळापेक्षाही आता त्यांच्यावर अधिक अन्याय होऊ लागतो. परंतु आपण प्राण्यांच्या ‘स्वतंत्र’ राज्यात राहत आहोत, यावरच ते समाधान मानून घेत राहतात. नेपोलियनच्या मते मात्र ‘अ‍ॅनिमल फार्म’ची भरभराट होत असते. खरं म्हणजे ही भरभराट फक्त नेपोलियन आणि त्याच्या सोबतच्या डुकरांची चालू असते. बाकी सगळे प्राणी कष्टातच जगत असतात. अन्याय सहन करणं हेच आता त्यांचं जीवन होतं.
**
खरे म्हणजे या कथेत जॉर्ज आॅरवेल यांनी प्राण्यांची रूपके वापरून त्या काळातील रशियन राज्यक्र ांती आणि समाजजीवनाचं चित्रण केलं आहे. असं असलं तरी आपल्याकडच्या ‘गल्ली ते दिल्ली’ पर्यंतच्या राजकारणातही ते अनेकदा लागू पडतं. 
नेपोलियनसारखे केवळ स्वत:चं घर भरणारे आणि जनतेला उपाशी ठेवणारे राज्यकर्ते, केवळ मतभेद आहेत म्हणून स्नोबॉलसारख्यांच्या चांगल्या योजनांना ‘विरोधी पक्षाची’ भूमिका घेऊन अडवणूक करणारे नेते, स्क्विलरसारखे जनतेची दिशाभूल करणारे धूर्त पुढारी आणि झेड दर्जाची सिक्युरिटी घेऊन, दादागिरी आणि दमदाटीच्या बळावर निवडून येणारे राजकीय नेते, हे आपल्यासाठी आता सवयीच्या गोष्टी झाले आहेत.
हे सारं वाचताना मला वाटलं की, आपण कोण आहोत?
स्वत:ला सुशिक्षित समजणारे पण स्वत: काहीही न करता केवळ राजकारणी लोक किती वाईट आणि सामान्य जनता किती मूर्ख यावरच चर्चा झाडणारे बेन्जामिनसारखे गाढव? भारतात जन्म घेऊन, शिक्षण घेऊन, परदेशात स्थायिक होऊन त्या देशांमध्ये सेवा पुरवणारे मोली? 
असे अनेकजण आपल्याला कायम भेटतच असतात. बॉक्सरप्रमाणे सक्षम असूनही आपली सगळी ऊर्जा नेत्यांचे आदेश पाळण्यात खर्च करणारे किंवा मेंढ्यांप्रमाणे नेत्यांच्या नावाने घोषणा देणारे, स्वत:च्या बुद्धिमत्तेचा जराही वापर न करणारे लोकही आपल्यातच आहेत. प्रामाणिक कष्टांना जर डोळसपणाची साथ नसेल तर आपली फसवणूक होणारच.
मग आपण काय भूमिका घेणार? आपण काय करणार?
हालअपेष्टा असह्य झाल्याने अ‍ॅनिमल फार्ममधील सामान्य प्राण्यांप्रमाणे आत्महत्त्या करणारे शेतकरी एकीकडे, तर जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत नाव असणारे लोक दुसरीकडे ! कागदोपत्री किंवा आकडेवारीत दिसणारी आर्थिक प्रगती, प्रत्यक्षात मात्र हालअपेष्टा सहन करणारी जनता असे अनेक संदर्भ देता येतील.
प्रत्येक वेळी हे पुस्तक वाचताना मला त्या पुस्तकाचा वेगळा अर्थ समजत जातो. नवीन संदर्भ सुचतात. आपण आपला भवताल वेगळ्या नजरेनं समजून घेऊ शकतो. विचार करू शकतो. 
पुस्तक आपल्या विचारांना दिशा देतात ती अशी..
 
(मूळची अहमदनगरची असलेली अनुपमा सध्या पुण्याला बी. जे. मेडिकल कॉलेज येथे एम.बी.बी.एस.ची विद्यार्थिनी आहे. ती निर्माणच्या सहाव्या मालिकेतील शिबिरार्थी आहे.)