शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

आता येणार स्वदेशी अँप स्टोअर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 1:57 PM

गुगलने अँप डेव्हलपर्सशी पंगा घेतल्यानं नवा वाद

- प्रसाद ताम्हनकर

अँप  डाऊनलोड करायचं असलं की आपण गुगल अथवा अँपलच्या अँप  स्टोअरवर जातोच; पण आता गुगलनं नुकतंच नवीन धोरण जाहीर केलं. या धोरणानुसार यापुढे कोणीही डेव्हलपर गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून आपलं एखादं अँप  किंवा इतर काही कंटेण्ट विक्र करत असेल, तर त्याला त्याचा 30 टक्के हिस्सा गुगलला कर म्हणून द्यावा लागणार आहे. अनेक भारतीय डेव्हलपर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रतील कंपन्यांनी याला जोरदार विरोध दर्शवला आहे. गुगल किंवा अँप ल कंपन्यांच्या या मनमानी कारभाराला चांगलाच धडा शिकवण्यासाठी आता भारत सरकारने स्वत: स्वदेशी अॅप स्टोअर सुरू करावं, अशी आग्रहाची मागणी तंत्रज्ञान कंपन्या आणि डेव्हलपर्सनी लावून धरली आहे.  

भारतात जवळपास 50 करोड लोक स्मार्टफोन्सचा वापर करतात,  ज्यातील तब्बल 97 टक्के लोकांचा स्मार्टफोन हा अॅण्ड्रॉइड मोबाइल सिस्टीमवरती आधारित आहे. यातील काही लाख लोक हे गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून विविध गरजेचे अँप वा ई-बुक खरेदी करतात. या  आकडय़ांवरूनच आपल्याला या बाजारपेठेचा सहज अंदाज येईल. मात्र आता गुगल नवीन धोरणानुसार आपली एकाधिकारशाही राबवत आहे असा आरोप केला जातोय. भारतातील एक प्रमुख डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या ‘पेटीएम’नंदेखील गुगलच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.खरं तर भारत सरकारचं स्वत:चं एक अगदी स्वदेशी असं अॅप स्टोअर आहे.(apps.mgov.gov.in) या डोमेनवरती भारत सरकारचं  अधिकृत अॅप स्टोअर असून, त्यात सध्या 1200 पेक्षा जास्त अँप उपलब्ध आहेत. पूर्णत: सरकारी नियंत्रण असलेल्या या अॅप स्टोअरवरती सध्यातरी मुख्यत: सरकारी अॅप्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या सरकारी अँप स्टोअरवरती ’पेटीएम’ हे अॅपदेखील ब:याच काळापासून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे अँपयुद्ध आगामी काळात भडकण्याची चिन्हं आहेत. 

 

(लेखक विज्ञान/तंत्रज्ञानविषयक पत्रकार आहे.)