शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सिनेमा कीडा आहात?

By admin | Published: June 08, 2017 12:03 PM

सिनेमा बघायला आवडत नाही, असं क्वचितच आपल्याला कोणी भेटेल. सिनेमा बघून झाला की सिनेमाच्या अनेक पैलूंवर मग उलटसुलट चर्चा करणं ओघानंच आलं.

 - प्रज्ञा शिदोरेसिनेमा बघायला आवडत नाही, असं क्वचितच आपल्याला कोणी भेटेल. सिनेमा बघून झाला की सिनेमाच्या अनेक पैलूंवर मग उलटसुलट चर्चा करणं ओघानंच आलं. सिनेमातील कलाकारांच्या त्यांच्या इतर कामांशी तुलना करणं, कोणाला किती प्रसिद्धी मिळाली आहे, बॉक्स आॅफिसमधे कोणी किती गल्ला जमवला अशा चर्चा आपण तासन्तास करतो. अशाच चर्चा करण्यासाठी, त्या कलाकृतीविषयी अजून माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट मूव्ही डाटाबेस हे संकेतस्थळ पाहा.धम्माल असते तिथं. फक्त फुकट चर्चाच नाहीत, तर आपली मतं आपण इतरांशी पडताळूनही पाहू शकतो.

इंटरनेट मूव्ही डाटाबेस हे संकेतस्थळ कोल नीडमन नावाच्या सिनेरसिकाने १९९० मध्ये सुरू केले. चित्रपट रसिकांना त्यांच्या आवडत्या कलाकृतींविषयी माहिती देणं, जगात प्रकाशित झालेल्या सर्व चित्रपटांची इतरत्र एकगठ्ठा कुठेही माहिती मिळणार नाही अशी एक समग्र यादी बनवणं आणि चित्रपटांचं उत्तम रसग्रहण करता येणं हा यामागचा हेतू होता. आज हे संकेतस्थळ जगभरातील चित्रपट रसिकांना माहिती पुरवणारा सर्वात मोठा साठा बनलं आहे.

इथे तुम्ही बघितलेल्या सिनेमांची त्यांच्या प्रकारानुसार यादी करू शकता. या याद्या वाचून तुम्हाला कोणता चित्रपट बघायला आवडेल अशा सिनेमांची नावं हे संकेतस्थळ तुम्हाला सुचवतं. त्याचबरोबर सिनेमांवर चर्चा, आॅस्कर मिळविलेल्या चित्रपटांची यादी, जगातील सर्वोत्तम २५० चित्रपटांची माहिती या व अशा अनेक गमती या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

याबरोबरच तुम्हाला तुम्ही आजपर्यंत पाहिलेल्या सर्व चित्रपटांची यादी इथे तयार करता येईल. म्हणजे तुम्हाला एखादा चित्रपट कोणाला बघायला सुचवायचा असेल तर आयत्या वेळची पळापळ नाही. या संकेतस्थळावर आपण केलेली यादी पाहिली की झालं. . एवढंच नाही तर आता इथे अनेक सिटकॉम्सबद्दलची सविस्तर माहिती आणि त्याचं रेटिंग्जही पाहायला मिळू शकतं.खरंतर तुम्ही जर हार्ड कोअर मूव्ही बफ असाल ना तर हे संकेतस्थळ म्हणजे तुमच्यासाठी एक अमूल्य साठाच आहे! 

हिंदी, इंग्रजी, रशियन, फ्रेंच, जर्मन, झेक अशा अनेक भाषेतील चित्रपटांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आणि आपली चित्रपटांबद्दल रु ची वाढविण्यासाठी इंटरनेट मुव्ही डाटाबेसला नक्की भेट द्या.आणि वाचा http://www.imdb.com/