- चिन्मय लेले
सोशल मीडीया कितीही वापरत नाही असं म्हटलं तरी आपण सारे तो वापरतोच. आणि आपल्या वापरातही आपल्या व्यक्तिमत्वाची छाप असतेच. त्यामुळे आपण एरव्ही जसे असतो त्या व्यक्तिमत्वाच्या खूणा आपल्या सोशल मीडीया वापरातही दिसतातच.
तर त्यातल्याच काही वाईट सवयी आपल्याला सोशल मीडीयात वापरतानही दिसतात. मात्र त्या आपण मान्य करत नाहीत. किंवा आपल्या लक्षातही येत नाही.
पण म्हणून त्या आपल्याला नसतात असं नाही.
काय असतात त्या सवयी?
1) हमरीतुमरीवर येणं
आपल्याला व्यक्तिगत आयुष्यातही हमरीतुमरीवर येण्याची सवय असते. विनोद कळत नाहीत. तेच आपण ऑनलाइनही करतो. व्हॉट्सअॅप, फेसबुक इथं लहानसहान कारणांनी जाहीरपणे भांडत असतो.
2) ढमकन बोलणं
आता ही काय सवय. तर ती असते. अनेकांना आपण इतरांच्या पोस्टवर काहीतरी वाट्टेल ते बरळतो आहे, ढमकन बोलतो आहे हेच कळत नाही. मात्र ते इतरांचा सतत रसभंग करतात.
3) शो-ऑफ
प्रत्यक्षात काहीच खरं नसतं. बडा घर पोकळ वासा पण सोशल मीडीयात इतकं शो ऑफ करतात की लोकांना हळूहळू कळायला लागतं की, हे खोटं आहे.
4) प्रेमप्रदर्शन
काहीजण नवरा बायको, प्रियकर-प्रेयसीच नाही तर इतरांवर नसलेलंही प्रेम अती व्यक्त करतात. अघळपघळ की त्यामुळे दुसर्यांची करमणूक होते.
5) टिका करणं
सतत इतरांवर टिका करण्याची ट्रोलिंगची सवय अनेकांना लागलेली आहे. स्वतर् काहीच करत नाहीत. इतरावर मात्र सतत टिका करतात.