- प्राची पाठक
‘काय करावं आता पुढे, काहीच सुचत नाहीये.’ असं वाटतंच. एकावर एक प्रश्न मनात येत असतात. त्यांची उत्तरं आपल्याला माहीत नसतात. उत्तरं माहीत नाहीत म्हणून अनेकदा आपण सापडेल उत्तर कधीतरी किंवा कोणी आपल्याला आयताच मार्ग दाखवेल, मग आपण उठू आणि हातपाय मारू, असं ठरवतो.त्या प्रश्नांची उत्तरं आपली आपण शोधणं दूर, आपण त्यांच्यापासून पळच काढत राहतो. त्यांना मनाच्या कोप:यात कुठेतरी डांबून ठेवतो. तो कोपरा दुस:या कोणी आपोआप वाचावा, समजून घ्यावा आणि प्रेमाने, चटचट आपल्याला उत्तरं देऊन आपले प्रश्नच सोडवून टाकावे.- अशी जादू घडायची आपण वाट पाहत बसतो.तशी जादू आयुष्यात घडत नाही. काही प्रश्नांची उत्तरं ही कडूजहर असतात आणि ती आपल्याला नको असतात.आपण शॉर्टकट मिळेल का, बायपास मिळेल का, असं आपण बघत असतो.ते काही सापडत नाहीत म्हणून मग आपण मला खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप अडचणी आहेत, मार्ग दिसत नाही असं म्हणत.काहीच करत नाही. असतो तिथेच बसून राहतो. गाडी हलतच नाही जागची. त्यामुळे, आणखीन नवनवीन प्रश्न आपल्या जुन्या प्रश्नांशेजारी येऊन बसतात. आता तर आपलं डोकं पार हँग होऊन जातं. आणि काहीच न करता, आपण फक्त रडत राहतो आणि एक नंबरचे रडे होता जातो.ज्याच्या जाण्यानं आपण अलीकडेच हळहळलो, तो इरफान खान. सामान्य घरातला मुलगा, त्यानं ठरवलं आपण अभिनय करायचा, तेव्हा त्याच्या आयुष्यात काही सगळं सोपं होण्याची जादू झाली असेल का?त्याच्याही समोर असेच अनेक प्रॉब्लेम्स होते. तो काही बॉलिवूडच्या व्याख्येत बसणा:या हिरोसारखा गोरापान, देखणा, उंच, सिक्स पॅक नव्हता. अगदी त्याच्या दिसण्या-बोलण्यापासून ते त्याच्या बॅकग्राउण्डर्पयत त्याच्यापुढे वेगवेगळे प्रश्न होते. या प्रश्नांना जेव्हा तो स्वत: भिडला, तेव्हा त्याला एकेक करून मार्ग दिसत गेला. त्यांना जर तो भिडलाच नसता, तर तो केवळ बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चमक दाखवणारा अभिनेता बनूच शकला नसता.प्रत्येक टप्प्यावर त्यानं स्वत:ला त्याच्या आजूबाजूच्या प्रश्नांमधून स्वत:च उत्तरं शोधत बाहेर काढलं. अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातसुद्धा जेव्हा असाध्य रोगाचं निदान झालं, तेव्हाही त्याने असाच स्व-संवाद साधत स्वत:ला धीर दिला होता. ते त्याचं पत्र चिक्कार व्हायरल झालं, ते तुम्हीही एव्हाना वाचलंच असेल.एखाद्या अथांग समुद्रावर एखादी छोटीशी प्लॅस्टिकची पाण्याची बाटली फेकून द्यावी आणि ती बाटली त्या प्रचंड मोठय़ा समुद्राच्या लाटांवरती हेलकावे खात अशीच भरकटत राहावी आणि शेवटी त्या लाटांना शरण जावी, असेही असहाय विचार त्याच्या वाटेला आले. मग त्या लाटा मनात आणून, आपली असहायता बघून रडत बसावं, त्यात आपला आजचा वेळदेखील खराब करून टाकावा की ठीक आहे, भिडू यांनाही अशी मनाची उभारी घेऊन असेल त्या परिस्थितीला सामोरं जावं, हा निर्णय त्याने शेवटी घेतला. नुसताच विचार करत बसून, खूप समस्या आहेत असं स्वत:ला गोंजारत बसून काहीच उपयोग नसतो, हे त्याच्या लक्षात आलं. आयुष्य हा एक खेळ आहे आणि त्याचे काही नियम आहेत. हे नियम समजून घेतल्या शिवाय, त्यांना स्वीकारल्याशिवाय आणि मग त्यांच्यावरती खिलाडूवृत्तीने उपाय शोधल्या शिवाय आयुष्याच्या खेळामध्ये मजा येत नाही, हे त्याला कळलं. आपल्या हातात फार कमी दिवस आहेत, याची जाणीव एकीकडे होतीच. तो असेल त्या परिस्थितीला थेट भिडला. नवीन कामं करत राहिला. जमेल तितकी स्वत:ची तब्येत सांभाळत राहिला.
या सगळ्या जाणिवेच्या प्रवासात आपल्याला शिकण्यासारखं खूपच काही आहे. आपण आपल्या समस्यांमध्ये गुरफटून जाऊन त्या आहेत त्याहून खूप मोठय़ा करून हातावर हात ठेवून बसलेले असतो का?हा प्रश्न आधी स्वत:ला विचारायला हवा. आपल्या पुढेच खूप मोठय़ा समस्या आहेत, असंच एक रडगाणं आपण वाजवत बसलेलो असतो का?आपण अनेकदा कल्पनाच करत बसतो. मी असं करायला गेलो, तर तसं होईल. मी हा निर्णय घेतला, तर अमुक लोक काय म्हणतील?ते आपल्याला त्नासच देतील. मी अमुक मार्ग निवडला तर तिथे तमुक अडथळे असतील, अशा कल्पनेच्या विश्वात समस्या फुगवत किती वेळ अडकून राहायचं? कधीतरी आपल्याला स्वत:शी बोलावं लागेलच. ऊठ बाबा आणि झडझडून कामाला लाग, हे स्वत:लाच सांगावं लागेल. आपण कल्पना करून आपलं दु:ख फुगवून ठेवतो का याचा विचार करून थेट कामाला लागलं पाहिजे.स्वत:शी बोलायचं. काय बेस्ट उपाय असू शकतात, यांची माहिती काढायची. मग भिडायचं त्यांना, एकदम थेट. त्यासाठी खरं तर एकच मंत्न आहे.. निकल पडो.. आक्र मण.. फार काही अवघड नसतं हे..
( प्राची मानसशास्नसह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)