एका चर्चसमोर एक दारूचं दुकान सुरू होतं.चर्चमधील फादर आणि तिथं येणा:या सा:याच लोकांना फार वाईट वाटतं. पण दारू दुकानमालक धनदांडगा असतो. तो काही केल्या जुमानत नाही. त्याचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही.
शेवटी सारे जण रोज देवाला साकडं घालतात, प्रार्थना करतात की, हे दुकान इथून हलू दे. चमत्कार होऊ दे!
काही दिवसांनी तुफान पाऊस पडतो, वीज पडते आणि ते दुकान आगीत बेचिराख होऊन जातं.
दुकानमालक संतापतो. कोर्टात केस करतो की, या चर्चमुळे, इथं रोज होणा:या प्रार्थनांमुळे माझं दुकान पडलं. मला नुकसानभरपाई द्या.
चर्चवाले ‘नाही’ म्हणतात. आमचा काय संबंध असा त्यांचा सवाल असतो!
या अद्भुत केसमुळे न्यायाधीशही चक्रावून जातात. आणि मग न राहवून म्हणतात की, किती अवघड आहे हे. एक माणूस जो महाचोर, त्याचा प्रार्थनेच्या शक्तीवर विश्वास आहे. त्या प्रार्थनेच्या जोरावर चमत्कार होऊ शकतो, असं त्याला वाटतं. आणि जे प्रार्थना करतात त्यांना मात्र त्या प्रार्थनेच्या शक्तीवर भरवसा नाही, असं कसं?
मग तिथं एक खूप ज्येष्ठ म्हातारे फादर येतात.
आणि सगळ्यांना सांगतात की, चमत्कार घडू शकतात. प्रार्थनेत ताकद असतेच. पण आपण जी प्रार्थना करतो त्यावर आपला विश्वास असायला हवा. तुम्ही जर म्हणालात की, मी श्रद्धेनं आणि चांगल्यासाठी जे मागतोय ते मिळेलच, देव माझं चांगलंच करेल तर तसंच होतं!
पण तुम्ही नुस्ते हात जोडता, वरवर मागता आणि तसं घडतच नाही तर रडता!
आपण जे करतो ते ताकदीनं, श्रद्धेनं केलं तर न घडणारंही घडू शकतं!
****
आपलंही असंच. आपण देवाकडे मागतो, पण हताश निराश होऊन!
त्यापेक्षा प्रार्थना करत, जे घडावं असं वाटतं, ते घडण्यासाठी कष्ट केले तर प्रार्थना नक्की बळ देते!!
( एका जुन्या लोककथेचा संपादित अनुवाद)