शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आॅटो इम्युनिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 2:47 PM

काही वेळा थायरॉईडच्या अँटिबॉडीज देशद्रोही होतात. आपल्याच शरीरातल्या थायरॉईडवर हल्ला चढवून त्या थायरॉईडचा कारखाना बंद पाडतात.

- डॉ. यशपाल गोगटेहायपोथायरॉईडीझममध्ये शरीरात थायरॉईडच्या हार्मोन्सची कमतरता होते, त्याची लक्षणं दिसू लागतात हे आपण मागील लेखात बघितले; पण ती नक्की का होते? कशी होते? हे या लेखात जाणून घेऊया...  जेव्हा कारखानाच बंद पडतो...थायरॉईड ग्रंथीमधून ट्राय-आयोडो-थायरॉनीन (टी ३) व थायरॉक्सिन (टी ४) नावाची हार्मोन्स तयार होत असतात. एखाद्या अविरत चालणाऱ्या कारखान्याप्रमाणे उत्पादनाचं हे कार्य अव्याहत चालू असतं. या कारखान्याचं व्यवस्थापन पूर्णत: पिट्युटरी ग्रंथीतून निघणा-या टीएसएच या हार्मोन्सचं असतं. काही कारणास्तव रक्तात टी ३ व टी ४ या हार्मोन्सची कमतरता निर्माण झाली की, त्याला हायपोथायरॉईडीझम असं म्हणतात. बºयाच वेळेला ही कमतरता थायरॉईडच्या हार्मोन्सचं उत्पादन कमी झाल्यामुळे होते.

थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम होण्यास शरीरातील काही प्रणालींमधील बिघाड कारणीभूत ठरतात. आपल्या शरीरातील पेशींमध्ये रोगप्रतिकारक तत्त्व म्हणजे अँटिबॉडीज असतात. त्या आपल्या शरीराचा रोगांपासून, आजारांपासून, जंतांपासून बचाव करीत असतात. काहीवेळा या अँटिबॉडीज देशद्रोही होतात. देशद्रोही म्हणजे काय, तर तो ज्या देशाचा नागरिक असतो त्याच देशावर हल्ला चढवतो. तसंच थायरॉईडच्याही या देशद्रोही अँटिबॉडीज आपल्याच थायरॉईडवर हल्ला चढवून त्याला पूर्णत: निकामी करतात. थोडक्यात, थायरॉईडचा कारखाना बंद पाडतात. या प्रकाराला आॅटो- इम्युनिटी असं म्हटलं जातं.

रक्तामध्ये या अँटिबॉडीज अ‍ॅँटिटीपीओ नावाच्या तपासणीद्वारे ओळखल्या जाऊ शकतात. काहीवेळेस काही लोकांमध्ये थायरॉईडच्या आजारात सुरुवातीच्या काळात कधी टी ३ व टी ४ ची तपासणी नॉर्मल येते, तर कधी गडबडलेली येते. अशावेळेस अँटिबॉडीच्या तपासणीनं आजाराचे खात्रीपूर्वक निदान करता येते व संभ्रम टाळता येतो. आॅटो इम्युनिटीव्यतिरिक्त काही लोकांमध्ये हायपोथायरॉईडीझमचा आजार थायरॉईड ग्रंथींमधील असलेल्या एन्झाईम्सच्या बिघाडामुळे जन्मत: देखील असू शकतो. म्हणूनच सर्व नवजात बालकांमध्ये पहिल्या आठवड्यातच थायरॉईडची चाचणी करणं आवश्यक आहे. वेळीच केलेलं निदान या बालकांमध्ये पुढे होणारे मतिमंदत्व टाळू शकते.पूर्वीच्या काळी हायपोथायरॉईडीझमचा आजार आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असे. आयोडीनयुक्त मीठ वापरात आल्यापासून हा आजार जवळ जवळ नाहीसा झाला आहे. युरोपमध्ये काही भागात सेलेनियमच्या कमतरतेमुळेही हा आजार झालेला आढळतो.सास, बहू और साजिश टी ३ व टी ४ अन् टीएसएच यांचं एकमेकांशी असलेलं नातं हे सास-बहू प्रमाणे असते. थायरॉईडमधून निघणारे टी ३, टी ४ व पिट्युटरीमधील टीएसएच या हार्मोन्सचे प्रमाण व्यस्त असते. म्हणजेच ज्यावेळेस टी ३, टी ४ कमी असते त्यावेळेस टीएसएच वाढलेलं असतं. याच स्थितीला हायपोथायरॉईडीझम असं म्हणतात.

पण काही वेळेस काही लोकांमध्ये टी ३, टी ४ नॉर्मल असूनही टीएसएचमध्ये अनपेक्षितरीत्या गुणात्मक वाढ आढळून येते, याला सबक्लिनिकल हायपोथायरॉईडीझम असं म्हणतात. सोप्या शब्दात याला पुढं होऊ घातलेल्या आजाराची सुरुवात असे म्हणता येईल. फिल्मी सास सुनेवर वर्चस्व गाजवते तसेच टीसीएचदेखील कायम टी ३, टी ४ ला आपल्या नियंत्रणाखाली ठेवते. यामुळे फक्त टीएसएच या एकाच तपासणीनेदेखील बहुतेकवेळा हायपोथायरॉईडीझमचे निदान होऊ शकते. हायपोथायरॉईडीझमवर वेळीच केलेल्या उपचारांमुळे पुढे होणारे गंभीर आजार टाळता येतात. हायपोथायरॉईडीझमच्या उपाययोजनेबद्दल माहिती पुढील लेखात...(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन्सतज्ज्ञ आहेत. dryashpal@findrightdoctor.com)