- आनंदी नाशिककर
आज आइस टी डे
साजरा होतोय जगभर,
म्हणजे खरंतर
आइस टीवाल्या तरुण जगात.
त्या जगातली एक बात.
आपण प्रेमाबिमात पडतो.
चकाचक एसीवाल्या एखाद्या बडय़ा कॉफी शॉपमध्ये ‘त्याच्या’सोबत पहिल्यांदाच बाहेर जातो.
बोलायचं काय?
प्रश्नच असतो.
तसंही काय बोलणार असतो म्हणा आपण? बोलण्यापलीकडचं एक फिलिंग असतं जे हॅण्डलच करता येत नाही. तेवढय़ात तो विचारतो, ‘कॉफी घेणार?’
आता त्याला काय सांगणार की, मी पक्की टपरीवाली चहाबाज. ती कडवट कॉफी कितीही रोमॅण्टिक वाटत असली बाकीच्यांना तरी मला ती अजिबात आवडत नाही हे सांगण्याचं डेअरिंगही तोवर आलेलं नसतं. आणि मुळात टपरीवरच्याच चहाची ‘लाइकी’ असल्यानं त्या चकाचक कॉफी शॉपमधला महागडा चहा पिणं अन्यायकारकच वाटतं. ( बिल ‘तो’ देणार असला तरीही.)
मग घाब:याघुब:या हातानं मेन्यूकार्ड पाहत नजर जाते ती आइस टीवर.
बर्फ घातलेला चहा?
एरवी गारढोण चहा म्हटल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते.
पण इथं तो आइस टी पिऊन पाहावासा वाटतो. तेवढंच संकट टळतं, त्या कॉफीचं! आणि त्याच्यावरचं इम्प्रेशनही एका फटक्यात डाउन होत नाही.
म्हणून मग आइस टी सांगितला जातो.
लेमन की पीच?
मनातल्या मनात एक-दोन-तीन-चार-पाच करून प्रश्न सोडवत ‘पीच’ फ्लेवर ऑर्डर केला जातो.
आणि पहिल्या घोटातच तो पीच आइस टी असा काही मनात उतरतो की त्यानंतर चकाचक कॉफी शॉप म्हटलं की हा आइस टीच आठवतो.
पुढं पुढं तर मला न विचारता ‘तो’ही बिंधास्त सांगून टाकतो की, एक पीच आइस टी मॅडमसाठी!!
***
ही माझी जशी आइस टीशी ओळख झाली तशीच सगळ्यांची होत असेल असं नाही. पण अनेकांची होते. प्रेमात पडता पडताच आइस टीच्याही प्रेमात पडणारे अनेकजण असतात. आणि मग प्रेमात असतानाचा पाऊस जसा आठवतो, तसा प्रेमात असतानाचे कॉफी शॉप, तेव्हाच्या कॉफी, चहाचे कट्टे, वडापाव, आलूटिक्की, पाणीपु:यांसह हे आइस टीही आठवत राहतात.
प्रेमभंग झाला की अनेकजण कित्येक दिवस त्या कॉफी शॉपमध्येही जात नाहीत आणि आइस टी तर कायमचा सोडून देतात.
खरंतर बर्फ असलेलं ‘फ्लेवर्ड’ चहाचं पाणी यापलीकडे काय असतं त्यात?
इतरांना कसं कळावं त्याचं उत्तर?
जे आइस टीच्या प्रेमात असतात त्यांनाच समजावं ते!
कॉलेज कॅम्पससमोरच्या इटुकल्या कॅफेत तो मिळतो, फिरायला जायच्या नेहमीच्या इश्कवाल्या छोटय़ा सीटआउटमध्ये मिळतो आणि कधी कधी तर उभ्या उभ्या मॉलमध्ये भेटलो म्हणून उभ्या उभ्याही भेटतो.
आमच्या तरुण जगण्यात या आइस टीची खरंच गंमत आहे की यारो.
म्हणून तर आज 1क् जून,
आइस टी डे साजरा होत असताना,
हॅपी बड्डे म्हणावं एखाद्या मित्रला तशी ही पोस्टच लिहिलीय ना मनापासून, बरफवाली चाय के लिए.
आम्ही नेहमीच्या आमच्या हॉटेलातल्या अण्णाला ओरडून सांगतो ना, एक पीच मारके बरफवाली चाय दे!
त्या प्रेमाची रसिली, थंडगरम गोष्ट आहे.
आज मस्त एकटीनं जाऊन आइस टी पिणार.
त्या गारव्यात हरवून जाणार.
सोबत पाऊस आला तर आणखी काय हवं!!
चिअर्स!!!