शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

रायगडावरचा सुंदर सोहळा

By admin | Published: June 23, 2016 4:22 PM

६ जून, त्यादिवशी शिवराज्याभिषेक होता. या वर्षी हा राज्याभिषेक सोहळा पाहण्याची नव्हे अनुभवण्याची संधी मला मिळाली.

मध्यरात्री रायगड चढवून जागवलेल्या इतिहासाच्या काही सुंदर स्मृती६ जून, त्यादिवशी शिवराज्याभिषेक होता. या वर्षी हा राज्याभिषेक सोहळा पाहण्याची नव्हे अनुभवण्याची संधी मला मिळाली. माझे चुलत बंधू गेल्या वर्षी या सोहळ्याला गेले होते. तिथून आल्यानंतर त्यांनी राज्याभिषेक सोहळ्याचं जे वर्णन केलं ते ऐकून मी ठरवून टाकलं होतं की, पुढच्या वर्षी रायगडावर जायचंच. चुलत भावांमुळे मला तो नयनरम्य सोहळा अनुभवता आला.५ जून रोजीच आम्ही एकूण चौदा जण साधारण ६ वाजता पिकअपने निघालो. गाडीचं पूजन करून, शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पोस्टर, फडकणारा भगवा लावून आम्ही किल्ले रायगडच्या दिशेने कूच केली. रस्ता कोकणातील असल्यामुळे धीम्या गतीने गेलो. साधारण रात्री १ वाजता पोहोचलो तर पाचाड या गावाच्या परिसरात बऱ्याच गाड्या लागल्या होत्या. आम्हीदेखील गाडी व्यवस्थित लावून पायथ्याकडे रवाना झालो. पायथ्याशी जाऊन गडाच्या पहिल्या पायरीवर माथा टेकला आणि रायगडावर चढाई करण्यास सुरु वात केली. रात्री दीड वाजला असेल. रात्रीच्या किर्रर्र काळोखात, आणि विजेरीच्या प्रकाशात शेकडो तरुण आमच्यामागे पुढे चालत होते. ऐकून होतो रायगड खूप उंच, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, अवघड, बिकट वाट असा आहे, चढाई करताना प्रत्यक्ष अनुभव आला. अर्धा अधिक गड चढून गेलो तोपर्यंत आम्ही सर्वजण अक्षरश: भिजून गेलो होतो, पण त्याची चिंता नव्हती. थोड्या विश्रांतीनंतर त्वेषानं घोषणा देत पुन्हा चढाईला सुरुवात केली. सोबत आता गर्दी होती, त्या गर्दीत तरुणच होते असं नाही तर छोटी मुलं काही वयस्कर मंडळीही होती. साधारण साडेतीन वाजता चालून चालून थकल्यावर आम्ही रायगडावर पोहोचलो. खूप थकलो होतो; पण होळीच्या मैदानावर असलेली गर्दी पाहून आणि आमच्या पुढे साक्षात शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून तो थकवा कुठल्या कुठे पळून गेला.शिवरायांच्या चरणांना स्पर्श केला आणि एक वेगळंच मानसिक समाधान लाभलं. फोटोसेशन झालं आणि आम्ही सभामंडपाकडे निघालो. सभामंडपात गेलो संपूर्ण सभामंडपात माणसंच माणसं होती. ही सगळी माणसं रात्रीच आली होती आणि अंथरुण पांघरून आणून झोपी गेली होती. आम्ही मेघडंबरीकडे पाहत होतो, तिथे जी फुलांची सजावट केली होती ती डोळे दिपवणारी होती. मेघडंबरीजवळ जाऊन महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. सभामंडपाच्या मागील बाजूला गेलो तर सगळीकडे माणसं झोपली होती जी रात्रीच आली होती, अगदी बसायलाही जागा नव्हती. आम्हीदेखील सभामंडपात थोडी विश्रांती घेतली. साधारण साडेसहा वाजता कार्यक्र मास सुरु वात झाली.महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास ज्या गडावर घडला त्या रायगडावर आम्ही उभे होतो. गडावर गर्दी वाढतच होती. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतलं, महाराज ज्या जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे त्याचंही दर्शन घेतलं. त्यानंतर टकमक टोकाकडे गेलो. हेच ते टकमक टोक जिथून कडेलोट करण्याच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जायची. खाली पाहिलं तर डोळे गरगर फिरावेत असा तो कडा ! गडाची तटबंदी, गडावरील बांधकाम करताना किती कष्ट घ्यावे लागले असतील ते कामगारच जाणो. गडावर सकाळपासूनच धामाधूम सुरू होती, अनेक ढोलपथके जल्लोषात ढोल वाजवीत होते. सगळीकडे अगदी जल्लोष आणि उत्साह होता. सभामंडपात मग मुख्यमंत्री, मंत्री आले. आणि शिवराज्याभिषेक पार पडला. एवढा देखणा सोहळा पार पडला त्यात सर्वांनीच स्वयंशिस्त पाळली, तरीही एका गोष्टीबद्दल खूप वाईट वाटलं ते म्हणजे अनेक लोकं गडावरच घाण करीत होते. गड, किल्ले ही आपल्या इतिहासाची आठवण आहे. त्यांचं जतन करणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे. आणि आपण ते केलंच पाहिजे. पुढच्या वर्षी गडावर आणि परिसरात कचरा न करता तरुण मंडळी राज्याभिषेक साजरा करतील या आशेनं पुढच्या वर्षी पुन्हा जाण्याचं मी तरी निश्चित करून टाकलं!- तुषार अनंता खामकर, करी रोड, मुंबई‘आॅक्सिजन’चा आता आॅनलाइन वाचक कट्टातुम्हालाही लिहायचंय,मनातलं काहीतरी शेअर करायचंय?‘आॅक्सिजन’मध्ये आपलंही नाव झळकावं असं वाटतंय?तर मग पेन उचला,आणि लिहा मनापासून!आता ‘आॅक्सिजन’ टीम तुम्हाला देतेय एका नवीन संधीथेट आॅनलाइन लिहिण्याची ! तिथं शब्दमर्यादेची अट नाही. निवडक आणि उत्तम लेख आता थेट आॅनलाइनच प्रसिद्ध होतील.तुमचे लेख आम्हाला oxygen@lokmat.com  वर मेल करा.आणि आपले लेख www.lokmat.com/oxygen वर नक्की वाचा!-आॅक्सिजन टीम 

आॅक्सिजन आता वाचा रोज, आॅनलाइन!आता ‘आॅक्सिजन’ तुम्हाला रोज वाचता येईल!रोज भेटता येईल. रोज नवनवीन लेख वाचता येतील.आपला हवाहवासा मित्र रोज भेटण्याचा आनंद कमवताना ही भेट कुठेही, कधीही, चोवीस तास होऊ शकते याची खात्रीही बाळगता येईल!आणि आमच्या संपर्कात राहत आपल्या मनातलं व्यक्तही करता येईल!www.lokmat.com/oxygen इथं रोज.. नियमित..ही रोजची भेट अजिबात चुकवू नका!- आॅक्सिजन टीमपाऊसक्षणआपले ‘यादगार’ पावसाळी फोटो आम्हाला पाठवा;आणि आॅनलाइन पाऊस वाटून घ्या!आता पाऊस सुरू होईल..मग पावसाळी पिकनिक..चहाभजी-ट्रेकिंग-कॉलेज कट्ट्यावरच्या गप्पा..मस्त पावसात भटकंती, ट्रेकिंग, हे सारे क्षण जगत आपल्या कॅमेऱ्यात बंदही होतील.आपण ते आपल्या मित्रांना पाठवू किंवा सोशल साइट्सवर शेअर करू..पण त्यापलीकडे काय?तुमचे हे पाऊसक्षण वाटून घेता आले तर?शब्दात तर आपण पाऊस मांडतोच, यंदा क्षण-चित्रातून मांडू!तुम्ही काढलेले पावसाचे फोटो,तुमच्या ग्रुपचे, निसर्गाचे, एखाद्या यादगार क्षणाचेकिंवा सुंदर पावसाळी दिवसांचे..ते आम्हाला oxygen@lokmat.comवर मेल करा.आणि आपल्या आनंदाचा पाऊस वाटून घ्या..- आॅक्सिजन टीम