‘क्या सलमान खान दिखता है, कैसे डोलेशोले बनाए है..’ ‘आमीरसारखी स्माईल आहे तुझी एकदम..’‘एकदम अक्षयच, कसला ज्युदो खेळतोस..’ ‘क्या दबंग दिखता है, कॉम्बो आॅफर है सिंघम विथ दबंग..’
‘कसले निळे डोळे, ऐश्वर्यापेक्षा सुंदर.. अगदी ऐश्वर्याच दिसतेस..’
‘चांगली राहिलीस ना थोडी, तर थेट सोनाक्षी सिन्हाच दिसशील..’
‘गालावर खळी किती गोड, वजन पन्नास किलो घटव,
दीपिकापेक्षा सुपर्ब दिसशील..’
‘स्वत:ला रेखा समजते ती, माहितीये..’
असे डायलॉग आपण कॉलेजच्या कट्ट्यावर नेहमी ऐकतो..अनेक जणांना प्रेमानं आणि अनेकदा तर उपरोधानंही फिल्म स्टार्सच्या नावानं चिडवतो..आणि काहीजण तर खरंच आपापल्या फेवरिट स्टार्सप्रमाणं दिसण्यासाठी काय वाट्टेल ते करतात..जीममध्ये जाऊन वजनं उचलतात, डाएट करकरून उपाशी राहतात..फेअरनेस क्रीम्स चोपडतात..स्वस्तात स्टायलिश कपडे आणून घालतात..सतत हेअरस्टाईल्स बदलतात..
का? कशासाठी? सुंदर दिसण्यासाठी? स्टार दिसण्यासाठी? ‘छां जाने के लिए..’
त्यानं कॉन्फिडन्स वाढतो..त्यानं आपणही कुछ खास आहोत असंही वाटतं..
पण खरंच तसं करणं म्हणजे सुंदर दिसणं असतं का? गोरं होणं म्हणजेच सुंदर दिसणं ठरतं का? गोरं नाही म्हणून आपण मागे पडतो का? आपली जाड किंवा किडकिडीत तब्येत आपलं भवितव्य ठरवते का? आपण किरकोळ दिसलो किंवा काही किलोंनी जाडजूड असलो म्हणून आपण नाकारले जातो का?
असे अनेक प्रश्नं.. आणि त्या प्रश्नांची उत्तरं..