शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भाडिपा

By admin | Published: March 15, 2017 7:04 PM

यूट्यूबवर एक एपिसोड पब्लिश होतो, लोक आपला डाटा खर्चून मिण्टासेकंदांचा हिशेब लावून तो पाहतात. पण जे या मालिका बनवतात त्यांना त्यातून काय मिळतं?

 - शची मराठेयूट्यूबवर एक एपिसोड पब्लिश होतो,लोक आपला डाटा खर्चून मिण्टासेकंदांचा हिशेब लावून तो पाहतात.पण जे या मालिका बनवतातत्यांना त्यातून काय मिळतं?यूट्यूब चॅनल चालवणं म्हणजे नेमकं काय? आणि सगळ्यात मूलभूत प्रश्नम्हणजे पैसा.या यूट्यूब चॅनलसाठी पैसे कोण देतं?या प्रश्नांसह रंगलेलाएक गप्पांचा अड्डा.सारंग, पॉला, निपुण आणि अमेयसोबत‘मराठी कण्टेण्ट फक्त मराठी लोकांनीच का बघावा? मराठी कण्टेण्ट नॅशनल आणि ग्लोबल लेव्हलवर पोहोचवायचाय आम्हाला’ - पॉला, द प्रोड्यूसर.‘कास्टिंग काऊचसारखा शो मी टीव्हीवर कधीच करू शकलो नसतो’ - सारंग, द डिरेक्टर.सारंग, पॉला, निपुण आणि अमेय. बॅण्ड्रातल्या एका छोट्याशा कॅफेत आम्ही सकाळी सकाळी भेटलो आणि सुरूच झाल्या आमच्या गप्पा. काही विषयाला धरून, तर काही विषयाला सोडून. आम्ही सगळेच इतकं बोलत होतो की बापरे बाप. म्हणूनच मी पहिला प्रश्न विचारला, तुम्ही दोघं म्हणजे अमेय आणि निपुण, तुम्ही सारंगनं लिहिलेली वाक्यं म्हणता का? मी निपुणला विचारलं. निपुणनं लगेच सारंगकडे बोटं दाखवलं आणि म्हणाला, साठे सांगेल. (निपुण सारंगला साठे म्हणतो.) ‘हा म्हणतो तसं, पण अमेय नाही’ - साठे म्हणाला. निपुण स्वत: एक डिरेक्टर आहे. त्यामुळे कुठली वाक्यं एडिट होणार आणि कुठली एपिसोडमध्ये राहणार याचा त्याला परफेक्ट अंदाज आहे. म्हणून तो मोजकंच बोलतो पण ते भारी असतं. ‘भारतीय डिजिटल पार्टी’ या वेब चॅनेलवरचा ‘कास्टिंग काऊच’ या मराठीतल्या पहिल्या वेब सिरीजचंं क्रे डिट तुम्हाला जातं. कसं वाटतं? - मी विचारलं.‘मस्त वाटतं ! पण आम्हीच पहिले असा दावा भाडिपानं कधीच केला नाही. मीडियामुळे जेव्हा आम्हाला पब्लिसिटी मिळाली तेव्हा अनेकांनी आम्हाला विचारलं की, तुम्ही कसे पहिले, आमचे व्हिडीओपण आहेत यूट्यूबवर तुमच्याआधी. पण आम्ही शोधल्यावर मात्र असे कोणतेच व्हिडीओ आम्हाला दिसले नाहीत. वेब चॅनल हा नवा ट्रेण्ड झालाय. जो उठतो तो वेब चॅनल काढतोय. पण त्यासाठी पुरेसा अभ्यास आणि रिसर्च फार कमी लोकांनी केलंय.’‘मी नेहमी म्हणतो, हा शो म्हणजे सिरिअसली केलेली कॉमेडी आहे’ - अमेय सांगतो. हा शो स्क्रि प्टेड आहे. सेलिब्रिटींचा अभ्यास करून त्यांच्याबद्दल स्क्रि प्ट लिहिलं जातं. त्यांना ते आवडलं तर आम्ही शूट करतो. शोवर आलेल्या सगळ्याचं. अ‍ॅक्टर्सचा हा मोठेपणा आहे, कारण स्वत:वर विनोद करून घेणं सोपं नाहीये. कास्टिंग काऊचची टीम एकेक करून आपल्या अनुभवाविषयी बोलत होती. सांगत होती एक वेगळा शो करण्याची क्रिएटिव्ह प्रोसेसच.‘यूट्यूबवर लोकांचा अटेंशन स्पॅन खूप कमी असतो. कारण लोकांचा मोबाइल डेटा खर्च होत असतो. त्यामुळे सात ते आठ मिनिटांच्या एपिसोडमध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो,’ निपुण सांगतो. सेलिब्रिटींशी बोलता बोलता हे दोघं एकमेकांशी बोलतात. पण जेव्हा अमेय-निपुण कॅमेऱ्यात बघून बोलतात तेव्हा खरंतर ते प्रेक्षकांशी बोलत असतात, जे जास्त क्लिक होतं. कारण लोकांना हे अ‍ॅक्टर आणि सेलिब्रिटीही एकदम आपल्यातले वाटायला लागतात, अ‍ॅक्सेसेबल वाटतात.हे झालं शो फॉर्मेटबद्दल. पण एक एपिसोड पब्लिश होतो तेव्हा खूप काही घडत असतं. नुसतं एडिटिंग, ग्राफिक्स नाही तर त्यापेक्षाही काहीतरी वेगळं. पण ते नेमकं काय? यूट्यूब चॅनल चालवणं म्हणजे नेमकं काय? आणि सगळ्यात मूलभूत प्रश्न म्हणजे पैसा. या यूट्यूब चॅनलसाठी पैसे कोण देतं?मी विचारूनच टाकलं सारंग आणि पॉलला.तर ते म्हणाले, ‘खरं सांगायचं तर आम्हालाही हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. सध्या तरी आम्हीच आमचे पैसे खर्च करतोय.’ सारंग हसत हसत सांगतो, ‘काही प्रमाणात जाहिरातीतून पैसे मिळतात. पण पुन्हा त्यातले चाळीस टक्केच आम्हाला मिळतात, साठ टक्के पैसे यूट्यूबला जातात. कारण त्यांचा प्लॅटफॉर्म आम्ही वापरतोय. तुम्ही एकदा चॅनल सुरू केलं की सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे तुमचं चॅनल किती लोकं व्ह्यू आणि सबस्क्र ाईब करतात. यूट्यूबच्या प्रेक्षकांनी व्हिडीओ पाहताना सबस्क्राईबचा पर्याय क्लिक केल्यावर त्या चॅनलवर बनणाऱ्या पुढच्या व्हिडीओची माहिती यूट्यूब प्रेक्षकांना पुरवतं. त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही नोटिफिकेशनचा पर्याय निवडलात तर नवीन व्हिडीओ आल्याचं यूट्यूब तुम्हाला ई मेल पाठवून कळवतं.हे झालं व्ह्यूवर्ससाठीचं ज्ञान. पण एका यूट्यूब चॅनलच्या मालकाला मात्र यापेक्षा बरीच मेहनत करावी लागते. त्यातला पहिला महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे ‘मॉनिटायझेशन’. जास्तीत जास्त लोकांनी तुमचा व्हिडीओ पाहावा आणि त्यातून तुम्हाला पैसा मिळावा यासाठी यूट्यूब स्वत: तुम्हाला मार्गदर्शन करतं. म्हणजेच तुमचा व्हिडीओ बुस्ट करतं. यूट्यूबशी संबंधित काम करणाऱ्या एजन्सीज असतात. तिथले एक्सपर्ट्स हे काम करतात. थोडक्यात काय तर यूट्यूबचे सीए. हे सीए तुमचा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांनी व्ह्यू करावा यासाठी सगळी तजवीज करतात. त्यासाठीचं रिसर्च करतात, प्लॅन बनवतात. अर्थातच त्यांची फी देऊनच ही सर्व्हिस तुम्हाला वापरता येते. सारंग अजून काही इंटरेस्टिंग माहिती सांगत असतो. तुम्हाला स्वत:हून हे सगळं करायचं असेल तर या सगळ्याची माहिती देणारे ट्युटोरिअल आणि व्हिडीओज यूट्यूबवरही असतात. तुमचं चॅनल कोण बघतं, किती वेळ बघतं, दिवसाच्या कोणत्या वेळी बघतं, इतकंच काय तर मोबाइल, कॉम्प्युटर की लॅपटॉपवर बघतं या सगळ्याचं अल्गोरिथम यूट्यूब तुम्हाला पुरवतं. थोडक्यात काय तर तुमच्या व्हिडीओचं ट्रॅकिंग होतं. या माध्यमात तुम्हाला लॉँग टर्ममध्ये राहायचं असेल, बिझनेस म्हणून काम करायचं असेल तर हे सगळं माहीत असायलाच हवं. पॉला आणि सारंगचा हा सगळा अभ्यास सुरूच आहे. ही दुनियाच नवीन आहे, त्यामुळे अभ्यास तो बनताही है..तो आपणही करायचा तर पुढच्या भागात इथंच भेटू..(वेबसिरीजची मोठ्ठी फॅन असलेली शची मुक्त पत्रकार आहे.)