नगर जिल्ह्यातल्या कोण कुठल्या कोप:यातल्या एका गावातला एक हरहुन्नरी तरुण मुलगा.
घरी कोरडवाहू शेती. बाहेरच्या जगाची माहिती शून्य.रिकाम्या वेळात पाव विकून, टमटम चालवून
चार पैसे कमवायचे आणि स्वप्नं बघायची! कसली?
- तर स्वत:चा सिनेमा बनवायची!
हे असलं भलतं स्वप्न घरी कसं सांगणार?
- मारच पडला असता!
‘लोकमत’ची (तेव्हाची) मैत्र पुरवणी
हा एकच सिक्रेट आधार होता त्याचा!
त्या पुरवणीची पानं त्याला सांगत,
हरू नकोस. जा पुढे बिन्धास्त!
खूप असतात तुङयासारखे वेडे,
ते शोधतात आपला रस्ता.
तुला पण सापडेल तुझी वाट!!
- त्याने खरंच सोडली नाही हिंमत
आणि लाजही नाही बाळगली
स्वत:च्या वेडय़ा स्वप्नाची!
- खाण्याची भ्रांत होती,
गावाबाहेरच्या जगाशी काही म्हणता काही
ओळख नव्हती. ‘फिल्म मेकिंग’ हे प्रकरण
कशाशी खातात हे सांगणारं कुणी
आसपास नव्हतं. पण तरीही
सिनेमा बनवायचा होता स्वत:चा!!
एकदा कांदे विकायला म्हणून पठ्ठय़ा
पुण्याला गेला आणि
रात्रभर मार्केट यार्डात झोपून सकाळी
एफटीआयच्या गेटवर जाऊन आला.
स्वत:च्या खेडय़ाबाहेरच्या जगाबद्दल अडाणी,
इंग्रजीचा एक शब्द न बोलता येणारा
हा साधा बारावी पास.
याला कोण घेणार आत?
**
.. पण वेड लागलं होतं.
स्वप्नाचं वेड.
आणि ‘मैत्र’ होती सोबतीला.
त्यातले लेख सांगत होते,
जमेल. जमेल तुला.
काहीतरी मार्ग निघेल.
**
त्याने काढलाच शेवटी मार्ग.
सिनेमा बनवला.
..स्वत:चा सिनेमा.
आणि त्याच्या या पहिल्याच सिनेमाला
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला!
थेट नॅशनल अवॉर्डच!!!
**
‘मैत्र’ म्हणजेच आजची, ‘ऑक्सिजन’!
- तरुण स्वप्नांना हात देणारी
’लोकमत’ची पुरवणी!!!
- ‘मैत्र’ने डोकी फिरवलेल्या
अनेकांपैकी एका अस्वस्थ मित्रच्या
स्ट्रगलची आणि त्याने हिंमत करून,
खेचून आणलेल्या यशाची कहाणी
आज प्रसिद्ध करताना
एवढंच म्हणतो आम्ही,
अभिनंदन भाऊराव!!
- ‘मैत्र’चा शब्दन्शब्द वाचून त्यातून
हिंमत गोळा करत होतास तू,
आज ‘ऑक्सिजन’च्या
पहिल्या पानावर झळकलास मित्र!!!
- ऑक्सिजन टीम