मनोज कौशिक
मुली मान्यच करत नाहीत की, आपण व्यसनी आहोत, आपण चुकतोय. त्या सतत इतरांना दोष देतात, रडतात; पण व्यसन लागलंय हे मान्य करून उपचाराचा हात मात्र पटकन धरत नाहीत! बिच्चारीचा कांगावा
-----------------
‘माझया व्यसनाला अमुक-तमुक व्यक्तीच जबाबदार आहे, त्यांच्यामुळे माझं वाटोळं झालं.’
किंवा ‘मी व्यसनी नाहीच’ असा कांगावाच अनेक व्यसनी रुग्णमैत्रिणी करतात. आपल्या व्यसनाची जबाबदारी त्यांना स्वीकारायला लावणं हेच एक अवघड काम असतं.
निशिगंध व्यसनमुक्ती विभागाच्या समन्वयक प्रफुल्ला मोहिते यांनी महिलांच्या व्यसनाबाबत एक वेगळाच मुद्दा सांगितला.
त्यांचं स्पष्ट मत होतं की, पुरुष रुग्णमित्र उपचारांना जेवढा विरोध करत नाहीत, त्या तुलनेत महिलांचं विरोधाचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यात तरुण मुली स्वत:हून काही माहिती सांगत नाहीत. रडतात, कांगावा करतात, इतरांना दोष देतात; पण काही केल्या हे मान्यच करत नाहीत की, आपल्याला व्यसन लागलंय! अशावेळी आम्ही पालकांना सगळी माहिती विचारतो. व्यसनाची सुरुवात नेमकी केव्हा झाली, ते वाढतं आहे हे कधी लक्षात आलं, त्यावर घरी कोणकोणते प्रयत्न झाले, मनोविकारतज्ज्ञाकडे उपचार घेतलेत का अशी सारी माहिती समुपदेशन करणा:या व्यक्तीला हवी असते. आणि खरं तर पूर्ण खरी, पूर्वग्रहविरहित माहिती पालकांनी दिली तर व्यसनी मुलींना मदत करणं सोपं होतं. कारण अनेकदा या मुली आपल्या वस्तुस्थितीचे नेमके आकलन करू शकत नाहीत.
ही माहितीच धक्कादायक होती. ‘निशिगंध’मधे कळलं की, शरीरात जात असलेल्या रसायनांमुळे आणि धुरांमुळे अनेक मुलींची आकलन- विश्लेषण क्षमता आणि स्मरणशक्ती कमी झालेली असते. आपण जेव्हा अपमानित झालो किंवा जेव्हा भावनिक ठेच लागली तेव्हाचे ते प्रसंग या मुलींच्या ओठावर असतात. आपल्या व्यसनाची जबाबदारी किंवा दोष ते त्या घटनांवर ढकलतात. परंतु व्यसन वाढीस निमित्त झालेल्या अनेक घटना जणू काही त्यांच्या स्मरणातच नाहीत असं त्या दाखवत असतात.
विशेष म्हणजे, हे सारं तरुण पुरुष रुग्णमित्रंमध्ये आढळतं. परंतु त्यांना थेट घटनेबद्दल विचारलं तर ते त्यांची बाजू सांगतात आणि त्यात आपलीही काही चूक आहे, थोडय़ा प्रमाणात का होईना आहे हे समजून घेऊ शकतात. याउलट तरुण मुलींचा मात्र इतरांना दोष देण्याकडे कल असतो. त्यात भरीस भर म्हणजे बहुतेक सर्व व्यसनी स्त्रिया भावनाशील किंवा हळव्या मनाच्या असतात. त्यांची चूक दाखवून दिली तर त्या अधिक उफाळून येतात.
मुक्तांगणचे काम महात्मा गांधी यांच्या विचारांना समोर ठेवून चालते. व्यसनाधीनता हा जितका मेंदूचा आजार आहे, तितकाच तो जीवनशैलीचा आजार मानला जातो. साधी राहणी, अनुशासित दिनक्रम, स्वावलंबन, आश्रम व्यवस्थेत राहणं या महत्त्वाच्या गोष्टी असतात. कोणताही मेकअप न वापरणं, कोणतेही दागिने न वापरणं, कोणतीही सौदर्य प्रसाधनं न वापरणं अशी तिथं शिस्त असते. पण हे सारं स्वीकारण्यासाठीही त्यांना वेळ लागतो. वॉर्डमध्ये एकत्रित राहताना त्यांना प्रचंड त्रस होतो. एकमेकींना सहकार्य करून एकत्र सहजीवन व्यतित करणं त्यांना जमत नाही. खरे तर जेमतेम पंधरा जणी असतात. परंतु एकसंध राहणंही त्यांना जमत नाही. एकमेकींना टोमणो मारणो, छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवर भांडणो हा सारा भाग जरा अवघडच असतो.
म्हणून त्यांच्यावर उपचारांचीही एक वेगळी पद्धत असते. उपचारात संगीत आणि आर्ट थेरपीचा भरपूर उपयोग केला जातो. त्यामुळे अनेक रुग्णमैत्रिणी पुन्हा एकदा आपल्या कोणो एकेकाळी करीत असलेल्या छंदांना उजाळा देतात. कागदाच्या पिशव्या करण्यापासून ओरिगामीपर्यंत अनेक गोष्टी त्या मन लावून करू लागतात. राखी पौर्णिमेला राख्या बनवतात. मुक्तांगणमधील रुग्णमित्रंच्या पत्नीचा गट ‘सहचरी’ जेव्हा दिवाळीचा फराळ तयार करीत असतो तेव्हा त्या उपक्रमात त्या आनंदानं सहभागी होतात. कुणी लाडू वळायला मदत करतात, तर काही चकल्या, चिरोटे अशा अवघड पदार्थांचं आव्हान स्वीकारून आत्मविश्वास वाढवतात. रोज संध्याकाळी प्रार्थना गीतं म्हणतात. योग हा परवलीचा शब्द झाल्याने योग सत्रत त्या उत्सुकतेनं आणि उत्साहानं सहभागी होतात. कोणताही धर्म असला तरी ओंकार आणि मौन या गोष्टी त्यांना एकटं पडल्याच्या भावनेतून बाहेर पडायला मदत करतात.
तरुण व्यसनी मुलींसाठी ही वाट सोपी नसते. पण तरी काही धीरानं चालतात आणि आपल्या व्यसनातून बाहेर पडत नवीन आयुष्य मोठय़ा उमेदीनं सुरू करतात.
तरुणींचं व्यसन सुटणं का अवघड होतं?
1) तरुणींच्या उपचारांचं एक पहिलं उद्दिष्ट असतं ते म्हणजे, आपल्याला व्यसन लागलंय, तो आपल्याला झालेला एक आजार आहे हे मान्य करणं आणि त्यापुढचं पाऊल टाकत आता हे स्वीकारणं, की या आजारातून बाहेर पडण्यासाठी माङो मलाच प्रयत्न करावे लागतील.
- हे वाक्य म्हणायला सोपं, पण तरुणींनी आपण व्यसनी आहोत हे मान्य करून स्वत:वर उपचार करायला सहकार्य करणं हाच एक पहिला अवघड टप्पा असतो.
2) व्यसनी तरुणांना त्यातून बाहेर काढायला, सावरायला त्यांचे पालक, मित्र-मैत्रिणी, बायको हे सारे तयार असतात. मदत करतात. उपचारांचा एक भाग म्हणून त्यात सहभागी होतात. रुग्णमित्र परत व्यसनाकडे जाऊ नये म्हणून त्याला मदत करतात. दुर्दैवानं असं काही महिला व्यसनींच्या बाबतीत घडत नाही. त्या जास्त एकेकटय़ा पडतात.
3) व्यसनामुळे सर्व नातेसंबंध बिघडलेले असतात. जवळची म्हणवणारी माणसं दुरावलेली असतात. त्यामुळे उपचारानंतरचं जीवन चांगलं व्हावं आणि त्यांना आत्मनिर्भर बनता यावं हादेखील मुलींच्या संदर्भात या प्रक्रियेचा एक मोठा भाग असतो. त्याकरिता त्यांना अनेक तंत्र आणि मंत्र सांगितले जातात. संवादकौशल्य वाढवणं, देहबोली सुधारणं, योग्य निर्णय घेण्यास शिकणं आणि नातेसंबंध सुधारण्याचे तंत्र आत्मसात करणं, इतकंच नाही तर उपचारानंतर जीवनशैलीत, आहार-विहारात आणि विचारात काय बदल करावेत याचं मार्गदर्शन केलं जातं. त्यातून या मुली स्वत:चं आयुष्य नव्यानं जगण्याचा प्रयत्न करतात.
3) खरंतर आपल्या नैतिकतेच्या कल्पना बाजूला ठेवत व्यसनी मैत्रिणींचा व्यक्ती म्हणून स्वीकार करणं आवश्यक असतं. त्यातही अनेकींचा ‘मी बिचारी’ असा सहानुभूती खेचून घेण्याकडे कल असतो. परंतु ‘मी बिचारी नसून माङया व्यसनामुळे ही वेळ माङयावर आली आहे हे मान्य कर’ असं त्यांना पटवून दिलं की मग सावरण्याचा पुढचा टप्पा सुरू होतो.
(सहकार्य - मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र)