शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

सायकल आणि कचरा उचलो अभियान

By admin | Published: October 06, 2016 5:33 PM

बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये केलेल्या एका आगळ्या सायकलिंगची गोष्ट.. मला सायकलिंग आवडतं. पण माझा असा वेगळा सायकलिंग ग्रुप वगैरे नाही.

 
बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये केलेल्या एका आगळ्या सायकलिंगची गोष्ट.. मला सायकलिंग आवडतं. पण माझा असा वेगळा सायकलिंग ग्रुप वगैरे नाही. परंतु एक ट्रेकिंगचा ग्रुप आहे, ज्यांच्या सोबत मी कधीही केव्हाही इन्स्टंट प्लॅन करून बाहेर गड-किल्ल्यांवर भटकायला जाते. याच ग्रुपमधल्या चार जणांनी संजय गांधी नॅशनल पार्क, बोरीवलीला जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर आम्हाला तिथं चालू केलेल्या सायकलिंगच्या नवीन उपक्र माबद्दल कळले. नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी आपण भाड्यानं सायकल घेऊ शकतो. फक्त प्रत्येक तासामागे काही विशिष्ट भाडं ते आकारणार. आम्हाला ही कल्पना फारच आवडली. जराही वेळ न दवडता आम्ही थोडे पैसे भरले आणि सायकल घेऊन निघणार तितक्यात एका पोलीसकाकांनी आम्हाला थांबवलं.. आणि एक मोठी पिशवी आमच्याकडे दाखवत त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला सायकलिंग करताना पडलेला प्लॅस्टिकचा कचरा म्हणजेच प्लॅस्टिकच्या बाटल्या, कागदं, पाकिटं गोळा करायला आवडेल का? जर असं केलं तर तुम्हाला भाड्यात विशेष सवलत दिली जाईल. तुम्हाला आवडेल का हे काम करायला? आम्ही जराही मागचा पुढचा विचार न करता अगदी आनंदाने ‘हो’ म्हणालो. सवलत मिळणार म्हणून नाही, आम्हाला स्वत:लाच निसर्गाच्या ठिकाणी कचरा झालेला आवडत नाही आणि आम्ही स्वत:ही कधी करत नाही. काकांकडून ती पिशवी घेतली आणि सायकलिंगला सुरुवात झाली. आणि अर्थात त्याचबरोबर स्वच्छता अभियानाला! भटकत भटकत कन्हेरी गुहांपर्यंत गेलो. त्या चढावरून चढताना इतकी दमछाक झाली. पण खूप मज्जा आली. रस्ता बऱ्यापैकी मोकळा असल्यामुळे मनासारखी सायकल चालवता आली. झाडांच्या सावलीमुळे थकवा जास्त जाणवला नाही. खूप रेफ्रेशिंग वातावरण होते. काकडी-कैऱ्या खात, फोटो काढत खूप छान वाटत होतं. पण हे सगळं करत असताना पोलीसकाकांनी दिलेली पिशवी भरत पण होतो. खूप वेळच्या या भन्नाट सायकल राइडनंतर जेव्हा सायकल परत केली तेव्हा पिशवी बऱ्यापैकी कचऱ्यानं भरली होती. ते काकाही खूश झाले. आम्हालाही काहीतरी चांगलं केल्याचं समाधान मिळालं. अस आमचं हे सायकलिंग! जे फक्त सायकलिंग करायच्या उद्देशाने सुरू झालं, पण ते आमच्याही नकळत स्वच्छता अभियानात छान सहभागी झालं. 
- रुचिता रावल
 
 
सेल्फीवाले
सेल्फीश?
स्वत:च स्वत:चेच, कुठल्याही क्षणांचे फोटो काढून आपण काय मिळवतो?
 
एका बातमीनं अस्वस्थच झालो.
‘सेल्फी काढताना तरु णाचा मृत्यू’..
वयाच्या अठराव्या वर्षी मृत्यू कारण काय तर सेल्फीचा नाद...
या वयात मुलं कॉलेजला जातात, मजा करतात, प्रेमात पडतात..
पण एका सेल्फीच्या नादात त्याचा घात झाला आणि सर्व स्वप्नंही बुडाली त्याच्याबरोबरच.. ऐन तारु ण्यात.
सेल्फी या विषयावर लिखाण करण्यासाठी मी सहज गूगलवर फनी इंडियन सेल्फी म्हणून सर्च केलं तर भराभर फोटो ओपन झाले. कोणी मयताला खांदा देताना, तर कोणी खोल दरीच्या टोकावर, कोणी दर्शनाच्या रांगेतून, तर कोणी अपघाताच्या ठिकाणाहून. या सर्व अमानुषपणाचा कळस म्हणून एका मरणासन्न व्यक्तीला मदत न करता त्याच्यासोबत सेल्फी घेणारा महाभागही मला या फोटोच्या गर्दीत आढळला.
या सेल्फीमुळे तरु णाई सेल्फीश होताना दिसून येते. पूर्वीच्या काळी तरु ण विविध विचारांच्या आणि विचारधारांच्या मुद्द्यांवर चर्चा करताना दिसत होते. पण आजची तरु णाई आपल्या सेल्फीला जास्त लाइक कसे मिळतील याचा विचार करते. या सर्व प्रकारचा कळस म्हणजे नारळपाणी, ज्यूस इ. पिताना सेल्फी (ड्रिंकिंग ज्यूस, फीलिंग कूल) अरे काय हा मूर्खपणा? तू ज्यूस पितो, हे जगाला का सांगतो? तू काय असा तीर मारला? मित्राचा मोबाइल हाताळत असताना मी त्यात एक सेल्फी बघितला. सेल्फीत सगळे छान दिसत होते. हसत होते. ‘कुठला रे हा?’ मी सहज त्याला विचारले. ‘गर्लफ्रेंडचा वाढदिवस’ जरा नाराजीने त्यानं उत्तर दिलं. क्षणभर मला त्याचा हेवा वाटला. पण तो परत नाराजीने सांगू लागला, कसला एन्जॉय यार? एन्जॉय कमी सेल्फी जास्त, गप्पा कमी अपलोडिंग जास्त. फक्त एका तासात हिनं पन्नास सेल्फी सोशल साइट्सवर टाकले. जरा रागातच बोलला तो.
- सेल्फीच्या नावानं हे असं का होतंय आपलं, मी उत्तर शोधतोय..
- चेतन चौधरी
आपण खरंच आधुनिक आहोत?
ब्रॅण्डेड कपडे आणि उत्तम राहणीमान म्हणजे मॉडर्न असणं का?
 
‘मॉडर्न’ म्हणजे काय?
आधुनिक..
पण म्हणजे काय? फक्त वरकरणी दिसणारं राहणीमान?
‘ब्रॅण्डेड’ कपडे, घड्याळ, गॉगल्स हे सर्वच वापरणं म्हणजेच मॉडर्न असणं का? ही झाली राहणीमानातली आधुनिकता. पण विचारांचे काय? 
विचार कधी होणार आधुनिक? परखडपणे सांगायचं झालंच तर इमारतींमधली बंद दारांची घरं, त्यात सुंदर असे इंटेरिअर, चार चाकी वाहनं, भाषेत इंग्रजीचा वापर हे एवढंच म्हणजे आधुनिक असणं नव्हे असं मला वाटतं. राहणीमानाच्या दर्जात खूप झपाट्याने वाढ झाली असली तरी माणसाच्या विचारसरणीतला पुरोगामीपणा, त्यातला मोकळेपणा फारसा वाढलेला नाही. किती बोलतो आपण स्त्रीपुरुष समानतेविषयी..
आहे का ती समाजात?
कोणी स्त्री-पुरुष एकमेकांशी थोडं मनमोकळे बोलताना दिसले तरी अजूनही लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकल्याशिवाय राहत नाही. बाकी कामांची वाटणी तर अजून ‘जैसे थे’च ! जातीपातीचे घोळ तर वाढतच चाललेत. मग कसले आपण मॉडर्न झालो?
झालोय का?
- प्रियंका दाभाडे