शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

बॉम्बर जॅकेट प्रिण्टेड स्टोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 2:46 PM

थंडी मस्त गारठली आता. थंडीतले खास ठेवणीतले कपडे, लेअरिंग, स्वेटर्स, पुलओव्हर्स सगळं छान स्टाइलने वापरावं असे हे दिवस. रंगांची मस्त उधळण करत उबदार फॅशनेबल दिसण्यानं थंडीची रंगतही वाढतेच.

- श्रुती साठे

थंडी मस्त गारठली आता. थंडीतले खास ठेवणीतले कपडे, लेअरिंग, स्वेटर्स, पुलओव्हर्स सगळं छान स्टाइलने वापरावं असे हे दिवस. रंगांची मस्त उधळण करत उबदार फॅशनेबल दिसण्यानं थंडीची रंगतही वाढतेच.तर ती आणखी वाढावी म्हणून काय काय करता येऊ शकेल?यासाठी या काही ट्रेण्डी टिप्स..उबदार फॅब्रिक कोणतं?वेल्वेटकाही वर्ष पडद्याआड गेलेलं वेल्वेट आता परत ट्रेण्डमध्ये आलंय. वेल्वेटचं वैशिष्ट्य म्हणजे या कापडात ब्राइट रंग खूप सुरेख दिसतात. त्याला एक वेगळीच ग्रेस येते. वेस्टर्न स्टाइलमध्ये टॉप्स, ड्रेसेस, लांब स्लिटचे कुर्ते, पॅण्ट्स असे पर्याय या कापड प्रकारात उठून दिसतात. लग्न समारंभासाठी वेल्वेटवर एम्ब्रॉयडरी केलेले लेहेंगा चोली, ब्लाऊज किंवा शाल सुरेख दिसतात.फरकडाक्याच्या थंडीसाठी फर जॅकेट उपयुक्त ठरतात. परंतु आपल्याकडील थंडीसाठी फरचा स्टोल आवश्यक तेवढी ऊब देऊन जातो. एक फरचा स्ट्रोल घ्या. काम सोपं.लोकरअ‍ॅक्र लिकपासून बनणाºया लोकरीत रंग खूप उठावदार दिसतात. मशीनवर विणला जाणारा लोकरीचा तागा हा जास्त पातळ आणि रेखीव असतो. अर्थात आपल्याकडे परंपरागत चालत आलेले आई आणि आजीने विणलेला स्वेटर घालण्यात तर एक वेगळीच ऊब असते.पी यू लेदरआवश्यक ती चमक आणि वापरण्यास योग्य असे फेक पी यू लेदर तरुणांचे लक्ष वेधून घेऊ लागलंय. पी यू लेदरचे टॉप्स, जॅकेट्स, ओव्हरकोट, पॅण्ट्स खूप टेÑण्डी दिसतात.डेनिमवर्षानुवर्षे बाजारात मागणी असलेल्या डेनिम कापडाचा वापर आता जीन्ससाठी मर्यादित न राहता, शर्ट टॉप्स, जॅकेट, ड्रेस, रॉम्पर अशा स्टाइल्समध्ये दिसू लागला आहे.रंग कुठले निवडाल?ब्राइट रंग थंडीमध्ये खुलून दिसतात. लाल, निळ्या, काळ्या इत्यादी गडद रंगांचे कुर्ते घ्या. खास हिवाळ्यासाठी मेटॅलिक रंगामध्ये मुख्यत्वेकरून सिल्व्हर रंगांच्या ड्रेसेस, टॉप्स यांची तर सध्या फॅशन आहे.ग्रे चेक्सआतापर्यंत पुरु षांच्या पसंतीस पडणारे ग्रे आणि काळ्या रंगांमधले चेक्स आता महिलांच्या फॅशन रेंजमध्ये दिसून येतात. यामध्ये जॅकेट, टॉप आणि लूज पॅण्ट हेही छान दिसतं.फ्लोरल डिझाइनआत्तापर्यंत फ्लोरल प्रिण्टेड टॉप्स आणि बॉटम्स यांना उन्हाळ्यात उठाव असायचा. परंतु यावेळी हिवाळ्यासाठीसुद्धा खूप ब्रॅण्ड्स नी फ्रेश तसेच डार्क फ्लोरल रेन्ज बाजारात आणली आहे. फ्लोरल प्रिण्ट ड्रेसेस, किंवा डार्क फ्लोरल टॉप आणि डेनिम जीन्स एका कॅज्युअल डे ट्रिपसाठी शोभून दिसतात.थंडीसाठी कपडेखरेदी करताय?थर्मल्सथर्मल कॅमिसोल्स, टॅँक टॉप्स, तसेच लेगिन्स हे अतिशय उबदार असतात. बेसिक व्हाइट, आॅफव्हाइट, ग्रे रंगांचे थर्मल तुमच्याकडे असले की त्यावर कोणताही आपला नेहमीचा टॉप, टी शर्ट वापरू शकतो. स्वत:ला लोकरीच्या कपड्यात, शालीत गुंडाळून मिळणारी ऊब अगदी पातळ थर्मल्स देतात. वापरायला सोपे आणि सुटसुटीत.बॉम्बर जॅकेट आणि ट्रेन्च कोटअतिथंडीच्या भागात बॉम्बर जॅकेट आणि टेÑन्च कोट खूप उपयोगी पडतात. बाजारात वेगवेगळ्या रंगात आणि आकर्षक प्रिण्टमध्ये हे दोन्ही उपलब्ध आहेत. रेव्हर्सिबल म्हणजेच दोन्ही बाजूंनी वापरात येणारे बॉम्बर्स थंडीत फार कामाचे.स्वेटरपूर्वी अगदी मळखाऊ गडद रंगात मिळणारे स्वेटर आता विविध स्टाइल्समध्ये मिळू लागलेत. आता मात्र स्वेटरकडे फक्त गरज म्हणून न पाहता त्याची वीण आणि स्टाइलमध्ये खूप प्रयोग केलेले दिसून येतात. फ्रण्ट ओपन, पूल ओव्हर, टर्टल नेक, पॉन्चो, सेल्फ डिझाइन स्वेटर लक्ष वेधून घेतात. जास्त लांबीचे स्वेटर ड्रेसेस थंडीमध्ये ट्रेण्डी राहण्यास मदत करतात.स्कार्फ आणि स्टोलप्रिण्टेड डार्क रंगांचे स्कार्फ किंवा स्ट्रोल तुमच्याकडे असले आणि ते छान मिक्स मॅच करता आले तरी थंडीत तुमचा लूक एकदम खास दिसतो.