शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

बॉण्ड आणि बॉण्डगर्ल

By admin | Published: November 27, 2015 9:15 PM

बॉण्ड जरा ‘मानवी’ होतोय. एरवी कोरडाठाक, क्रूर असलेला बॉण्ड, आता त्याच्यात काहीतरी इमोशनल खाणाखुणा दिसताहेत.

 बॉण्ड जरा ‘मानवी’ होतोय. 

एरवी कोरडाठाक, क्रूर असलेला बॉण्ड, 
आता त्याच्यात काहीतरी इमोशनल खाणाखुणा दिसताहेत.
तो हॅण्डसम, डॅशिंग, सेक्सी होताच;
आता तो गंभीर, समजूतदार, पॅशनेट होतोय.
इतका की तो आता एखादीच्या प्रेमातही पडू शकतो.
  बॉण्डपटाच्या सुमारे पन्नास वर्षाच्या इतिहासात 
हा बॉण्ड पुरुषांचा ‘आदर्श पुरुष’ नव्हे, 
तर स्त्रियांचा आदर्श पुरुष बनला आहे.
का?
कारण तो बदललाय.
आणि त्यासोबत बदलली आहे,
त्याची बॉण्डगर्ल!
त्यांची ही बदलती गोष्ट.
 
स्पेक्टरे.
नवा बॉण्डपट नुकताच जगभर रिलीज झाला.
बॉण्ड!! जेम्स बॉण्ड!!
म्हणत डॅनियला क्रोमने दिवाळीनंतर फटाके फोडले. बंदुकीच्या फैरी, उडत्या गाडय़ा आणि सुंदर सुंदर ललना बघायला नेहमीसारखीच अलोट गर्दी लोटली.
त्यात आपल्याकडे वेगळीच चर्चा उठली. बॉण्डपटातल्या ‘किस’ची!!
त्यावरून उडालेल्या सेन्सॉर गदारोळाची. अर्थात असल्या चर्चाकडे तरुण मुलंमुली लक्ष देत नसतात. ते काम सोकॉल्ड पोक्त विद्वानांचं. त्यामुळे इथं तो विषय नाही.
विषय आहे तो या बॉण्डपटात ह्या सगळ्या तामझाममधे वेगळी दिसणारी, उठून दिसणारी मोनिका बलुची. एकावन्नाव्या वर्षी ‘मदन’ जेम्स बॉण्डला मोहात पाडणारी रती. 
तिच्याच भाषेत सांगायचं झालं तर, ‘ती ‘बॉण्ड वूमन’ आहे ‘बॉण्ड गर्ल’ नव्हे’!!
 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोनिकाच्या भूमिकेचं वय आणि बॉण्डच्या भूमिकेचं वय सारखंच आहे. म्हणजे बॉण्डपटाच्या इतिहासात पहिल्यांदा बॉण्ड कुणा तरण्याताठय़ा मुलीसोबत नाही, तर त्याच्या वयाच्या स्त्रीसोबत रोमान्स करणार आहे. वरवर छोटय़ा वाटणा:या ह्या बदलाच्या अंतरंगात मोठे प्रवाहबदल दडलेले आहेत.
पिढय़ान्पिढय़ा बॉण्डने पुरुषांच्या पुरुषत्वाच्या ‘विचित्र’ कल्पना फुलवल्या. त्यांना हवा दिली आहे. बॉण्डपटातील स्त्रियांचं चित्रण हा नेहमीच उत्सुकतेचा, चर्चेचा आणि स्त्रीवाद्यांच्या प्रखर विरोधाचा विषय राहिलेला आहे. बॉण्डने त्याच्या आयुष्यात येणारी तरुणी कशीही वापरावी अन् सोडून द्यावी अशाच पद्धतीने सुरुवातीच्या बॉण्डपटात स्त्रियांचं चित्रण केलं गेलं. पुरुषत्वाच्या भलत्याच कल्पनांना अवास्तव महत्त्व देणारा हा बॉण्ड. अल्पावधीतच तो जगभरातल्या पुरुषांच्या दृष्टीने ‘आदर्श पुरुष’ ठरला नसता तर नवलच! 
 मादक दिसणं, आपल्या निबरुद्धतेचं वा क्रूरतेचं आणि त्याबरोबरीने शरीराचं वारेमाप दर्शन घडवणं आणि बॉण्ड म्हणोल तेव्हा, म्हणोल तिथे, त्याच्यासोबत सेक्स करायला तयार असणं एवढीच तत्कालीन बॉण्डगल्र्सची (म्हणजेच बॉण्डपटाच्या नायिकेची) विहित कर्तव्ये होती. अर्थात  समाजात स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये जसजशी रुजत गेली तसतसे बॉण्डपटातील स्त्रियांचे चित्रण कमीअधिक प्रमाणात बदलत गेले. 
मात्र बॉण्डगल्र्सच्या एकूण रूपात वा त्यांना ज्या पद्धतीने चित्रपटात सादर केले जाते त्यात असा फार फरक पडला नाही. शॉन कॉनरी, डेव्हिड निव्हेन, रॉजर मूृर आणि हिमोथी डाल्टनच्या बॉण्ड्सनी स्त्रियांना नेहमीच कस्पटासमान वागवलं. ‘फक्त एकदा वापरण्यासाठी’ हा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बॉण्डपटाच्या बांधणीत इतका रुतला होता की 1995 च्या ‘गोल्डन आय’ र्पयत ‘मनीपेनी’ ही सेक्रेटरी वगळता कुठलंही स्त्रीपात्र बॉण्डपटात दुस:यांदा दाखवलं गेलं नाही. लेम्बियन असणा:या पुसी गॅलोरला (गोल्डफिंगर) सुद्धा आपल्या सोबत सेक्स करायला लावून बॉण्ड कसा वठणीवर आणतो हे दाखवण्यार्पयत बॉण्डपटांची मजल गेली होती. रॉजर मूरचा बॉण्ड सेक्स करून झाल्यावर त्याच्याच बॉण्डगर्लवर बंदूक रोखून म्हणतो की, ‘ह्याआधी तुला मारलं असतं तर काय मजा?’
पहिल्या पंचेचाळीस वर्षात बॉण्ड्सनी त्यांच्या बॉण्डगल्र्सवर असे अनन्वित अत्याचार केले असं म्हटलं तर वावगं ठरू नये. दुर्दैवाची गोष्ट अशी की, हे अत्याचार मिटक्या मारून एन्जॉय करण्यात एक नाही दोन नाही तब्बल चार पिढय़ांनी धन्यता मानली. पुरुषी वर्चस्वाचा प्रभाव बॉण्डच्या व्यक्तिरेखेवर इतका गहिरा होता की तशी भूृमिका करणं हे ‘मेंटली टायरिंग’ होतं हे स्वत: डॅनियल क्रेगने एका मुलाखतीत कबूल केलेलं आहे. 
बॉण्डपटाप्रमाणो काळानुरूप बॉण्डगल्र्स थोडय़ा धीट, स्वावलंबी, स्मार्ट होत गेल्या हे खरं; पण तरी बॉण्डच्या करिश्म्याने त्यांचं पाणी पाणी होणं ठरलेलं! ते प्राक्तन ऑस्कर जिंकणा:या हॅले बेरीलाही चुकलं नाही. 2क्क्1 मधे तिने मॉन्स्टर बेलसाठी ऑस्कर जिंकलं अन् पुढच्या वर्षी तिला ‘डाय अनदर डे’च्या दिग्दर्शकानं समुद्रातून टिचभर बिकिनी घालून बाहेर काढलं!
बॉण्डला जरा ‘माणसळवणारी’ पहिली बॉण्डगर्ल म्हणजे कॅसिनो रोयलमधली व्हेस्पर लिंड. त्या चित्रपटातल्या एका सीनने बॉण्डपट, बॉण्डगल्र्स आणि स्वत: बॉण्डदेखील बदलला आहे त्याची साक्ष दिली. हायप्रोफाईल पोकर गेम सुरू होण्यापूर्वी बॉण्ड व्हेस्परसाठी एक ड्रेस आणून देतो. वर सुनावतोही, मला शोभेल अशी आणि दुस:याला भुलवशील अशी तू दिसली पाहिजेस. तू काय कपडे घालावेत, किती घालावेत, तू किती सेक्सी दिसावंस आणि त्या सेक्सी दिसण्याचा मला कसा फायदा होणार हे सारं काही ठरवण्याचे अधिकार फक्त मलाच आहेत असा नेहमीचा ‘बॉण्ड’ खाक्या असतो. त्याच्या या बडबडीवर व्हेस्पर काही बोलायच्या आत तो स्वत:च्या रूममध्ये निघूनही जातो. पण आत गेल्यावर त्याला दिसतं की त्याच्या बेडवर व्हेस्परने एक सूट काढून ठेवलेला असतो. आधीच्या पाच मिनिटांच्या सीनमधे बॉण्डने जी बडबड केलेली असते तिचा मथितार्थ व्हेस्पर फक्त एका कृतीने बॉण्डर्पयत पोहचवते. त्याला ख:या अर्थाने भारी पडणारी ही पहिली बॉण्डगर्ल.
आणि या टप्प्यावर जगभरातल्या बॉण्डप्रेमींच्या लक्षात आलं होतं की, बॉण्ड जरा ‘मानवी’ होतोय. एरवी कोरडाठाक असलेला बॉण्ड, त्याच्यात इमोशनली काहीतरी हलल्याची ती पहिली खूण होती.
आणि आता आलेला बॉण्ड. त्यातली बॉण्डगर्ल म्हणजे व्हेस्परचंच अपग्रेडेड व्हजर्न. तिच्या स्वत:च्या भाषेत सांगायचं झालं तर एक रिव्होल्युशनरी बॉण्डगर्ल! अर्थात बॉण्डपटात तिला पडद्यावर पाहताना ती एवढी कणखर दिसत नाही. सेक्स अपीलचं भूत तिच्याही मानगुटीवर बसलेल दिसतंच असं समीक्षकांचं आणि टीकाकारांचं म्हणणं आहेच. पण गेल्या त्रेपन्न वर्षाच्या परंपरेला एका एक्कावन वर्षाच्या सौंदर्यवतीनं बदलायला लावलं हेही नसे थोडके..
आजवरच्या सगळ्या बॉण्ड्समधे हा बॉण्ड उजवा म्हणायचा, कारण आपण जी भूमिका करतो त्याची फिलॉसॉफी आपल्याला अजिबात पटत नाही, असं त्यानं जाहीरपणो ठणकावून सांगितलं. तसं सांगणाराही तो पहिलाच!
तरुणांना आवडणारा हा बॉण्ड आता बदलतोय आणि मुख्य म्हणजे बदलतेय त्याची बॉण्डगर्ल हे नक्की!
थोडा मानवी, थोडा इमोशनल बॉण्ड होतोय असं कुठंतरी वाटत असताना त्याच्या सिनेमातल्या नायिकाही बदलताहेत.
हे सगळ्यात महत्त्वाचं!
जगभरातील तारुण्य बॉण्ड बघता बघता हा चेंजही स्वत:च्या मनात नक्की नोंदवून घेतील,
असं वाटतंय!!
 
बॉण्डगल्र्सच्या नावातच ‘सगळं’ काही . 
माणसांसारखी नॉर्मल नावंसुद्धा ह्या सुंद:यांच्या वाटेला सिनेमात कधी आलेली नाहीत. ‘डॉक्टर नो’ मधील हनी रायटर, ‘गोल्डफिंगर’ मधली पुसी गॅलोर किंवा तारो, रोझा, ङोनिया, ‘मिस डिकटन असली ही नावं. त्यांच्या नावातच द्विअर्थ प्रतीत होतो. ‘त्याच कामासाठी’ वापरायच्या गोष्टी आहेत; त्या माणूस नव्हेत असा संदेश कळत-नकळत बिंबवला गेला. यातूनच बॉण्डगल्र्सचं स्थान काय ते समजावं!
 
 कॉनरी ते क्रेग 
एका बाजूला शॉन कॉनरीचा बॉण्ड म्हणताच धुरकट चालणा:या काचा पुसून टीव्हीकडे डोळे लावून बसणारी जुनी खोडं आहेत, तर दुसरीकडे त्याचं शॉन कॉनरीचा बॉण्डपट पाहून तळपायाची आग मस्तकात जाणा:या तरुण मुलीही आहेत. कॉनरीच्या बॉण्डने स्त्रीजातीचा जेवढा अपमान केला असेल तितका सिनेमाच्या इतिहासात कुणीच केला नसेल. म्हणूनच कॉनरीचा बॉण्ड ते आता क्रेगचा बॉण्ड हा प्रवास अनेक सामाजिक स्थित्यंतराची साक्ष देतो आहे. बदलत्या सामाजिक गोष्टींचं एक चित्रच या सा:यात दिसतं.
 
क्रेगचा ‘स्त्रीवादी’ बॉण्ड
 डॅनियल क्रेगच्या बॉण्डने बॉण्डपटाच्या संपूर्ण जगालाच स्त्रियांच्या अस्तित्वाची गंभीरपणो दखल घ्यायला लावली. क्रेगच्या बॉण्डपटात नायिका फक्त निर्बुद्ध, बिनडोक, सेक्सकीटन वा सायको किलर म्हणून समोर न येता एक माणूस म्हणून समोर येतात. बॉण्डचे त्याच्या आयुष्यात असणा:या स्त्रियांशी संबंध अधिक गहिरे होतात. म्हणूनच बॉण्डला कॅसिनो रोयालच्या व्हेस्पर लिंडमधे सोलमेट सापडते. तिला तो तिच्या मृत्यूनंतरही विसरू शकत नाही. क्रेगच्या पुढच्या दोन चित्रपटांतही बॉण्डच्या मनावर तिची सावली वावरताना दिसते. ‘स्कायफॉल’मधे ‘एम’ आणि बॉण्डच्या नात्याचे आणखी काही छुपे कंगोरे सामोरे येतात. पिअर्स ब्रॉस्ननच्या काळात ‘एम’ म्हणून स्त्री व्यक्तिरेखेचा प्रवेश झाला खरा; पण ब्रॉस्ननचा बॉण्ड आणि ज्युडी डेन्थची ‘एम’ ह्यांच्यातलं नातं एक अत्यंत खोडकर शाळकरी पोरगा आणि त्याची कडक क्लासटीचर इथर्पयत मर्यादित राहतं. स्कायफॉलमधे पहिल्यांदा ते पुढे जाऊन आई-मुलाच्या पातळीवर येतं. त्यातही ‘एम’च्या काळजीने बॉण्ड जेव्हा चिंताग्रस्त होतो तेव्हा पहिल्यांदा वाटतं की हा शाळकरी पोरगा आता मोठा होऊन जबाबदार पुरुष बनला आहे. बॉण्डला फक्त ‘तसल्या’ मैत्रिणी नसून आई-बहीण अशा नातलग स्त्रियाही आहेत हे पाहणं फार सुखावह असतं. म्हणून तर क्रेगचा बॉण्ड समस्त फेमिनिस्ट जगात फेमस आहे. का नसावा? तो हॅण्डसम आहे, डॅशिंग आहे, सॉलिड सेक्सी आहे; पण त्याबरोबरीने जबाबदार आहे, गंभीर आहे, समजूतदार आहे, पॅशनेट आहे. कुणालाही प्रेमात पाडून घेईल असा तर आहेच; पण कुणा एखादीच्या प्रेमात स्वत:ला हरवून टाकेल असादेखील आहे !!
आणि म्हणूनच बॉण्डपटाच्या सुमारे पन्नास वर्षाच्या इतिहासात हा बॉण्ड पुरुषांचा ‘आदर्श पुरुष’ नव्हे, तर स्त्रियांचा आदर्श पुरुष बनला आहे.
 
- अनघा पाठक
(अनघा लोकमत टाइम्स वृत्तपत्रत सहायक उपसंपादक आहे.)