शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

खेड्यापाड्यातल्या बॉक्सर मुलींचा गोल्डन पंच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 10:32 AM

विश्व युथ बॉक्सिंग स्पर्धा. ३१ देशांतील १६१ बॉक्सर या स्पर्धेत होते. भारतीय मुली केवळ दहा. त्यात एकट्या हरियाणाच्या सहा, आसामच्या दोन. तसेच हैदराबादची एक. पाच सुवर्णांपैकी चार सुवर्ण हरियाणाच्या कन्यकांनी मिळवून दिली. दोघींनी कांस्य जिंकली. आसामची स्टार अंकुशिता बोरो हिने सुवर्णासह बेस्ट बॉक्सरचा बहुमानही जिंकला. एकाचवेळी इतकी सुवर्णपदके जिंकण्याची देशाची ही पहिलीच वेळ आहे.

- किशोर बागडेगुवाहाटीत नुकत्याच झालेल्या विश्व युथ बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर मुलींनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. त्यांनी सर्वच्या सर्व पाच सुवर्णपदकं जिंकून जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. पाच सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांची लयलूट या मुलींनी केली!अशी भन्नाट कामगिरी करणाºया या मुलींच्या यशाच्या बातम्या झळकल्या.पण कोण आहेत या मुली?

- या पाचही जणी वीस वर्षे वयाच्याही नाहीत.सगळ्या खेड्यापाड्यातल्या. दुर्गम भागातल्या. कुणी अतिदुर्गम भागातल्या. शहरी झगमगाटापासून दूर. बॉक्सिंग करत प्रतिस्पर्ध्याला तर त्यांनी हरवलंच; पण बॉक्सिंग रिंगच्या बाहेर समाज, भाषा, संस्कृती, जीवनशैली, राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या सवयी ते घरच्यांचा विरोध, समाजाचे टोमणे, आर्थिक चणचण यासारख्या अनेक आव्हानांवरही त्यांनी मात केली.त्यांना भेटा, संघर्ष आणि जिद्दीचं हे रूप पाहून, त्यांनी जिंकलेल्यासुवर्णपदकांचं मोल कैकपट जास्त आहे हे कळेल!जगात सर्वश्रेष्ठ ठरलेल्या या मुलींची ही गोष्ट..त्यांचा पंच खºया अर्थानं जगज्जेता आहे..अंकुशिता बोडोगुवाहाटीपासून २०० किमी अंतरावर असलेल्या पर्वतीय भागातील दुर्गम खेड्यात राहणाºया या मुलीचा भारतीय संघापर्यंतचा आणि स्पर्धेत थेट बेस्ट बॉक्सर बनण्याचा प्रवास फारच थरारक आहे. लाइट वेल्टर गटात देशाचे प्रतिनिधित्व करणाºया अंकुशिताकडे उद्याची मेरी कोम या नजरेतून पाहिले जाते. भारतीय बॉक्सिंग संघाचे सहायक कोच भास्कर भट्ट हे अंकुशिताचे फुटवर्क आणि शारीरिक उंचीमुळे तिच्याकडून मोठ्या आशा बाळगतात.ंआसाम-अरुणाचल सीमारेषेवर दिसपूर जिल्ह्यातील उलुबाडी हे अंकुशिताचे गाव. २०१४ मध्ये याच ठिकाणी बोडो अतिरेक्यांनी ४० गावकºयांना ठार मारले होते. ती दहशत अद्याप कायम आहे. ८५ घरांच्या गावाला भेट दिल्यानंतर ५०० लोकवस्तीच्या या गावात अंकुशिताने पदक जिंकावे याबद्दल प्रचंड उत्सुकता दिसली. खेड्यात शेडवजा प्राथमिक शाळा आहे. अंकुशिताचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले. गावात फारशा सोयी नाहीत. वडील राकेश कुमार मानधन तत्त्वावर शिक्षक असून, आई रंजिता आदिवासींसाठी महिला मंडळ चालविते. अंकुशिताचा खेळासोबत बारावी आर्टपर्यंत शैक्षणिक प्रवास गुवाहाटीत झाला.२०१२ मध्ये गोलाघाट येथे साईने बॉक्सिंग चाचणी घेतली. त्यात अंकुशिताची निवड झाली. पुढे गुवाहाटीच्या राज्य अकादमीत दोन वर्षे घालविल्यानंतर तिच्या कामगिरीला नवी झळाळी लाभली. यंदा १७ व्या वर्षात पदार्पण करणाºया अंकुशिताने मागच्या दोन महिन्यांत तुर्कस्तान आणि बल्गेरियातील आंतरराष्टÑीय स्पर्धेत दोन रौप्यपदके जिंकली. स्वत:च्या मेहनतीच्या बळावर विमान प्रवास करणारी गावातील ती पहिली मुलगी. बालपणापासून जिद्दी असलेल्या अंकुशिताने लहानपणी वर्गातील मुलांसोबत भांडतानाच स्वत:मधील बॉक्सरचा परिचय दिला होता. शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची जोड लाभताच पाच वर्षांच्या परिश्रमात ती थेट विश्व चॅम्पियन बॉक्सर तर बनलीच; शिवाय गटातील बॉक्सर्सपैकी सर्वोत्कृष्ट होण्याचा मानही मिळवून दाखविला.आज १७ वर्षांची ही तरुणी. सुवर्णपदक जिंकल्यानंतर डोळ्यातून आनंदाश्रू बरसणारे तिचे फोटो प्रसिद्ध झाले. ती सांगते, ‘माझ्या गावात बॉक्सिंग म्हणजे काय हे कुणाला फारसं माहिती नाही. आईवडिलांना मला हॉस्टेलवर भेटायला यायला पैसे नसायचे. जेमतेम पगार. शेतीत कसंबसं आम्ही भागवतो. तीन वर्षे मी आसारम बॉक्सिंग अकॅडमीत शिक्षण घेतेय. मी स्पर्धा जिंकू लागले तसे थोडे पैसे मिळायला लागले. आणि माझा आत्मविश्वासही वाढला. माझ्या धाकट्या बहिणीला स्वेटर्स फार आवडतात. मी कझाकिस्तानला गेले होते. तिथं मिळणाºया दैनंदिन भत्त्यातून पैसे वाचवून मी तिच्यासाठी स्वेटर आणलं होतं. आमचं घर अजूनही दोन पक्क्या खोल्या. आणि बाकी बांबूचं छत आहे. मी जिंकले म्हणून पैसे मिळाले की मी आधी घराचं काम करणार आहे. माझ्या घरच्यांसाठी तेच मोठं गिफ्ट!’अशा या जिद्दी मुलीचा एक नवा प्रवास या सुवर्णपदकासह सुरू झाला आहे.

ज्योती गुलिया५१ किलो गटात विश्व चॅम्पियन बनलेली ज्योती गुलिया. हरियाणातल्या रोहतकच्या रुरकी गावची. लहानपणी बॉक्सिंगच्या सरावासाठी मनाई असताना मैत्रिणीकडे अभ्यासासाठी जात असल्याचा बहाणा करून ती बॉक्सिंगला जायची. मुलींना चौकटीत बांधून घालणाºया समाजात ज्योतीनं आपल्या बॉक्सिंगने एक नवा अध्याय लिहायला घेतला आहे. खेलकुद मुलींचं काम नाही असं सांगणाºया गावात ज्योतीच्या मागे तिची आई खंबीरपणे उभी राहिली. आणि आज वयाच्या केवळ १७ व्या वर्षी धाकड ज्योतीने स्वत:ची वेगळी ओळख बॉक्सिंगच्या जगातही निर्माण केली आहे.ज्योती सांगते, ‘दंगलमधलं ते धाकड गाणं. हे गाणं ऐकलं की मी इमोशनल व्हायचे. त्या मुलींना त्यांच्या वडिलांनी किती सपोर्ट केला. मेरी फॅमिली मेरे बॉक्सिंग करने के खिलाफ थी! मला वेगळेपण सिद्ध करायचं होतं. मुलींच्या कर्तृत्वात समाज बदलण्याची ताकद आहे. गावात शेती हाच आमचा व्यवसाय. मी सायन्स प्रोजेक्ट करायला जातेय असं सांगून बॉक्सिंगच्या प्रॅक्टिसला जायचे. २०१२ मध्ये शेजारच्या मुलाने बॉक्सिंमध्ये पदक जिंकले हे पाहून मला हुरूप चढला. मला वाटलं असं कौतुक आपल्याही वाट्याला येऊ शकतं.’अर्थात तिनं ठरवलं आणि झालं असं घडलं नाही. चारच महिन्यांनी झज्जरला स्टेट चॅम्पिअनशिप होती. तिथं जायचं तर घरी सांगणं भाग होतं. घरी सांगितल्यावर वडील भडकले. घरातले चिडले. शेवटी तिचे प्रशिक्षक सुधीर हुडा यांनी मध्यस्थी केली. जिंकली नाही तर बॉक्सिंग सोडून देईल असं त्यांनी सांगितल्यावर स्पर्धेला जाता आलं.पण ती जिंकली. जिंकतच राहिली. देश-विदेशात सलग स्पर्धा जिंकली. अकरावीला शिकत असलेल्या ज्योतीमध्ये प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता आहे. आॅलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचे टार्गेट आहे. त्याशिवाय स्वस्थ बसायचे नाहीच, असा निर्धारही आहेच. मला फक्त खेळू द्या, असे तिनं घरच्यांना सागून टाकलं. आता घरच्यांचाही पाठिंबा तिला आहे. अर्थात ज्योती दिसायलाही सुंदर. बॉक्सिंगचे ठोशे चेहºयावर लागल्यामुळे चेहरा विद्रूप होईल. त्यामुळे लग्नासाठी कुणी पसंत करणार नाही, समाज काय म्हणेल या काळजीनं आजही घरच्यांना धास्ती वाटते. मात्र ज्योतीने विश्व स्पर्धेतील पदकासोबतच कुटुंबाचाही विश्वास जिंकला. कालपर्यंत वाकड्या नजरेने पाहणारे लोक आज हारतुरे घालून तिची मिरवणूक काढत आहेत. खेळाने ज्योतीच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे.इथवरचा प्रवास आठवत ज्योती सांगते, ‘खरं सांगू, मला जिंकायचं होतंच, पण त्यासोबत होतं एक लहानपणीपासूनचं स्वप्न. सारं गाव मला टीव्हीवर पाहील, अंतिम सामना टीव्हीवर पाहिला जाईल, एखाद्या सिनेमात होतं तसं सारं घडेल, आणि मी जिंकेन! हे सारं घडावं असं वाटत होतं म्हणूनही मी जिंकले’ - ज्योती सांगते.बॉक्सिंगसाठी जिवाचं रान करणाºया या मुलीचे खेळ हेच पॅशन आहे, तिचं जिंकणं ही तिच्या स्वप्नांची रसद आहे..आणि म्हणून तर ती आता नव्या जोमानं नवीन स्वप्न पाहते आहे...

शशी चोप्राशशी हरियाणातील हिस्सारची. तिच्या मोठ्या दोन्ही बहिणी इंजिनिअर. थोरला भाऊ डॉक्टर. वडील सीमा सुरक्षा दलात अधिकारी. काकांची मुलंदेखील उच्चशिक्षित. कुटुंबात कुणी खेळाडू नव्हतं. खेळाची पार्श्वभूमी नाही. पण फिटनेस वाढावा म्हणून कुस्ती शिक असं वडिलांनीच तिला सुचवलं. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पाच वर्षांआधी त्यांनीच शशीला रोहतकच्या अकादमीत प्र्रशिक्षणासाठी दाखल केलं. २०१० मध्ये नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत दिल्लीत सायनाचा बॅडमिंटन सामना पाहिला तेव्हाच तिनं मनोमन खेळाडू बनण्याचा विचार केला. सायना हिस्सारचीच. सायनाचं कौतुक होताना पाहून आपणही काही करावं असं तिला वाटायचं. सुरुवातीला शशी कुुस्ती खेळत होती. पण मेरी कोमच्या खेळापासून बॉक्सिंग करण्याची प्रेरणाच तिला मिळाली. मात्र खेळाडूंचा प्रवास सोपा नसतो. शरीर स्पर्धेसाठी तयारी करत असताना मनालाही कणखर व्हावं लागतं.

मधल्या काळात शशीची आई चार महिन्यांपासून अंथरुणाला खिळून होती. आईला बरं नसल्यानं आईची देखभालही शशीला करावी लागत होती, कारण वडील बाहेरगावी होते. पण त्याच काळात ट्रेनिंग चुकवून चालणार नव्हतं. दोन्हीकडची जबाबदारी नेटानं सांभाळताना या १७ वर्षांच्या मुलीची दमछाक झाली. पण तिनं धीर सोडला नाही. फोकस हलू दिला नाही. त्यात शशी पूर्ण शाकाहारी. बॉक्सरचं डाएट हा एक मोठा विषय असतो. त्यातून खाणंपिणं सांभाळत, मोबाइल फोन बंद करून पूर्णत: खेळाचा सराव करत शशीनं स्वत:च्या बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित केलं.

ती म्हणते, ‘एकदा तुम्ही ठरवलं की एखादी गोष्ट करायचीच की ती तुम्ही ती करताच! ठरवायचं आणि करायचं इतकं हे सोपं आहे!’बीएच्या द्वितीय वर्षाला शिकणाºया या मुलीने यंदा जानेवारीत झालेल्या अ. भा. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदकासह ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’चा पुरस्कार जिंकला. इस्तंबुल आणि सोफियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन महिन्यांत देशाला दोन पदके जिंकून दिली. शांत स्वभावाच्या शशीला हिंदी गाणी फार आवडतात. संगीत ऐकलं की शरीर बॉक्सिंगसाठी सज्ज होतं असं तिचं मत आहे.ती म्हणते, ‘मी आक्रमक आहे, पण सुरुवातीला स्वत:ची ताकद खर्ची घालत नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूला थकू द्या आणि वार करा!’ हेच बॉक्सिंगमधील तिच्या यशाचं गमक आहे.

साक्षी चौधरीसाक्षी चौधरी भिवानीची. तेच भिवानी, जे जगाच्या नकाशावर आलं ते आॅलिम्पिक मेडल जिंकूनच. बिजिंग आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाºया विजेंदरसिंगचं हे गाव. आणि त्याच गावची साक्षी. ५४ किलो गटात सुवर्ण जिंकणारी एक शेतकरी कन्या. तिच्या वडिलांची पाच एकर शेती. कुटुंबात खाणारी तोंडं पाच. भिवानीला बॉक्सिंगची मोठी चर्चा असली तरी तिच्या घरात या खेळाचा गंध नव्हता. साक्षीनं बॉक्सिंग शिकायचं ठरवलं तेच मुलांसोबत सराव करत. तिथूनच स्वत:ची वाट शोधायला सुरुवात झाली. खेळात चमकल्यास मान-सन्मान आणि पैैसा मिळतो इतकंच तिला माहिती होतं. कारण भिवानीत अवतीभोवती बॉक्सर तेच सारं जिंकत होते. विजेंदरसिंगचे यश तिनं पाहिलं-वाचलं होतं. त्यातून साक्षीने प्रेरणा घेतली. खेळासोबत शिक्षणदेखील महत्त्वाचं आहे, याची जाणीव डोक्यात ठेवून तिनं शिकणं सुरूच ठेवलं. घरच्यांना फारसे काही कळण्याच्या आत या मुलीनं एकामागून एक स्पर्धा जिंकायला सुरुवात केली.हरियाणाच्या मुलींच्या कुस्तीचं, बॉक्सिंगचं कौतुक होत होतंच. साक्षीही शिकत होतीच. पण संघर्ष मैदानातच असतो असं कुठं आहे. साक्षीही शाकाहारी. डाएटचा प्रश्न होता. जिंकून विदेशात जाऊ लागली तर तिथं शाकाहार मिळण्याचा प्रश्न होता. जुने संस्कार, नवीन खेळ, त्याची गरज, मासांहार कर असे सल्ले या साºयात फोकस हलत होता. पण जेमतेम १७ वर्षांच्या या मुलीनं सारं जमवलं. ती सांगते, ‘माझे प्रशिक्षक म्हणतात ज्या आपल्या दुबळ्या बाजू आहेत त्यांचा फार विचार न करता, ज्या आपल्या क्षमता आहेत त्यांचा पुरेपूर वापर कर. मी तेच करते. मैदानातही, बाहेरही!’

नीतू घनघासहीदेखील हरियाणवी कन्या. साक्षी आणि नीतूची स्टोरी काहीशी सारखीच. दोघी मैत्रिणी. आईवडील नीतूच्या पाठीशी उभे राहिले. खरंतर आपल्या लेकीनं खेळात नाव करावं हे नीतूच्या वडिलांचं स्वप्न. नीतू म्हणते, स्वप्न त्यांनी पाहिलं, मी ते स्वप्न फक्त आता जगतेय. प्रत्यक्षात उतरवून दाखवतेय. बालपणापासून खेळाचे संस्कार नीतूवर झाले. नीतूचे वडील चंदीगडला सरकारी सेवेत आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी नोकरीतून ब्रेक घेतला. आणि लेकीला बॉक्सर करायचं या ध्यासानं ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वडील एकटे कमावते. त्यांनीच बिनपगारी रजा घेतली. घरात आर्थिक चणचण, त्यात नातेवाइकांचा या निर्णयाला विरोध, त्यातून वाट्याला आलेली उपेक्षा.. हे सारं या बापलेकीनं सहन केलं. आणि त्या साºया परिस्थितीविरुद्ध हे दोघे उभे ठाकले. साधारण अंगकाठी असलेली ही मुलगी. पण डाव्या हाताने पंंच मारते तेव्हा पाहणारेही आश्चर्यचकित होतात. रोहतकच्या अकादमीत घडलेली १६ वर्षांची नीतू अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत बॉक्सिंगमध्ये विश्व चॅम्पियन बनली.या यशामागे तिची जितकी मेहनत आहे, त्याहून अधिक वाटा मुख्य प्रशिक्षक राफेल बोेगार्मास्को यांचा आहे. विजय मिळवायचा असेल तर प्रतिस्पर्धी खेळाडूच्या डोळ्यात डोळे घालून लढ, हा विश्वास नीतूमध्ये त्यांनी इतक्या कमी कालावधीत जागवला.नीतू जे म्हणतेय ते म्हणूनच खरंय. तिचं जिंकणं हे जितकं तिचं आहे तितकंच समाजाविरुद्ध उभ्या ठाकणाºया तिच्या वडिलांचंही आहे.

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत वरिष्ठ क्रीडा उपसंपादक आहेत. kishorbagde20@gmail.com )

टॅग्स :Sportsक्रीडा