शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ब्रो.. वॉन्ट स्टफ? ‘सब ट्राय करो’ म्हणत नशेच्या जगात हरवलेल्या तरुणांचं टुन्न जग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 5:26 PM

‘पिस ऑफ माइंड’. हा कोडवर्ड आहे. खिशात पैसा बक्कळ, तो उडवायला वेळ नाही. एकटेपणाही आहे आणि सोबत मित्र-मैत्रिणीही. मग मनर्‍शांतीच्या या कोडवर्डला बळी पडणं सुरू होतं. अमली पदार्थाचं सेवन ‘कूल फॅक्टर’ ठरतो, तर कुणासाठी पिअर प्रेशर, कुणासाठी वास्तवापासून पळण्याचा मार्ग.

ठळक मुद्दे ‘सब ट्राय करो’ म्हणत नशेच्या जगात हरवून जातात मग हे तरुण. त्यांना परत या म्हणणारं कुणीच का नाही?

- दुर्गश्री सरदेशपांडे

आमचं चौघांचं टोळकं. एकमेकांना अंतर्बाह्य ओळखणारं. म्हणजे, आमच्यात सिक्रेट असं काहीच नाही.  आम्ही सगळेच ‘टेकी’. बंगळुरात काम करणारे; बारा-पंधरा तास कॉम्प्युटरला चिकटून बसणारे. कंपनीचा पगार-भत्ते भरपूर! पण विरंगुळा नाही. इतक्यात कुणी तरी टुम काढली गोव्यात यायची. तिथे सनबर्न ईडीएम होऊ घातलेलं. कल्पना भन्नाट होती. केली कॅब अन् निघालो. रात्रभरच्या प्रवासानंतर हणजूण गाठले. हॉटेलमध्ये सामान टाकलं आणि थेट सनबर्नचं स्थळ गाठलं. बेफाम आवाजातलं संगीत आणि त्या तालावर थिरकणारे कोवळे पाय! ऐकताच रक्त तापू लागलं. वातावरणात एक परिचित असा गंध भरून राहिलेला. बंगळुरात असताना एका ‘पोहोचलेल्या’ कलिगने मारुआनाचा अनुभव दिला होता. त्या अनुभवाने हा गंध मेंदूर्पयत पोहोचलेला. आता तो येथे कडकडून भेटला. सोबत नाचणार्‍यांचे चेहरेही ब्रrानंदी टाळी लावलेले. इतक्यात कुणी तरी मागून जवळजवळ बिलगलाच, ‘ब्रो.. वॉन्ट स्टफ?’ कानात कुजबुजल्यासारखा त्याचा प्रश्न. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. ‘हाव मच?’ नकळत तोंडातून प्रश्न निसटला. त्याने रक्कम सांगितली. सगळ्यांचेच हात वॉलेटकडे गेले. त्यानंतर आम्हीही हवेत तरंगू लागलो. विहरू लागलो. तीन दिवस धम्माल केली!    *****प्रसंग - 2वी आर फ्रॉम सायबराबाद, म्हणजे टेक्निकली सायबराबाद हं. तसे आम्ही वेगवेगळ्या राज्यांतले. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीने एकत्र आलेले. या तीन मुलीही आमच्या जिगरी यार. ईडीएम संगीताची रूची हा कॉमन धागा. आणि दुसरा धागा ऐश करण्यासाठी भटकण्याचा. गोव्यात ईडीएमसाठी गेली पाच वर्षे येतोय. असा संगीताचा उत्सव अन्यत्र नाही होत. अमेरिकेत कुठे तरी होतो म्हणतात; पण नक्की नाही माहीत. मध्यंतरी पुण्याजवळ झालं होतं आयोजन, पण होता होता बोंबललं. गोवा हेच यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन. इथं कुणाचं कुणाला पडलेलं नसतं. आपला स्टफ घ्यायचा आणि बिनधास्त ओढल्यानंतर धूम नाचायचं. पोलीसही पाहून न पाहिल्यासारखं करतात. मात्र, एक.. डोन्ट गेट इन ट्रबल! एरव्ही सबकुछ माफ! आमचा व्हेंडरही ठरलेला. ए वन माल, तोही योग्य दरात. परवा तर म्हणाला, हवं तर सायबराबादमध्ये तुमच्या रूमवर सांगाल तितका स्टफ पोहोचविण्याची व्यवस्था करीन. हाय की नाय.?  ***प्रसंग -3 वरुण साहनी ऐन पंचविशीतला तरुण. 2017 पास आउट विद्यार्थी व दोन वर्षातच महिन्याला लाख रुपयांचा पगार मोजून घेणारा. मूळचा दिल्लीचा; पण आयटीवाल्यांची ‘सपनो की नगरी’ बंगळुरू म्हणून गेल्या दोन वर्षापासून इथेच राहातो. मोठमोठी आव्हानं, मोठमोठे पगार व उत्तम करिअर ग्राफ देणारं हे शहर आणि अशा मोठय़ा स्वप्नात अडकलेला वरुण. दाक्षिणात्य आहार, लाँग डिस्टन्स रिलेशनशिप व अ‍ॅडल्टहूडचं प्रेशर या सर्वाशी तडजोड करीत सध्या जीवनाची गाडी ढकलत आहे. बंगळुरू म्हणजे तुफान गर्दी; पण या गर्दीतही एकटाच पडला आहे. बक्कळ पैसा, पण आपल्या माणसांसाठी किंवा स्वतर्‍साठी मिळणारा वेळ क्षणभंगुर. मग आपण हे काम का करतो, मी व माझे मित्र एकसारखेच आहोत. मी जे करतो त्यात काय नवीन आहे? माझ्या गर्लफ्रेंडला भेटून एक वर्ष झालं,  यावर्षी तर तिच्या वाढदिवसासाठी काही विशेष तयारीदेखील करू शकलो नाही, आई-बाबादेखील त्यांना वेळ देत नसल्याची तक्रार करत असतात. मला वेळेचं नियोजन करायला येत नाही का किंवा मी कमी पडतो का, यासारखे असंख्य प्रश्न वरुणला हैराण करतात. तेव्हा मारुआना वरुणला अशा प्रश्नांचे विविध कंगोरे लक्षात घेऊन विचार करायला लावते. मारुआना काही तासासाठी का होईना, स्वतर्‍चे दुर्‍ख विसरायला मदत करते. या क्षणात सर्व काही स्लो मोशनमध्ये चालले आहे. कसली घाई नाही, व्यथेला जागा नाही म्हणून ‘पिस ऑफ माइंड’ आहे. *****

हे सगळं काय आहे?तर त्याला शब्द छान आहे, ‘पिस ऑफ माइंड’. मात्र या मनर्‍शांतीच्या कोडवर्डला आज बहुतांश युवक बळी पडत आहेत. अमली पदार्थाचे सेवन काहींसाठी कूल फॅक्टर, काहींसाठी दारू, सिगारेटसारखंच, तर काहीजण पिअर प्रेशरमुळे याचं सेवन करतात. खडतर रिअ‍ॅलिटीहून वेगळ्या जगात काही तास जायचं म्हणून, मजा म्हणून नशेच्या आहारी जाऊ लागतात. त्यातून त्यांचं अतिसेवन होऊ लागतं. एका मोबाइलच्या जाहिरातीत जशी ती मुलगी म्हणते ना ‘सब ट्राय करो’ तसंच गणित काहींचं असतं. अनुभव घेण्यासाठी किंवा अ‍ॅडव्हेंचर म्हणून ड्रग्जचं पहिल्यांदा सेवन करतात. नंतर सवयच जडते. यातून तरुण अमली पदार्थाच्या विळख्यात सापडले जातात. ‘उडता पंजाब’सारखे चित्रपट, गोव्यातला सनबर्न ईडीएम फेस्टिव्हल किंवा करण जोहरच्या पार्टीचा व्हायरल झालेला व्हिडीओ यासारखं काही समोर आलं की, तेवढय़ापुरती या विषयाची, नशेला आळा घालण्याची चर्चा होते; पण तेवढय़ापुरतीच. पुढे काय घडत नाही, नेमके उपाय योजले जात नाहीत.  मात्र प्रश्न हा आहे की, परिस्थिती इतकी गंभीर आहे, तरुणांमधील व्यसनाधिनता वाढते आहे, असं असताना त्याविषयी व्यापक आणि सर्वागीण उपाययोजना का केली जात नाही? देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे असं सतत म्हटलं जातं; पण चित्र असं आहे की, उत्तम शिकलेले, पैसे कमावणारे ते अगदी बेरोजगार या ना त्या मार्गानं नशेच्या जाळ्यात ओढले जात आहेत.त्यांना त्या चक्रव्यूहातून बाहेर कोण काढणार?

************

त्यांनीतरुण मुलगा गमावला  आणि.

काही माणसं मात्र अमली पदार्थाच्या विरोधात कायम लढत असतात. पंजाब येथील मुख्तियार सिंह त्यापैकी एक. 2016 साली मुख्तियार सिंह यांनी आपल्या 22 वर्षीय मुलाला (मंजित सिंह) गमावलं.मृत्यूचं कारण, अमली पदार्थाचे अतिसेवन. मुलाचं पार्थिव बापाला स्वतर्‍च्या खांद्यावर उचलावं लागणं हे केवढं मोठं दुर्‍ख. हे दुर्‍ख कुणाच्या नशिबी येऊ नये म्हणून मी 2016 पासून लढत आहे, असं मुख्तियार सांगत होते. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यापूर्वी ते राज्य सरकारक डे गेले आणि त्यांनी आपल्या मुलाचं पार्थिव व त्याचं कफन मेमोरँडम म्हणून पंतप्रधानांना पाठवण्याची मागणी केली. ते शक्य नव्हतं; पण तरी कफन पंतप्रधान कार्यालयात पाठवण्यात आलं. यानंतर अजून दोन तरुणांचे कफन प्रधानमंत्रींच्या कार्यालयात पोहोचविण्यात आले. हे सारं का तर आमचं दुर्‍ख सरकारला कळावं, या नशेच्या बाजारावर त्वरित कारवाई व्हावी म्हणून मी मागणी करतोय, विनवण्या करतोय, असं ते सांगतात.****उडता पंजाब आणि चिट्टा

पंजाबमध्ये नशेनं पोखरलेलं चित्र भयंकर आहे. केंद्र सरकारच्या  अहवालानुसार 3.1 कोटी लोक कॅनाबीस वापरतात. यात कायदेशीर (भांग) आणि बेकायदा (गांजा, चरस) आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, सिक्कीम, छत्तीसगढ आणि दिल्ली या राज्यात कॅनाबीस वापरण्याचे प्रमाण जास्त आहे व या भागात भांगेचा वापर अधिक आहे. या उलट बिहार, सिक्कीम, मिझोराम, नागालँड आणि मेघालय या भागात बेकायदा कॅनाबीसचा वापर जास्त आहे. भारतात 2.26 कोटी लोक ओपिओईड्ज वापरतात. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, पंजाब, हरियाणा व दिल्लीत याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. हेरॉइनचा वापर भारतात जास्त प्रमाणात होतो. याशिवाय 8.5 लाख लोक अमली पदार्थ इंजेक्शनच्या साहाय्याने सेवन करतात. उत्तर प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर आणि नागालँड येथे याचे प्रमाण जास्त आहे. या अहवालानुसार देशात दारूच्या सेवनानंतर कॅनाबीस आणि ओपिओईड्जचे सेवन जास्त प्रमाणात लोक करतात.   या राज्यांव्यतिरिक्त ‘उडता पंजाब’प्रमाणे उडता हिमाचल होणार असल्याची भीती सध्या हिमाचल प्रदेशच्या लोकांत पसरली आहे. ‘चिट्टा’ या अमली पदार्थाचं सेवन येथे मोठय़ा प्रमाणात होत आहे. 50 ते 60 टक्के युवक याच्या आहारी गेल्याचे अशासकीय संघटनेचे एक सव्रेक्षण सांगतं. 

(दुर्गश्री लोकमतच्या गोवा आवृत्तीत वार्ताहर आहे  )