शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

सोलो ट्रॅव्हल! अजून कधीच तुम्ही एकटय़ानं प्रवास केलेला नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 7:00 AM

एकेकटय़ाने स्वत:लाच शोधण्याचा हा प्रवास करुन पहा, मग सांगा.

ठळक मुद्दे धोक्याचं म्हणाल, तर धोका कुठेही असतोच. घरातल्या घरात बसूनदेखील धोका असतोच.

प्राची  पाठक 

आजकाल सर्वत्र सोलो ट्रॅव्हलर्सबद्दल चर्चा होत असतात. आपण निमूट त्यांच्या गोष्टी आणि त्यांचे दौरे वाचत असतो. पाहत असतो. त्या सोलो ट्रॅव्हलर्समध्ये आपण आपल्याला ठेवून बघतच नाही. का? तर  ‘शक्यच  नाही’ असा फिक्स स्टॅम्प आपण आपल्यावरच मारून घेतलेला असतो.मला ते झेपणार नाही.. मला सोबत लागतेच.. एकटय़ानं काय फिरत बसायचं आणि का?.. आज-काल रोज कसल्या कसल्या बातम्या समोर येतात, आपलं काही बरंवाईट झालं तर? - असे शेकडो प्रश्न आपल्याला सतावत असतात.एकटय़ाने फिरणे हे उत्तम मेडिटेशन आहे खरं तर. हो, ती थिअरीसुद्धा आपली पाठ असते. परंतु, आपला कम्फर्ट सोडून पाठीवर झोळी बांधून बाहेर पडायची उभारी मिळत नसते. साधं पाच मिनिटांवर नेहमीच्या ठिकाणी जायचं असेल तरी अनेक जण एकमेकांना सोबत घेऊन फिरतात. लगेच गाडी काढून तयार असतात. पायी जायचं? नो, बिग नो !  नेहमीची जागा. तिथे कशाला पाहिजे कुणाची सोबत, असा प्रश्नही आपल्याला पडत नाही, इतकी आपल्याला कोणाच्या तरी सोबत असायची सवय झालेली असते. 

काय करता येईल?

मानसशास्नत एक शब्द आहे र्‍ माइंडफुलनेस ! आपण जे काही काम करतोय, त्याबद्दल पूर्ण जागरूक/सतर्क  असणं ! एकटय़ाने फिरताना हाच माइंडफुलनेस झकास कामाला लागतो. दैनंदिन ताणाच्या गोष्टींपासून आपल्याला दूर नेतो. एकटं फिरताना प्रत्येक गोष्ट नीट लक्ष देऊन करावी लागते. आपली जबाबदारी कुणावर सोपवून चालत नाही. कुठून कुठे जायचं, कसं जायचं, त्या त्या ठिकाणी भेटणारी लोकं, तिथे किती वेळ घालवायचा, आर्थिक व्यवहार, आपल्या आवडीनिवडी, आपली सुरक्षा हे आणि असं सगळं भान आपलं आपल्याला ठेवावं लागतं. ते भान सतत आपल्या जागी तेवत ठेवणं म्हणजेच एक प्रकारचं मेडिटेशन!त्यासाठी फार दूर जायचीदेखील गरज नाही. आपल्याच सोसायटीपासून सुरुवात करा. तिचा मॅप बघा. त्यानुसार कोणते भाग आपण पाहिले नाहीत, कोणत्या रस्त्याने गेलेलो नाही, ते रस्ते पायाखालून जाऊ दे. आपल्याच कॉलेजात, ऑफिसलासुद्धा वेगवेगळ्या रस्त्यांनी जाऊन बघा. आपल्या शहरात आपण ठरवून, शहर बघायला म्हणून फार कमी वेळा फिरतो. ते करून पाहा.काही भागातून एकटय़ानं पायी फिरायचं. कुठे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायची. कधी आपलं वाहन न्यायचं. कधी सायकलवर जायचं, कधी बाइकवर. आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारणं, त्यांचे खाद्यपदार्थ, संस्कृती, पेहराव समजून घेणं, त्यांची भाषा शिकणं असं सगळं ह्या सोलो ट्रॅव्हलमध्ये करता येतं.आधी आपल्या आसपास फिरा. मग इतर लहान मोठी शहरं पायाखाली घालण्याचे बेत आखा. त्यांची माहिती वाचायची. तिथे काय काय बघण्यासारखं आहे त्याबद्दल आणखीन माहिती लोकांकडूनच घ्यायची. त्या त्या ठिकाणच्या प्रसिद्ध डिशेश खाऊन बघायच्या. तिथले बाजार पिंजून काढायचे. हळूहळू आपला परीघ विस्तारत न्यायचा. आणखीन लांबचे सोलो ट्रॅव्हल करायचे. त्यासाठी आधी घरातून बाहेर तर पडा. आपल्या आळसाला आणि भीतीला एक धक्का मारणं फार महत्त्वाचं त्यासाठी! 

त्याने काय होईल?

1. असे सोलो प्रवास आपला आत्मविश्वास वाढवतात. संवादकौशल्य नीट तासून घ्यायला मदत करतात. निर्णय घेण्याची सवय लावतात. घेतलेल्या निर्णयातून जे बरंवाईट घडेल, त्याचीही जबाबदारी घ्यायला शिकवतात. 2. स्वतर्‍ला समजून घेण्यासाठीसुद्धा सोलो ट्रॅव्हल कामास येऊ शकतो. डोक्यातला गोंधळ मिटवायला त्याने मदतच होऊ शकते. 3. प्रत्येक सफरीनंतर आपल्याला किती फ्रेश वाटतं, किती नवीन विचार डोक्यात येत राहतात ते तुम्हाला जाणवेल. 4. धोक्याचं म्हणाल, तर धोका कुठेही असतोच. घरातल्या घरात बसूनदेखील धोका असतोच. तर धोक्याचीदेखील जबाबदारी घेण्यासाठी एकटय़ाने घराबाहेर पडायला हवं!