प्राची पाठक
‘काय सॉल्लिड कलेक्शन आहे तुझ्याकडे मुव्हीजचे!’.. ‘अरे तो पिक्चर मिळाला का तुला? मी कधीचा शोधतोय’.. ‘फार भारी डॉक्युमेंटरी आहे ती’.. ‘त्या फिल्म फेस्टिव्हलमधल्या सगळ्या फिल्म्स मी कॉपी करून आणल्या’.. ‘अरे, त्या साइटवर जाऊन डाउनलोड मार कि पिक्चर’.. - ओळखलीत ना ही वाक्यं? नेटिफ्लक्स, अमेझॉन प्राइम, जिओ सिनेमा, आणखी कोणकोणत्या फोन कंपनीचे अॅप्स, कुठल्या कुठल्या सिनेमांच्या लिंक देणारे पोर्टल्स, वेबसाइट्स आणि तिथून मारलेलं डाउनलोड, खास सिनेमासाठी असलेले वेगवेगळे ऑनलाइन ऑप्शन्स.. सगळी अप टू डेट माहिती आपण जमा करून ठेवतो. एखादा सिनेमा नव्याने आला रे आला की तो आपल्याला लगेच हवा असतो. कधी एखाद्या वेबसाइटवरून आपण ते सिनेमे डाउनलोड करतो. सगळं जमा करून ठेवायची काय हौस आणि किती तो उरक कामाचा ! फोनचं मेमरी कार्ड फुल होऊन गेलेलं असतं. पेन ड्राइव्ह गचागच भरलेले असतात. तुम्ही फक्त नाव सांगा, तो सिनेमा आपल्या पेन ड्राइव्हमध्ये, नाहीतर हार्ड डिस्कमध्ये येऊन पडलेला असतोच असतो ! पण ते सिनेमे पाहता का तुम्ही कधी?
काय करता येईल?सुरु वातीला आपल्याकडे किती प्रचंड डेटा सिनेमा म्हणून, डॉक्युमेंटरीज म्हणून, शॉर्ट फिल्म म्हणून येऊन पडलेला आहे तो आधी तपासा. हा सर्व डेटा वन्स फॉर ऑल एकत्न जमा करा. आपल्या कामाचं, कॉलेजचं वेळापत्नक कसं आहे, ते नीट लक्षात घ्या. त्यानुसार फावल्या वेळाचे नियोजन करा. आपल्या अभ्यासाशी संबंधित, जॉबशी संबंधित सिनेमे, डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म्स एका फोल्डरमध्ये एकत्न करा. एकेक करून ते पाहून टाकायचा निश्चय करा. कोणते सिनेमे आपण एकटय़ाने पाहणार आहोत, कोणते घरी एकत्न पाहणार आहोत, ते ठरवा. मित्नांसोबत पाहायचे सिनेमे वेगळे काढा आणि त्यांना कधी बोलवायचं ते पक्कं करा. एकेक करून वॉच लिस्ट पूर्ण करतता येईल.
त्याने काय होईल?1- आपल्या तुडुंब भरलेल्या हार्ड डिस्क, गचागच भरलेले पेन ड्राइव्ह यांना जरा मोकळा श्वास घेता येईल. 2- उगाचच खूप सारे डिजिटल डिव्हाइस विकत घेत सुटायच्या सवयीला आळा बसेल. रिकामे पेन ड्राइव्ह वरचेवर हाताशी असतील. 3- एकेका सिनेमावर, आवडत्या डॉक्युमेंटरीवर चर्चा करायची संधी मिळेल. 4-त्यातली कला समजून घेता येईल आणि एक सुंदर दृश्य अनुभूती ठरावीक काळाने मिळवत राहायचा आनंद घेता येईल.