2016.काय घडलं या वर्षात?काय शिकवलं या ३६६ दिवसांनी.एक दिवस जास्त जगलो, आपण या वर्षात...लीप इअर होतं हे?किती मोठी लीप, किती मोठी उडी घेतली आपण या वर्षात?किती पुढे गेलो? किती अडलो? अडखळलो?आपटलो? उठलो? झटलो आणि जिंकलो, हरलोही...?याची सहज धावती उजळणी केली तर काय दिसतं?काय सापडतं हाताशी?वर्षाच्या कपाटातून काही क्षण, काही यादगार वस्तू पडाव्यात तशा या अंकातल्या काही गोष्टीनक्की हाताशी लागतील...त्या नीट आवरून ठेवल्या, जपल्या, त्यातून शिकलं काही तर येत्या ३६५ दिवसांचीकाही दिशाही सहज सापडू शकेल..म्हणून हे एक ‘लूकिंग बॅक !’मागे वळून पाहणं.वर्षभरातले काही यादगार क्षण,नक्की सापडतील या फ्लॅशबॅकमध्ये !बाकी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा!हॅपी न्यू इअर !
bye 2016
By admin | Published: December 28, 2016 5:34 PM