शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

तुमचं करिअर क्लॉक बरोबर वेळ दाखवतंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 7:50 AM

तुमची ओळख सांगा? काय आवडतं? तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेस सांगा? या प्रश्नांची उत्तरं देता येतात का तुम्हाला?

ठळक मुद्देतुमच्या व्यक्तिमत्त्वाला हा अभ्यासक्रम पूरक कसा आहे ते सांगण्यासाठी/ पटवण्यासाठी लिहिताना - मांडताना तुम्हाला हे ‘करिअर क्लॉक’ उपयुक्त ठरेल.

- डॉ. भूषण केळकर

डिजिटल प्रेझेन्सबद्दल आपण गेल्या आठवडय़ात बोललोच. आता मी तुम्हाला एक नवीन आयडियाची कल्पना देणार आहे. मी तिचं नाव ठेवलंय, ‘करिअर क्लॉक’. हे नाव ठेवण्याचं कारण असं आहे की, या चित्रामध्ये करिअरच्या मांडणीबद्दल एकूण बारा उपांग आहेत - जणू हे करिअरचे घडय़ाळ आहे.पहिल्या स्थानावर असलेल्या उपांगापासून बाराव्या स्थानावर असणार्‍या उपांगार्पयत तुम्ही स्वतर्‍च स्वतर्‍चे विश्लेषण करा आणि त्यावरून तुम्हाला बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.उदाहरणार्थ मुलाखतीतला लाडका प्रश्न र्‍ ‘तुमची ओळख सांगा’, ‘तुमचे वैशिष्टय़ सांगा’, ‘तुमची बलस्थाने व कमतरता सांगा’, ‘आम्ही तुम्हाला का निवडावे, हे सांगा’, आणि असे बरेच!तुम्ही तुमचा सीव्ही, रिझ्युमे लिहिणार असाल तरीही तुम्हाला हे ‘करिअर क्लॉक’ उपयुक्त ठरेल की नेमके कोणते मुद्दे तुम्ही हायलाइट करणार आहात.समजा तुम्ही परदेशी जाण्यासाठी प्रयत्न करत असाल किंवा आजकाल भारतातही विशेषतर्‍ मॅनेजमेंटच्या बर्‍याच संस्थांमध्ये तुम्हाला ‘एसओपी’ म्हणजे ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ द्यावं लागतं. त्यात तुम्हाला तुम्ही जो अभ्यासक्रम निवडता आहात तो तुम्हाला का करायचा आहे; तुमचा हेतू काय आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाला हा अभ्यासक्रम पूरक कसा आहे ते सांगण्यासाठी/ पटवण्यासाठी लिहिताना - मांडताना तुम्हाला हे ‘करिअर क्लॉक’ उपयुक्त ठरेल.एकूण काय हे करिअर क्लॉक म्हणजे एका दगडात दोन नव्हे तर अनेक पक्षी अर्थात कामं साधणारी कल्पना आहे.आपण या आणि पुढील लेखांमध्ये या 12 उपांगांबद्दल नीट जाणून घेऊ ज्यायोगे तुम्हाला सॉफ्ट स्किलमधील  तुमच्या उमेदवारीचे प्रेझेंटेशन वा सादरीकरण नीट करता येईल.पहिला भाग म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाची व स्वभाववैशिष्टय़ांची ओळख. यासाठी तुम्ही अनेक सायकोमेट्री टेस्टपैकी काही करू शकाल. त्यातून तुम्हाला तुम्ही अधिक तर्कशुद्ध आहात की भावना प्रधान, लोकांमध्ये रमता की एकांतात, शिस्तबद्धता तुम्हाला अधिक आवडते की मनस्वीपणा इ. स्वभाववैशिष्टय़े जाणू शकाल आणि तेही शास्रशुद्ध प्रकाराने. याचा उपयोग म्हणजे तुम्ही करिअरची निवड व त्यातील प्रगतीचे नियोजन तुमच्या स्वभावानुसार व त्याला सहज पूरक पद्धतीने करू शकाल.मुलाखतीत तुम्हाला विचारले की तुमची खासियत सांगा आणि तुम्ही जर हे सांगू शकतात की  बिग फाईव्ह किंवा एमबीआटी अन्य काही चाचण्यांवरून असं कळतंय की तुम्ही विश्वासार्ह आणि नवनिर्मितीक्षम आहात तर तुमचं उत्तर अधिक विश्वासार्ह होईल.या ‘करिअर क्लॉक’चे अन्य भाग आपण पुढील लेखांमध्ये बघूच.