शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

character strengths- तुम्हाला  तुमची  ताकद  माहीत आहे ? हे पहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 4:48 PM

स्वत:ची ताकद ओळखा, आणि इतरांशी स्वत:शी तुलना न करता आपली ताकद उत्तम वापरा.

ठळक मुद्देप्रत्येकाकडे कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ आहेच. कुठलीही स्ट्रेंग्थ इतरांपेक्षा कमी अथवा जास्त दर्जाची नाही. प्रत्येकीचं स्वत:चं वेगळेपण आहे !

 जुई जामसांडेकर, निर्माण

माझं वेगळेपण कशात आहे? ते कसं ओळखायचं? माझी खरी ताकद काय? त्या ताकदीला खतपाणी कसं घालायचं याचं उत्तर सहसा मिळत नाही.पॉझिटिव्ह सायकॉलॉजीमध्ये अलीकडे झालेल्या अनेक संशोधनातून सिद्ध झालेला या प्रश्नांवरचा रामबाण उपाय म्हणजे तुमचे कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स!- कॅरॅक्टर?? बापरे! हा खूपच जड शब्द वाटतो. मुख्यत: कॅरॅक्टर हा शब्द चारित्रशी जोडला जातो आणि म्हणूनच त्याची भीतीही वाटते. कुणी या विषयी बोलणार असेल तर नको रे बाबा असं होतं. कॉलेजमध्ये शिकताना तर असंही काही असतं याची कल्पनाही नसते. मात्र हेच कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स आपल्या आयुष्यात ‘स्व’ची ओळख करून देण्यास मोलाची कामगिरी बजावतात. आपली खरी ताकद काय आहे ते सांगतात. पाश्चात्य देशांत कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्सवर खूप भरीव काम झालेलं आहे. मानसिक आजार नसणारे सर्वच जण चांगलंच आयुष्य जगत असतील असं नाही. मानसिक आजार नसणं आणि चांगलं समृद्ध जीवन जगणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे अनेक शोधनिबंधातून सिद्ध झालेलं आहे. म्हणून व्यक्तीच्या ऑप्टिमल डेव्हल्पमेंटसाठी/चांगलं जीवन जगण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या कशा मोजायच्या याचा शोध सुरू झाला. यासाठी काही व्याख्या आणि मोजमाप ठरवणं आवश्यक होतं.2क्क्क् साली अमेरिकेत मेयर्सन फाउण्डेशनने द व्हॅल्यूज इन अॅक्शन इन्स्टिटय़ूट सुरू केली. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसेलव्हेनियाचे दिग्गज सायकॉलॉजिस्ट आणि पॉझिटिव्ह  सायकॉलॉजीचे प्रणोते मार्टिन सेलिग्मन आणि ािस्तोफर पीटरसन यांसह अनेक सोशल सायंटिस्टनी या संशोधनात सहभाग घेतला होता.या अभ्यासात सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगलं कॅरॅक्टर म्हणजे नक्की काय? आणि ते कसं मोजायचं यावर काम सुरू झालं, व्यक्तीची ऑप्टिमल डेव्हल्पमेंट/परिपूर्ण विकास कसा होऊ शकते हे या अभ्यासाचं ध्येय होतं.आता या ‘गुड कॅरॅक्टर’ला कुठल्या दृष्टिकोनातून पहायचं?एका व्यक्तीकडे एकच कोणते तरी कॅरॅक्टर नसून कॅरॅक्टर म्हणजे अनेक गुणांचा समूह असतो म्हणून त्याला कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स म्हटलं गेलं आणि अशा त:हेने स्वत:ला ओळखण्यासाठी आणि परिणामी, चांगले आयुष्य विकसित करण्यासाठीच्या पहिल्या संकल्पनेचा जन्म झाला!पर्सनॅलिटी डेव्हल्पमेंट आणि कॅरॅक्टर डेव्हल्पमेंट यात फरक आहे. पर्सनॅलिटीला आपण आपले फीचर्स म्हणू शकतो; पण कॅरॅक्टर हा त्या व्यक्तीचा गाभा आहे. कॅरॅक्टर स्ट्रेग्थ्स या अक्षरश: एण्ड इन इटसेल्फ आहेत. कुठल्याही परिस्थतीत आपली सिग्नेचर स्ट्रेग्थ्स आपल्याला सोडणार नाहीत. याचाच अर्थ यांना आपल्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही.पण मग कुठल्या गुणांना कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स म्हणायचं? त्याचेही काही सर्वांत महत्त्वाचे निकष ठरवले गेलेले आहेत.त्यापैकी काही महत्त्वाचे ..1. कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स सर्वव्यापी असावेत, मिळणा:या परिणामाऐवजी ते स्वत:च मूल्यांकित असावेत. -valued in its own right.2. इतर लोकांना कमी लेखणारे नकोत तर बळ देणारे असावेत.3. हे कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स ठरवताना ते विकसित करण्यासाठी योग्य इन्स्टिटय़ूशन्स हव्यात. या सर्व निकषांवर आधारित  कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स क्लॉसिफिकेशन बनवलेले आहे. यांत 24 वेगवेगळ्या (युनिक) कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्सचा समावेश केलेला आहे.व या स्ट्रेंग्थ्स विजडम, करेज, ह्युमॅनिटी, जस्टिस, टेम्परन्स, सेल्फ-ट्रान्सन्डेन्स या 6 कोअर व्हच्यरुजमध्ये विभागलेल्या आहेत. (www.viacharacter.org   या वेबसाइटवर पाहू शकता.) यातील कुठलीही स्ट्रेंग्थ बाकी स्ट्रेंग्थ्सपेक्षा कमी अथवा जास्त दर्जाची नाही. ग्रॅटिटुड, ऑनेस्टी, लीडरशिप, लव्ह, ब्रेव्हरी इ. सर्व समान पातळीवर आहेत. प्रत्येक स्ट्रेंग्थला स्वत:चे वेगळेपण आहे! त्यामुळे स्वत:ला ओळखायला खूप मदत होते. स्वत:चीच नीट ओळख होते, त्याचा व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात फायदा होतो. “Happiness is the aim of life [but] virtue is the foundation of happiness”  हे थॉमस जेफरसनचं वाक्य इथं तंतोतंत लागू होतं. म्हणूनच, यापुढे इतर लोकांसोबत आपली तुलना करण्याऐवजी स्वत:ला ओळखा, कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्सचा पुरेपूर वापर करा आणि खरेखुरे ताकदवान बना!**कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स या विषयांतील  अभ्यासाने समजलेले  काही महत्त्वाचे निष्कर्ष 

* दैनंदिन जीवनात कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्सचा वापर केला तर त्याचा लाइफ सॅटिसफॅक्शनवर लक्षणीय परिणाम पडतो.* तुमच्या टॉप कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्समधील किमान 4 ते 7 स्ट्रेंग्थ्स प्रोफेशनल कामांत वापरल्याने कामांतील सकारात्मक अनुभव आणि कॉलिंग वाढते.* कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्समुळे पॉङिाटिव्ह अफेक्ट वाढतो तसेच कामात व्यस्तता वाढते.

निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?

तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवड प्रक्रि या सुरू झाली आहे.त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तरhttp://nirman.mkcl.orgया संकेतस्थळावरउपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.

तुमच्या कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्स शोधा. इथं.

www.viastrengths.org  या संकेतस्थळावर जाऊन कॅरॅक्टर स्ट्रेंग्थ्सचा एक सव्र्हे आहे. तो भरा. त्यातून तुम्हाला तुमच्या स्ट्रेंग्थ्स उतरत्या क्र मात दिसतील. म्हणजे सर्वात पहिली स्ट्रेंग्थ ही तुमची टॉप स्ट्रेंग्थ आहे.