शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

छत्तीसगढ व्हाया मेळघाट - डॉक्टर तरुणीला सापडलेल्या उत्तरांची आणि नव्या प्रश्नांची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 5:58 PM

काही महिन्यातच नावापुढे डॉक्टरही लागणार होते; पण मला क्लिनिकल कामांमध्ये जराही इंटरेस्ट नव्हता. डॉक्टर तर होणार; पण पुढे आयुष्यात काय करायचं, हा यक्षप्रश्न समोर होता. आणि..

ठळक मुद्देसध्या मी शहीद हॉस्पिटल, दल्लीराजहरा, जिल्हा बालोद, छत्तीसगढ इथं दोन वर्षापासून सामाजिक स्वाथ्य विभागात कार्यरत आहे. 

 - प्रेरणा राऊत, निर्माण 4

चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात नेरी हे माझं गाव.आई-वडील दोघेही शिक्षक. घरात शैक्षणिक आणि सामाजिक वातावरण होतं, लहानपणी अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींची पुस्तके वाचण्यातच मन जास्त रमायचं. थोडी मोठी झाल्यावर बलुतं, उपरा, झोंबी यासारख्या कादंब:या वाचल्या.त्यावेळी आमच्याकडे लोकमत यायचा, त्यातली मैत्न (आताची ऑक्सिजन) ही पुरवणी त्या काळातील सगळ्या कुमारवयीन मुला-मुलींमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी फारच फेमस होती. मैत्नमध्ये निर्माणच्या काही गोष्टी येत असतं, त्या गोष्टी वाचून मलाही निर्माण प्रक्रियेत भाग घ्यावासा वाटत असे; पण त्यासाठी 2011 साल उजाडावे लागले. 2011 डिसेंबर महिन्यात मी निर्माण प्रक्रि येत सामील झाले. त्यावेळेस मी बीएचएमएस इंटर्नशिप करत होते.पण मला माझं शिक्षण फारच व्यर्थ वाटायचं, कारण मी फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून पास होणा:या कॅटेगरीतील मुलगी होते. अर्थात, पुढे काही महिन्यातच नावापुढे डॉक्टरही लागणार होते; पण क्लिनिकल कामांमध्ये जराही इंटरेस्ट नसल्यामुळे पुढे आयुष्यात काय करायचे हा यक्षप्रश्न समोर होता. शिवाय त्या काळात मनात ज्या काही सामाजिक भावना जागृत झाल्या होत्या त्याला कसं चॅनलाइज करायचं, हाही प्रश्न खूप सतावत होता. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला निर्माण या प्रक्रि येत भाग घेतल्यामुळे मिळाली. त्याच काळात मेळघाटमधील कुपोषित मुलांचे पावसाळ्यात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर महिन्यात आयोजित केलेल्या एका आरोग्यशिक्षणावर आधारित पावसाळी कॅम्पमध्ये मी भाग घेतला. या प्रक्रि येत 10 दिवस सहभागी. आणि मेळघाटच्या प्रेमात पडले. आपल्या शिक्षणाचा सामाजिक कामात उपयोग कसा करायचा आणि पोट भरण्यापुरते पैसे कसे कमवायचे, हे निर्माणच्या प्रक्रियेत कळल्यामुळे मी पुढे एमपीएच करायचा निर्णय घेतला. त्यानंतर मी मेळघाट येथील एका सामाजिक संस्थेत 2 वर्षे 6 महिने काम केलं. कुपोषण ते किचन गार्डन, विविध वयोगटातील लोकांचे आजार, पाच वर्षार्पयतच्या वयोगटातील मुलांचे आजार यासारख्या अनेक विषयांमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम बघितलं.माझा मेळघाटमधील फिल्डमध्ये काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता, तिथल्या आदिवासी लोकांची संस्कृती मला फार जवळून बघता आली. त्यातून ब:याच गोष्टी शिकता आल्या.सध्या मी शहीद हॉस्पिटल, दल्लीराजहरा, जिल्हा बालोद, छत्तीसगढ इथं दोन वर्षापासून सामाजिक स्वाथ्य विभागात कार्यरत आहे. ‘मेहनतकशों के स्वास्थ्य के लिए मेहनतकशों का अपना अस्पताल’ हे या हॉस्पिटलचं ब्रीदवाक्य. 

     शहीद हॉस्पिटलमध्ये काम करणं तसं  फार आव्हानात्मक होतं, आत्ताही आहे कारण एका प्रचंड लोकशाही पद्धतीने चालणा:या संस्थेत काम करणं ही वरवर पाहता फार छान गोष्ट वाटत असली तरी म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाहीये! शिवाय सामाजिक स्वास्थ्य विभागात मी यायच्या आधी फारसं काम होत नसल्यामुळे सगळी सुरु वात शून्यापासून करावी लागली; पण यात माझी मैत्नीण कल्याणी राऊतने (निर्माण 5) गावांमधे किशोरी मुलींचे काही गट तयार केले होते त्यांची मला फार मदत झाली. माङया कामाची सुरुवात आम्ही टी.बी. निर्मूलन कार्यक्रमाने केली, यात आम्ही गावांमध्ये जाऊन गावातील लोकांच्या सभा घेतल्या, टी.बी. या आजाराविषयी त्यांना माहिती दिली. गावातील स्वयंसेवकांचे गट तयार केले. यात अर्थातच किशोरवयीन मुलीच आघाडीवर होत्या. किशोरवयीन मुलींना आम्ही गावाचा सव्र्हे कसा करायचा, टी. बी.चे संशयित रु ग्ण कसे ओळखायचे इत्यादींचे मार्गदर्शन केले. हे काम आता 8 गावांमध्ये स्वयंसेवकांना कसलाही मोबदला न देता सुरू आहे. या कामासोबतच आम्ही दल्लीराजहरा या शहरातील व आसपासच्या गावांतील शाळांमध्ये जाऊन तिथल्या 13 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना लैंगिक आरोग्य शिक्षण व विविध साथींचे आजार आणि बचाव यांचं मार्गदर्शन केलं. ‘पुस्तक यात्ना’ या कार्यक्र माद्वारे आम्ही 7 गावांमध्ये छोटी वाचनालये तयार केली, ही वाचनालये सुरू करण्यामागे एवढाच उद्देश होता की गावातल्या मुला-मुलींनी शालेय पुस्तकांव्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचावीत, त्यांच्या मनात प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा स्वत: प्रयत्न करावा. याशिवाय आम्ही दोन गावांमध्ये आठवडय़ातून एकदा या पद्धतीने क्लस्टर कम्युनिटी क्लिनिकची सुरुवात केली. या क्लिनिकचे शहीद नियोगी जनस्वास्थ्य केंद्र असे नामकरण करण्यात आले. या केंद्राचे वैशिष्टय़ म्हणजे 1क् गावांतल्या लोकांनी प्रत्येक कुटुंबाकडून 5क् रुपये या प्रकारे वर्गणी गोळा केली आणि स्वास्थ्य केंद्रासाठी लागणारे साहित्य, औषधी व गावातली जागा उपलब्ध करून दिली. शहीद हॉस्पिटलने गावाकडून कसलाही मोबदला न घेता डॉक्टर्स, नर्स व रु ग्णवाहिकेची व्यवस्था गावक:यांना करून दिली. प्रत्येक गावाने त्यांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी आत्मनिर्भर व्हावं हे शहीद हॉस्पिटलचं स्वप्न आहे.शहीद हॉस्पिटलमध्ये सध्या मी करत असलेलं काम हे आजच्या घडीला नायनांच्या (डॉ. अभय बंग)  भाषेत सांगायचे झाले तर अजूनतरी मोजण्याइतपत ठोस झालेलं नाहीये; पण ते व्हावं यासाठीचा प्रयत्न मी करते आहे.

 

निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?

तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तरhttp://nirman.mkcl.orgया संकेतस्थळावरउपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.  अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2020आहे.