शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

चायनिज भेळ, इंटरनेट आणि चटकदार चव

By admin | Published: March 14, 2017 4:32 PM

स्ट्रीट फूड. म्हणजे खवय्यांची चंगळच!

 - भक्ती सोमणस्ट्रीट फूड.म्हणजे खवय्यांची चंगळच!रस्त्यावर उभं राहून आपण जे चमचमीत खातो, त्या चवीची तोड नसते अनेकदा. मुख्य म्हणजे प्रत्येक शहर, प्रत्येक गल्ली, तिथला गाडा इथले पदार्थ सारखे असले तरी त्याची चव वेगळी असते.आता मुंबईत आलात आणि रस्त्यावरचा वडापाव नाही खाल्ला तर काय मजा. मुंबईची मजा अनुभवायची तर वडा पाव तर मस्ट. त्यात आता भेळ- पाणी पुरी, फ्रेंकी, इडली डोसा या प्रकारांबरोबर क्रेझ आहे ती चायनिज भेळेची. मुळात चायनिज भेळ ही काही अस्सल चायनिज प्रकारात मोडणारी ‘चायनिज’ म्हणावी अशा पदार्थातली नाहीच. चायनिज स्वयंपाकात वापरले जाणारे घटक एकत्र करुन त्यांना दिलं गेलं आहे हे भारतीय रूप. कोबीची भजी, आलं, लसूण, कांदा, कोबी परतून दिलेले फ्राईड न्यूडल्स आणि शेजवान चटणी अशा एकत्रीकरणातून केलेली ही भेळ अवघ्या १० रूपयात मिळते. मुंबईत तर सर्वच स्टेशन, शाळा-कॉलेजच्या परिसरात तर हमखास. कमी किंमतीत पोटभरीचे साधन म्हणून अनेकजण ती मिटक्या मारत खातात. पण स्ट्रीट फूडच्या या चवीत स्वच्छतेचं काय? जरा कधीतरी अशा ठेल्यांवर लक्ष देऊन बघाच. एकदा माझंही तसंच झालं, दुपारी चारची वेळ, भजी तळल्याचा घमघमाट येत होता, म्हणून पावलं आपसूकच त्या वासाकडे वळली. दादर स्टेशनबाहेरच्या त्या भेळवाल्याकडे चांगलीच गर्दी होती. पण...नुकताच पाऊस पडत असल्याने खाली चिखल आणि पाणी... अतिशय किचकिचाट. अशा वातावरणात ती भेळ चवीला चांगली असल्याचं एकजण म्हणाला. उलट पावसाळा नसेल तर आजूबाजूला घाण ही असतेच. त्यामुळे या चटकदार खाण्यापायी आपण आरोग्याचं नुकसान तर करत नाही ना हेही पाहणं महत्वाचं ठरतं. आहारतज्ज्ञ तर रस्त्यावरची ही चायनिज भेळ खाऊच नका, असा सल्ला देतात. या भेळेसंदर्भात टॅक्सीत आॅफिसमधल्या मैत्रीणीशी चर्चा चालू होती. ठिकाण आल्यावर आल्यावर आम्ही उतरणार इतक्यात, तो टॅक्सीवाला म्हणाला, कशाला ती रस्यावरची भेळ खायची. त्यात जो शेजवान सॉस वापरला जातो तो मुंबईतल्या एका मार्केटमध्ये ७५ रू पाच लिटरच्या बरणीप्रमाणे मिळतो. तर पाऊच फक्त १० रूपयात! त्यापेक्षा इंटरनेटवर पाहून घरी करा ना..ऐकून धक्काच बसला.मान्य आहे की चायनिज भेळ अत्यंत चांगली लागते, पण म्हणून आपण ती कुठंही खाणार का?मग त्यावर उपाय काय?उपाय एकच, चायनिज भेळ आता घरीही करता येते युट्यूबवर पाहून. त्यामुळे तर टॅक्सीचालक काकाही इंटरनेट कसं वापरता येईल हे सांगतात.हे वाचून तुम्ही म्हणालं ही तर टिका करतेय आमच्या आवडत्या भेळेवर. पण ही वस्तुस्थिती आहे. खरंतर रस्त्यावरचं खाणं कधीतरी खायला नक्कीच हरकत नाही. पण किमान स्वच्छ जागी खाल्लं तर ते आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलंच आहे. नाही का?