भक्ती सोमण
चॉकलेट. निमित्त काहीही असो, आनंद काहीही असो तो चॉकलेटनं साजरा होतोच. आता तर सण उत्सवाचे, गिफ्ट्स देण्याघेण्याचे दिवस. चॉकलेट ऐन भरात न येऊन कसं चालेल?त्यात हल्ली तरुणाईला आजकाल प्युअर चॉकलेट जास्त आवडतं. त्यात चॉकोचिप्स, ब्लुबेरी असे अनेक फ्लेव्हर असतात. तसंच मूळ कडू चव असलेली चॉकलेट्सही सध्या खूप लोकप्रिय आहेत. त्यात मात्र चवीसाठी हेझलनट, मॅक्सिकन चिलीही घातली जाते. हे चॉकलेटचं गणित फारच टेस्टी आहे. म्हणून तर आजकाल सणासुदीला गिफ्ट म्हणून ही भरपूर काळ टिकणारी चॉकलेट्स देण्याचा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणावर आहे.एक काळ असा होता की, गिफ्टमध्ये मिठायांची रेलचेल असायची. पण आता भेट म्हणून अनेकजण चॉकलेट्सच देतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये हे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणात आहे. त्यात बदाम आणि काजू फ्लेव्हर्सना जास्त मागणी. चॉकलेट बनवणाºया कॉर्पोरेट कंपन्यांपासून घरगुती तयार केलेल्या चॉकलेट्सचीही चलती आहेच.खरंतर एका बॉक्समध्ये फार तर ८ ते १० चॉकलेट्स असतात. पण त्याचं पॅकिंग इतकं सुरेख असतं की त्यामुळे ते चॉकलेट खाणं आनंददायी होतं.त्यामुळे सध्या गिफ्ट्सचा ट्रेण्ड काय असं कुणी विचारलं तर, चॉकलेट असं बिंधास्त सांगा.