शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

cognitive flexibility- ‘हे’ कौशल्य तुमच्या रिझ्युमेवर नोंदवून ठेवा, मग पहा जादू! तेवढे जास्त टिकू.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 7:15 AM

कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी म्हणजे वैचारिक लवचीकपणा. माझंच खरं असं म्हणण्याचा काळ गेला; उलट जितक्या नव्या गोष्टी शिकू, तेवढे जास्त टिकू.

ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते,  डॉ. यश वेलणकर

उद्याच्या जगात एकसुरी पद्धतीनं विचार करणं किंवा फक्त आखून दिलेल्या मार्गावरून चालत राहाणं परवडण्यासारखं नसेल. एकाच वेळी निरनिराळ्या पर्यायांचा विचार करणं, त्यांची तुलना करणं, त्यामधला योग्य पर्याय निवडणं आणि त्यानुसार पुढे जाणं यासारख्या गोष्टी खूप गरजेच्या असतील. परिस्थिती सतत बदलणारी असू शकेल. समज, विचार, तंत्नज्ञान हे सगळं विलक्षण वेगानं बदलत गेल्यामुळे त्यानुसार आपल्यात बदल करणं प्रत्येकाला गरजेचं ठरणार आहे.अशा प्रकारे आपला विचार लवचीक असावा यासाठी काय करता येईल? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुणाबरोबरही संवाद साधतो किंवा आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींविषयी बोलतो तेव्हा आपल्या मनात कोणते विचार येतात किंवा येत नाहीत, याकडे आपण बारीक लक्ष दिलं पाहिजे. काही संशोधक याखेरीज आपण आपल्या मेंदूमधल्या स्मृतीचे निरनिराळे कप्पे करावेत असं सुचवतात. म्हणजे आपण काहीही वाचत किंवा समजून घेत असताना ते कशाशी संबंधित आहे हे ठरवून एका वेगळ्या कप्प्यात साठवत असल्याची कल्पना करावी असं ते म्हणतात. अनेक गोष्टी आपण प्रत्यक्ष करून बघितल्या किंवा खोलात जाऊन समजून घेतल्या तरच आपल्याला त्यांचं खरं आकलन होतं. यामुळे नुसतं वरवर काहीतरी समजून घेण्याचे प्रसंग शक्य तितके टाळावेत. सातत्यानं नवनवी कौशल्यं शिकण्यामुळे आपली विचारक्षमता लवचीक आणि समृद्ध होते असं आढळून आलं आहे. उदाहरणार्थ नव्या भाषा शिकणं, कोडी सोडवणं, ज्या गोष्टी आपण उजव्या हातानं करतो त्या डाव्या हातानं करणं असे पर्याय तज्ज्ञ मंडळी शिकवतात. याखेरीज शारीरिक कष्ट घेणं, व्यायाम करणं, नेहमी करत असलेल्या गोष्टी सोडून वेगळं काहीतरी करणं असेही पर्याय यासाठी सुचवले जातात. यामुळे आपल्या मेंदूंमधल्या न्यूरॉन्सनाही सतत खुराक मिळत जातो आणि ते कार्यरत राहातात. आपण एकूणच आपल्या मेंदूच्या क्षमतेच्या अगदी किरकोळ प्रमाणाचा वापर करतो असं म्हटलं जातं. त्यातच आपण एकसुरी आयुष्य जगत राहिलो तर ते प्रमाण अजूनच कमी होतं.या सगळ्याचा मुख्य फायदा म्हणजे अनपेक्षित प्रसंगांना तोंड देण्याची तयारी केलेली असल्यामुळे आपला मेंदू आता या मोक्याच्या क्षणी निरनिराळे पर्याय तपासून बघू शकतो. एकाच वेळी तो अनेक गोष्टींचा विचार करून न थकता त्यामधले बारकावे तपासू शकतो. आपली निर्णयक्षमता त्यामुळे खूप समृद्ध होत जाते. या उलट एकसुरी विचार करणार्‍या लोकांना अपरिचित किंवा अप्रिय प्रसंगांचा सामना करायला लागल्यावर मानसिक ताण-तणाव आणि चिंता अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. हे लोक एकाच विचाराच्या चक्र ामध्ये अडकतात आणि  ते त्यातच फिरत राहातात. अशा प्रकारच्या चक्र व्यूहामध्ये अडकू नये यासाठी प्रयत्न करणार्‍या लोकांची म्हणूनच सरशी होते.

त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?1. केवळ ठोकळेबाज विचार न करता अनेक शक्यता असू शकतात याची जाणीव म्हणजे विचारांची लवचीकता होय.2. रोजच्या आयुष्यातदेखील आपले अनेक समज असतात, मात्न ते समज नेहमी सत्य असतीलच असे नाही. ते गृहीत धरून चालणार नाही. एखाद्या घटनेच्या पाठीमागे अनेक शक्यता असू शकतात याचे भान आपला दुराग्रह आणि असहिष्णुता कमी करतो.3. हे कौशल्य विचारांची सजगता याचा सराव केल्याने वाढते. ‘आत्ता माझ्या मनात हा विचार आहे’ असे त्या विचारापासून अलग होऊन आपण पाहू शकतो. आपण विचारांच्या प्रवाहात वाहत जात असू तर हे शक्य होत नाही. मनातील विचार हेच सत्य आहे असे वाटू लागते. मात्न कोणताही विचार हे सत्य असत नाही.4. माझ्या मनात आलेला विचार म्हणजे सत्य नाही याचे भान विचारांच्या सजगतेने वाढते. हे भान म्हणजेच विचारांची लवचीकता. ती नसेल तर रिजेक्शन, राग, उदासी अशा त्नासदायक भावना अकारण मनात घर करून बसतात.5. आत्ता या क्षणी माझ्या मनात आलेला विचार ही एक शक्यता आहे हे लक्षात घेऊन आणखी कोणकोणत्या शक्यता असू शकतात, असा विचार केला की विचारांची लवचीकता वाढते.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन